पहाट
पहाट नहाली दवाच्या कुशीत
रात्र विरघळे रेशमी मिठीत..
झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर
दूर जाणे तरी तुला ना मंजूर..
निरोप घेई रे एकेक चांदणी
तरी ही सुखाने जडावे पापणी..
किरणे नाजुक सोनपावली
स्वप्नांची रात्र तरी ना सरली...
मिठीत तुझ्या मी तुझीच होवून
पहाट उमले प्राजक्त होउन
वाचने
3097
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
आईऽऽ ग्गं!
मस्त गं!
छान
सुरेख कविता
वा!
छान आहे कविता
मस्त आहे
छान
कविता आवडली.
सुरेख कविता
झुंजुर-मुंजुर
सह्ही
+१