मनातल्या मनात !!
लेखनप्रकार
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय.
आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते.
साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात.
आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस.
मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि.
हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात.
हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.
आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)
कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.
तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.
वाचने
30822
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
संदीप भाया...
In reply to संदीप भाया... by अर्धवटराव
:-) :-)
In reply to संदीप भाया... by अर्धवटराव
अध्यात्मावर बोलायचो तेव्हा
In reply to अध्यात्मावर बोलायचो तेव्हा by संदीप डांगे
आमची नुसतीच पावडर.
अर्धवटराव जी काही प्रामाणीक प्रश्न
मारवाजी...
In reply to मारवाजी... by अर्धवटराव
आता निदान अध्यात्मिक अज्ञान तरी लपवाल तेवढं बरं !
जीवनाचे तसेही काहि प्रयोजन आहे असं वाटत नाहि.एक्झॅक्टली हेच फ्रस्ट्रेशन तर मनाला सर्वस्व मानणारा अनुभवतो ! जीवन हेच जीवनाचं प्रयोजन आहे आणि आनंदानं जगणं ही त्याची निष्पत्ती आहे. २)तसं बघितलं तर अॅब्सोल्युट अद्वैत अवस्थेत माणुस जगाच्या रहाटगाडग्यासंदर्भात निरुपयोगी होतोयाला म्हणतात अध्यात्मिक आंधार ! अद्वैत झालेला निवांत होतो. त्याच्यासाठी जग स्वप्नवत होतं. इतरांना त्याचं जगणं मार्गदर्शक तत्व होतं. प्रणय त्याच्यासाठी कंपल्शन राहात नाही. तो आनंद शेअर करण्याचा एक बहाना होतो. ३)द्वैतीचा स्व मी-तू असा सापेक्ष असतो तर अद्वैतीचा विश्वाकार.काहीही फेकाफेकी ! अद्वैत ही स्थिती आहे, व्यक्ती नाही. नैतिकता त्या स्थितीत `रुल्स ऑफ द गेम' इतपत वास्तविकता राहाते. तीचं बंधन राहात नाही.In reply to आता निदान अध्यात्मिक अज्ञान तरी लपवाल तेवढं बरं ! by संजय क्षीरसागर
का बरं लपवांवं आध्यात्मीक अज्ञान?
मन मनास उमगत नाही
In reply to मन मनास उमगत नाही by पैसा
मोघे छान लिहायचे !
मनाची प्रतले
In reply to मनाची प्रतले by गामा पैलवान
???
In reply to ??? by अर्धवटराव
तुमच्याकडे शब्दांशिवाय काही नाही !
आत्मभाव मनात असतोचएक झाला की दुसरा शब्द ! `आत्मभाव म्हणजे नक्की काय?' हे जरा तपशिलात सांगाल काय ?In reply to तुमच्याकडे शब्दांशिवाय काही नाही ! by संजय क्षीरसागर
असं म्हणताय...
In reply to असं म्हणताय... by अर्धवटराव
बाकीच्या प्रतिसादांना नंतर उत्तर देईन
आत्मभाव म्हणजे मनाची स्वतःला आयडेण्टीफाय करायची वृत्ती.जर तुमच्या धारणेत मनाबाहेर काही नाही तर मग मन कुणाशी आणि काय घंटा आयडेंटीफाय करणार ?In reply to बाकीच्या प्रतिसादांना नंतर उत्तर देईन by संजय क्षीरसागर
त्यात काय लफडा जाणवतोय तुम्हाला ?
अध्यात्म मुळातच कळत नव्हतं.
In reply to अध्यात्म मुळातच कळत नव्हतं. by सुबोध खरे
हाहाहा!
आज "जागतिक आरोग्य दिन २०१७
मन आणि आत्मा
माझ्या मना बन दगड
आता झाला सगळा गोंधळ उघड !
मूळ समस्या मी-आहे किंवा मी-नाहि अशी नसुन "मी मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी मनाची दुभंग अवस्था आहे.आता शांतपणे वाचा :तुमच्या मी ची कल्पनाच फोल आहे !मी ही अनादी शांतता आहे! ती `मनाला कंट्रोल करत नाही' तर ती मनापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मन तिच्या काह्यात आहे. मनाचा उद्भव, चलन आणि निरसन, अथांग आणि अमर्याद शांततेच्या अंतर्गतच आहे. शांतता हाच मनाचा स्त्रोत आहे. शांततेचा आधार नसेल तर मनाचा उद्भव, चलन आणि निर्गमन असंभव आहे. ही शांतताच आपलं मूळ स्वरुप आहे. ती कायम अव्यक्त आहे आणि मन कायम व्यक्त आहे. व्यक्त अव्यक्ताला कधीही गवसणी घालू शकत नाही. त्या शांततेशी (आपली मूळातच असलेली) एकरुपता, जी जीवनाच्या कोलाहलात हरवली आहे, ती पुनश्च प्रस्थापित करणं हेच सर्व अध्यात्मिक प्रयासाचं इप्सित आहे. त्यामुळेच ग्रंथांची सांगता :ॐ शांती: शांती: शांती:अशी करण्याचा प्रघात आहे. २)मी मनाबाहेरचा कुणीतरी आहे हे एकमेव सत्य असेल तर स्वःचा विसर पडणं अशक्य आहे.तुम्हाला स्वतःचा विसर पडलेला आहे हीच गोष्ट सर्व सिद्ध करतेत्यामुळे तुमच्या पुढच्या चर्वितचर्वणाला काहीही अर्थ नाही. ३)जी गोष्ट मनाबाहेरची आहे त्यावर मन प्रभाव टाकु शकत नाहि. आणि जर मन त्यावर प्रभाव टाकु शकत असेल तर ति गोष्ट मनाच्याच इको-सिस्टीमचा भाग आहे, मनाच्याच परिघातली आहे.हे एकमेव वाक्य आख्ख्या प्रतिसादात बरोबरे ! मन शांततेवर प्रभाव टाकू शकत नाही आणि शांततेतंच मनाचा खेळ चालू असला तरी ती मनापासून कधीही लिप्त होत नाही. थोडक्यात, आपण मनापासून कायम वेगळे आणि अलिप्त आहोत. पण (तुम्ही समजतायं त्याप्रमाणे)स्वतःलाच मन समजल्यामुळे शरीरात कोंडल्यासारखं वाटून फुल घुसमट चालू आहे.४)उदा. संगीतात रस आहे, राजकारणात नाहि हे छंद लक्षण 'स्व'च्या नव्हे तर मनाच्या कक्षेत येतं. त्याला उगाच मनाबाहेर काढण्यात काहि अर्थ नाहि. असो.अर्थात ! आवड-निवड कायम मनाच्या कक्षेत आहे पणछंद पुरवणारा कायम स्वच्छंद आहे !आता तुम्हाला स्वच समजलेला नाही तर स्वच्छंद काय कप्पाळ समजणार ? ५)मी एक मनोगत म्हणुन हि चर्चा करतोय आणि तुमच्यासाठी ति एक नॉक आऊट स्पर्धा आहे. असो. सतत मनाला कंट्रोल करायच्या वृत्तीमुळे मनोगत वगैरे तसंही शक्य नाहि.चर्चेचं फलित नसेल तर तो कालापव्यय आहे, फारतर करमणूक म्हणूया आणिनॉक-आऊटचा अर्थ फलित आहे.तर चर्चेचं फलित असं आहे : तुमची स्वची कल्पनाच वृथा आहे. कारण शांतता (म्हणजे आपलं स्वरुप) मनाला `कंट्रोल' करत नाही. शांतता सार्वभौम आहे तिला तसं करण्याची गरजच नाही. आता हेच तुम्हाला समजेल असं सांगतो : आकाशाच्या अमर्याद पोकळीत सर्व अस्तित्वाचा उदय आणि अस्त आहे. मग तो मिपाचा सदस्य असो, सूर्य असो, चंद्र असो, सर्वच्या सर्व आकाशस्थ ग्रहमालीका असोत, अवाढव्य जलधी असोत, की मुंगीच्या मेंदूत प्रकट झालेला विचार असो....आकाशाच्या बाहेर काहीही नाही कारण आकाशाला अंतच नाही ! आकाश कायम मजेत आहे, त्याला अस्तित्वाला कंट्रोल करायची गरजच नाही कारण ट्रेड टॉवर कोसळू दे की महायुद्ध होऊ दे...आकाशाला काहीही होत नाही. तद्वत शांतता सुद्धा आकाशासारखीच आहे आणि ते आपलं स्वरुप आहे. त्यामुळे मूळात ध्वनीरुप असलेलं मन कायम शांततेच्याच परिघात आहे. ती मनाला कंट्रोल वगैरे काही करत नाही पण मन कायम तिच्या अखत्यारित आहे. तुम्हाला याचा काही पत्ताच नाही त्यामुळे नको असेल तेव्हा मन शट डाऊन होणं अशक्य आहे. थोडक्यात, तुमचा बायोकंप्युटर झोपेत स्टँड-बाय आणि जागेपणी फुल्ल ऑन मोड मधे आहे. तो प्रॉपर शट डाऊन होतंच नाही. याचा आणखी एक पैलू आहे. तुम्ही मनाला घाबरलेले आहात म्हणून मनशरण झालेले आहात. मनाच्या धसक्यामुळे`मनाला कंट्रोल करणार कुणी तरी मी' ही तुमची स्वची फोल कल्पना आहे.आणि मनाचं नियंत्रण असंभव वाटल्यानं`असा कुणी मी नाहीच'या निर्णयाप्रत येऊन, होतील त्या मनोलीला बघणं एवढं एकच काम चालू आहे. कारण मनंच भीती घालतं. म्हणून तर सर्व ज्ञानी म्हणतात : "जागो ! मनके भयसे जागो !" एकदा तुमचा स्व-जागृत झाला की मन काही घंटा वाकडं करु शकत नाही.In reply to आता झाला सगळा गोंधळ उघड ! by संजय क्षीरसागर
वाचलं शांतपणे. एक नजर इधर भी...
In reply to वाचलं शांतपणे. एक नजर इधर भी... by अर्धवटराव
तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हाला तरी कळतंय का पाहा !
ती शांतता नसुन शांती आहे.काही घंटा फरक नाही. तुम्ही फक्त शब्दांशी खेळतायं. त्यापुढे तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हालाच नीट कळल्यावर सांगा. २)'छंद पुरवणारा' अॅस सच कुणी नाहि.हा कोणता भ्रम आहे ? गाणं जरी मनाच्या डोमेनमधे असलं तरी गायक गाण्यापेक्षा वेगळा आहे आणि तो स्वतःचा छंद पुरवतो आहे. ३)स्व-जागृती म्हणजे मन जिंकणं नाहि.तुम्हाला इतकं सविस्तर लिहून स्वच कळत नाही त्याला आता नाईलाज आहे. मन स्वच्या काह्यात आहे. तुम्ही मनाच्या भयात आहात म्हणून कंट्रोल, जिंकणं वगैरे शब्द टंकतायं. ४)मनाबाहेरुन मनाचा वापर करत कुणी हे प्रसवलेलं नाहि.तुम्हाला मनापलिकडचं जगच माहिती नाही. मनाचा वापर केल्याशिवाय संवाद, लेखन, अभिव्यक्ती अशक्य आहे हे किमान बुद्धीच्या व्यक्तीच्याही लक्षात येईल. पण मनाचा वापर करणं आणि आपण मनाच्या काह्यात असणं हा मनोरुग्ण आणि जागृत-स्व यातला फरक आहे.In reply to तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हाला तरी कळतंय का पाहा ! by संजय क्षीरसागर
हाईट झाली.
In reply to हाईट झाली. by अर्धवटराव
भाषाशास्त्राचंही ज्ञानही अपुरं आहे !
शब्द हा केवळ निर्देश आहे. चंद्र हा शब्द म्हणजे खरा चंद्र नाही. पण ज्यानं कधी चंद्रच पाहिला नाही त्याला केवळ शब्द हाच आधार आहे. आणि तेअनुभव शून्यतेचं प्राथमिक लक्षण आहे.चंद्राला चंद्र म्हटलं काय की चंद्रमा म्हटलं काय, दोन्ही एकच आहे हे सामान्यातल्या सामान्याला कळू शकतं. थोडक्यात, पीस, सायलेंस, शांती, शांतता सगळ्या निर्देशांचा अर्थ एकच आहे `निर्मन अवस्था' ! पण ज्याला शांततेचा अनुभवच नाही आणि ज्याचं मन हेच सर्वस्व आहे, त्याला केवळ शब्दच्छल करण्यावाचून गत्यंतर नाही. २)बहिरेपणालाच शांती समजणं हे देखील कोंडमारा झालेल्या मनाचं लक्षण आहे.माझी भाषा वापरुन ज्ञानाचा देखावा केला की फक्त अज्ञान उघड होईल ! आणि तुम्ही आणखी गोत्यात याल. आपल्याला ऐकू येत नाही हे कळायलाकळणारा`ऐकण्याच्या फॅकल्टीपेक्षा' वेगळा हवा ! पण इतकी उघड गोष्ट सुद्धा तुमच्या आकलनापलिकडे आहे. ३)गायक आवाज पुरवतो, गाण्याचा छंद नाहि.आता तुमची फारच तारांबळ होतेयं ! गायक आवाज पुरवतो म्हणजेतो गाण्यापेक्षा वेगळा आहे! स्वतःच्या विधानानं तुम्ही स्वतःलाच डिफिट केलं आहे ! कारण गाणं आहे की गोंगाट हे जरी मन ठरवत असलं तरी तो मुद्दाच नव्हता ! ४)कह्यात असणं हेच तुमचं मनाविषयी धोरण आहे. कंट्रोल ऐवजी हार्मोनी, सिंक्रोनायझेन वगैरे पैलु तुम्हाला अज्ञात आहेत. इट्स अ व्हेरी बीग प्रॉब्लेम.आता हे शांतपणे वाचा, एकदम लख्खं प्रकाश पडेल : कंप्युटर चालवता येतो याचा अर्थ कंप्युटरचा उपयोग करता येतो. केवळ अज्ञानीच `मी कंप्युटरवर विजय मिळवला' अशी भाषा करु शकतो. तुमचा सगळा गोंधळ `मनाला कंट्रोल करणारा मी' भोवती आहे. मन ही फॅकल्टी मी बायोकंप्युटर म्हणून वापरतो कारण स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो आणि त्याची कार्यप्रणाली जाणतो.तुम्ही मनाला घाबरलेले आहात त्यामुळे स्व-विस्मरण झालंय. हे कंप्युटरमधे वायरस शिरल्यासारखं आहे. कोणताही विचार कधीही आणि कसाही येतो आणिमनंच त्याला रिस्पाँन्स देतं, त्यामुळेमनावेगळा कुणी नाही अशी तुमची ठाम गैरसमजूत झाली आहे......आता मनाच्या मर्कटलीला केवळ बघत राहाण्यावाचून गत्यंतर नाही. ५)कावलेल्या मनाचे तसेच कावलेले विचार. जाने दे मामु, तेरे बस कि बात नहि.परत एकदा वरचा प्रतिसाद दोन-तीनदा शांतपणे, मनाच्या गोंधळातून बाहेर येऊन वाचा कदाचितमनाचा वायरस अफेक्टेड कंप्युटर किती `बसके बाहर' गेलायं ते कळेल.In reply to भाषाशास्त्राचंही ज्ञानही अपुरं आहे ! by संजय क्षीरसागर
कसं कळणार...
In reply to कसं कळणार... by अर्धवटराव
प्रतिसाद पुन्हा मनाचं शून्य आकलन दर्शवतो !
मुख्याध्यापकाच्या ऑफीसमधे असते ति शांतता, शाळेच्या मैदानात असते ति पीस. ऑपरेशन थिएटरमधे असते ति शांतता, नाटकाच्या थेटरात असते ति पीस. मनाल कह्यात ठेवणे व मनाला परिपक्व करणे हा तो फरक आहे.आता तरी नीट वाचा :शांतता एकच आणि अविभाज्य आहे.तुमचं मन कशाचीही आणि कशीही विभागणी करुन त्याला काहीही नांवं देत सुटलंय ! २)'गाणं' जर मन ठरवत असेल आणि गाणारा 'गाणं' पुरवत असेत तर ते दोन्हि एकाच परिघातले हवे.पुन्हा तीच चूक ! गाणं मनानं सुचवलं असेल तरी गाणं म्हणणारा गाण्यापेक्षा कायम वेगळा आहे. स्वतःच्या उजव्या हातानं तुम्ही तोच हात पकडायचा निष्फळ प्रयत्न करतायं. ३)वर्चस्वाशिवाय कह्यात ठेवणे देखील शक्य असायलाच हवं.तुमचा फंडाच गंडलायं ! आपण ठरवू तेव्हा पायानं चालतो याचा अर्थ पायांवर विजय मिळवला असं होत नाही. तरीही पाय आपल्या काह्यात आहेत म्हणजे ते आपल्या मर्जीशिवाय चालू शकत नाहीत. तुमचं मन हेच सर्वस्व आहे त्यामुळे ते संभ्रमित पायांसारखं झालंय. तुमची मर्जी असो वा नसो ते केव्हाही आणि कसंही चालू होतं आणि परिस्थितीला स्वतःला हवा तसा प्रतिसाद देतं. यालाच मन काह्यात नसणं म्हणतात. ४)"स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो." तुम्ही तसं "समजता". तशी वस्तुस्थिती नाहिए.ज्याप्रमाणे कार चालवायला चालक कारपेक्षा वेगळा हवा त्याप्रमाणे स्वतःच्या मर्जीनं मनाचा वापर करायला आपण मनापेक्षा वेगळे हवे. इतकी उघड वस्तुस्थिती तुम्हाला कळू नये हे आश्चर्य आहे. ५)काँप्युटरचा वापर करणार्या व्यतिरीक्त व्हायरस घुसवणारा आणखी कुणीतरी आला म्हणायचा.आयला, अनाकलानाची हद्द झाली ! शरीराला रोग झाला म्हणजे आपण त्यात वायरस घुसवला का ? तुमची परिस्थिती `आपणच वायरस' आणि `आपणच वायरस होऊन मनात घुसतो' आणि वर `मनालाच त्याचा लफडा निस्तरु दे' म्हणतो.... अशी झाली आहे. तुमचा मनाचा कंप्युटर सॉलीड गंडलायं, बाकी काही नाही. ६)सर्वात महत्वाचं.. तुम्ही जे काहि वर टंकलय ते तुमच्या "मनातले विचार" आहेत... कुणी बाहेरुन "वापर करुन" मनात इंड्युस केलेले नाहित हे लक्षात घ्या.हे `सर्वात महत्त्वाचं' तर पुन्हा हाईट आहे ! आहो, भाषा मनाच्या परिघातच आहे, मी स्वतःचं आकलन मनाचा वापर करुन व्यक्तं करतोयं ! `मामू ये तेरे बस की बात नही' वगैरे तुम्ही मागच्या प्रतिसादात म्हटलं होतं. पण वास्तविकात, सर्कीट, तुम तो पूरेही मनमें उलझ गये हो ! खुदकी पोस्टनेही तुम्हारी वाट लगा दी है |In reply to प्रतिसाद पुन्हा मनाचं शून्य आकलन दर्शवतो ! by संजय क्षीरसागर
अच्छा.
In reply to अच्छा. by अर्धवटराव
एनी वे, माझ्याबाजूनं चर्चा संपन्न करतो
In reply to एनी वे, माझ्याबाजूनं चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
ओके.
In reply to अच्छा. by अर्धवटराव
एनी वे, माझ्याबाजूनं चर्चा संपन्न करतो
'जागना' मतलब 'अंदर' की तरफ
In reply to 'जागना' मतलब 'अंदर' की तरफ by संदीप डांगे
नो !
In reply to नो ! by संजय क्षीरसागर
सो नाऊ इट्स क्रिस्टल क्लिअर:
अर्धवटरावांना सॅल्यूट!!
आज वाचला लेख ! रोचक असेच
In reply to आज वाचला लेख ! रोचक असेच by मितान
अवश्य !!