मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहाट

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पहाट नहाली दवाच्या कुशीत रात्र विरघळे रेशमी मिठीत.. झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर दूर जाणे तरी तुला ना मंजूर.. निरोप घेई रे एकेक चांदणी तरी ही सुखाने जडावे पापणी.. किरणे नाजुक सोनपावली स्वप्नांची रात्र तरी ना सरली... मिठीत तुझ्या मी तुझीच होवून पहाट उमले प्राजक्त होउन

वाचने 3094 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्राजु Fri, 02/20/2009 - 07:46
एक अप्रतिम शृंगारिक कविता! प्रत्येक ओळ सुंदर आहे.. शेवट खासच.. जियो!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दिपक Fri, 02/20/2009 - 12:40
मिठीत तुझ्या मी तुझीच होवून पहाट उमले प्राजक्त होउन... खपलो ! :)

अनिल हटेला Sat, 02/21/2009 - 12:14
सुंदर कविता ! आवडेच !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..