करवंद सरबत
उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.
कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या.

वाचने
13997
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्त
कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का आलाय?
In reply to कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का by किसन शिंदे
पण करवंद छान लाल होती आतून
In reply to कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का by किसन शिंदे
करवंदाची साल काळी कुळकुळीत असली तरी रस लाल रंगाचा असतो.
मस्त दिसतय. आम्ही डोंगराची काळी मैना म्हणतो करवंदाला.
छान पाकृ. असंच सरबत जांभळाचंही करता येईल का?
In reply to छान पाकृ. असंच सरबत by रेवती
लवकरच येईल गं!
वाह मस्त
नेहमीप्रमाणेच.... अहाहा!
आई शप्पथ!! नुसता फोटो पाहूनच दिल गार गार हो गया!!
सुपर्ब!
वा.. मस्तच.
किती झटपट होतय हे सरबत.आणि करवंदांची चव विशेष आवडीची असल्याने नक्की करणार
आहाहा ! :)
{ पन्ह प्रेमी } :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakhariaवाह! जरा हटके सरबत...ह्यात मिठा ऐवजी थोडं काला नमक घातलं तर चव वेगळी लागेल का? एकदा करून बघतो...एका वेगळ्या पाककृती बद्दल धन्यवाद!
आताच्या आता करून प्यावेसे वाटतेय. बाकी, काळे मैना बियांसकट खायला इतकी मजा येते की सरबताला उरणार नाहीत हो. ती गोड-आंबट-तुरट चव आठवून हैराण झालोय. :(
बाजारात मिळतं.... पण स्वतः करून प्यायची गंमत न्यारी....
बाजारात मिळतं.... पण स्वतः करून प्यायची गंमत न्यारी....
मस्त