मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कांदा आणि कैरीची चटणी

कापूसकोन्ड्या · · पाककृती
====================

कांदा आणि कैरीची चटणी

====================

साहित्य

  1. दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
  2. अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
  3. हिरव्या मिरच्या ५-६
  4. चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
  5. लसूण पाकळ्या २-३
  6. तेल २-३ चमचे
  7. गूळ चार चमचे
  8. हिंग चिमुट भर
  9. पाव चमचा मेथीचे दाणे
  10. जिरे एक चमचा
  11. ओवा पाव चमचा
  12. मोहरी फोडणी पुरती
  13. कढीपत्ता ५-६ पाने
  14. मिठ चवीनुसार
  15. कृती (१) साधारण अर्धा तास ======================================
    1. तव्यावर थोडेसे तेल घालून हिरव्या मिरच्या परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    2. त्याच तव्यात मेथीचे दाणे, जिरे, लसूण्, हिंग हलकेसे परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    3. ग्राइंडर मध्ये प्रथम कोरडे पदार्थ आणि नंतर चिरलेला कांदा, साल काढलेल्या कैरीच्या फोडी, कोथिंबीर, गूळ,घालून सरबरीत वाटून घ्या
    4. चवीनुसार मिठ टाकून परत एकदा वाटून घ्या
    5. बाउल किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्या.
    6. छोट्या कढी मध्ये फोडणी करा, त्यात मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी थंड होउ द्या. हळद घालू नका रंग संगती बिघडते
    7. थंड झालेली फोडणी चटणी वर टाका
    8. झाली चटणी तयार.

    कृती (२) साधारण पंधरा मिनीटे

    ही कृती पुरूष करत असतील तर सर्वात महत्त्वाची तुम्हाला खरा आदर या मुळेच मिळेल ( एंड टू एंड प्रोसेस)
    1. मिरचीची देठे कांद्याची साले, कैरीची साले ओल्या कचर्‍याच्या डब्यात टाका
    2. मिक्सरची भांडी सुरी किंवा विळी व्यवस्थित स्वच्छ धुवुन ठेवा
    3. फोडणिचे भाडे आणि तवा जागच्या जागी घासायला ठेवा.
    4. ओटा चकाचक करा
    एंजॉय अँड बी हॅपी. ========================================= ..

वाचन 17012 प्रतिक्रिया 0