====================
====================
कांदा आणि कैरीची चटणी
====================
साहित्य
- दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
- अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
- हिरव्या मिरच्या ५-६
- चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
- लसूण पाकळ्या २-३
- तेल २-३ चमचे
- गूळ चार चमचे
- हिंग चिमुट भर
- पाव चमचा मेथीचे दाणे
- जिरे एक चमचा
- ओवा पाव चमचा
- मोहरी फोडणी पुरती
- कढीपत्ता ५-६ पाने
- मिठ चवीनुसार
- तव्यावर थोडेसे तेल घालून हिरव्या मिरच्या परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
- त्याच तव्यात मेथीचे दाणे, जिरे, लसूण्, हिंग हलकेसे परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
- ग्राइंडर मध्ये प्रथम कोरडे पदार्थ आणि नंतर चिरलेला कांदा, साल काढलेल्या कैरीच्या फोडी, कोथिंबीर, गूळ,घालून सरबरीत वाटून घ्या
- चवीनुसार मिठ टाकून परत एकदा वाटून घ्या
- बाउल किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्या.
- छोट्या कढी मध्ये फोडणी करा, त्यात मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी थंड होउ द्या. हळद घालू नका रंग संगती बिघडते
- थंड झालेली फोडणी चटणी वर टाका
- झाली चटणी तयार.
- मिरचीची देठे कांद्याची साले, कैरीची साले ओल्या कचर्याच्या डब्यात टाका
- मिक्सरची भांडी सुरी किंवा विळी व्यवस्थित स्वच्छ धुवुन ठेवा
- फोडणिचे भाडे आणि तवा जागच्या जागी घासायला ठेवा.
- ओटा चकाचक करा
कृती (१) साधारण अर्धा तास
======================================
कृती (२) साधारण पंधरा मिनीटे
ही कृती पुरूष करत असतील तर सर्वात महत्त्वाची तुम्हाला खरा आदर या मुळेच मिळेल ( एंड टू एंड प्रोसेस)
एंजॉय अँड बी हॅपी.
=========================================
Taxonomy upgrade extras
वाचने
17015
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
पर्फेक्ट !!!!
पर्फेक्ट !!!!
In reply to पर्फेक्ट !!!! by मितान
वा वा!
पण फटु कुठे आहे?
In reply to वा वा! by पैसा
वा:
वाह!
कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून
आप्पा विदौट ग्रायंडरचीच भारी
In reply to कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून by अप्पा जोगळेकर
कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून
In reply to कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून by अप्पा जोगळेकर
ट्रस्ट मी टेक्स्चरमुळे फरक पडतो चवीत.
In reply to कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून by अप्पा जोगळेकर
टेक्स्चरमुळे फरक
In reply to कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून by अप्पा जोगळेकर
ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात
तक्कूत भौतेक कांदा नसतो बे.
In reply to ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात by प्रसाद गोडबोले
तक्कूत भौतेक कांदा नसतो बे.
In reply to तक्कूत भौतेक कांदा नसतो बे. by अभ्या..
तो छुंदा झाला
In reply to तक्कूत भौतेक कांदा नसतो बे. by कापूसकोन्ड्या
हो
In reply to ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात by प्रसाद गोडबोले
होय, कैरी कांदा किसून घेतला
In reply to ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात by प्रसाद गोडबोले
करेक्ट. तो तक्कु. चटणी
In reply to होय, कैरी कांदा किसून घेतला by सूड
मस्त!
मस्तच! नक्की करून बघणार!
आम्ही टक्कू करतो त्यात कांदा
चुंदा
In reply to आम्ही टक्कू करतो त्यात कांदा by तेजस आठवले
मी आजच
म्ला फोतु नय दिसत