सूर्यास्त
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
का लागली दृष्ट तेजोनिधीला
अवेळी कसा आज सूर्यास्त झाला
अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा
शरण भास्करा तू कसा या निशेला
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
अंधार डोही धरा दीनवाणी
कशी भासते आज केविलवाणी
कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची
आस वेड्या जीवाला नव्याने उषेची
जयश्री अंबासकर
वाचने
1765
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
जयवी ताई,
मस्त कविता केली आहेस, आवडली. :)
>> बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
या ओळी विशेष आवडल्या, जयश्री.
अतिशय सुरेख काव्य आहे.
भास्कराने निशेला शरण जाणे... जबरदस्त कल्पना. :)
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
सुरेख! जयूताई, तुझ्या प्रतिभेसमोर मी नतमस्तक आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
अप्रतीम शब्दयोजना...!
आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.
सुंदर कविता !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली
- ग्रेट्ट्च . . .
मस्तच .... :)
--अवलिया
सुंदर कविता..