मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ती पहा पडली गझल)

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कधीकधी आम्हालाही वाटतं राव... विडंबन जत्रेत सामील व्हावं असं. चला. प्रेरणा ती पहा पडली गझल साबू सटकल्यासारखी मनाची अंघोळही लवकर उरकल्यासारखी शॉवराचे थेंब विरले काय आणि मी लिहू शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी शृंखला विडंबनांची गाजते बोर्डावरी भर मीही घालतो दाणे बुचकल्यासारखी हो, जरा साशंक होतो नळ फिरवतानाच मी धारही ती अडखळे श्रीमुख विचकल्यासारखी हाय तो पडला नवीन साबू संडासामधे 'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी -टुबुकजित

वाचने 2463 वाचनखूण प्रतिक्रिया 7

ज्ञानोबाचे पैजार 16/05/2017 - 15:36
हाय तो पडला नवीन साबू संडासामधे 'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी -टुबुकजित त्याच साबणाने हात धुतलेत वाटत नंतर? (डुबुकजित)पैजारबुवा,

खेडूत 16/05/2017 - 15:41
जब्रा रचना..! आवडली. अता अन्य कवींकडे लक्ष्य द्यावे असे सुचवितो. (उगा या कवींना वाटायचं आपल्याला लक्ष्य करतायत.)