मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करवंद सरबत

अनन्न्या · · पाककृती
उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत! साहित्यः दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार. sarbat कृती: करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या. sarbat

वाचने 13997 वाचनखूण प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मनिमौ 18/04/2017 - 06:29
किती झटपट होतय हे सरबत.आणि करवंदांची चव विशेष आवडीची असल्याने नक्की करणार
वाह! जरा हटके सरबत...ह्यात मिठा ऐवजी थोडं काला नमक घातलं तर चव वेगळी लागेल का? एकदा करून बघतो...एका वेगळ्या पाककृती बद्दल धन्यवाद!
आताच्या आता करून प्यावेसे वाटतेय. बाकी, काळे मैना बियांसकट खायला इतकी मजा येते की सरबताला उरणार नाहीत हो. ती गोड-आंबट-तुरट चव आठवून हैराण झालोय. :(