मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी गेल्यावर वि़झुनी जातील--

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार

वाचने 2545 वाचनखूण प्रतिक्रिया 12

सालोमालो गुरुवार, 02/19/2009 - 18:27
पुष्कराज, मित्रा जिंकलस! चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती फार सुंदर! अजुन येउ दे. सालो

लिखाळ गुरुवार, 02/19/2009 - 18:30
फार छान.. एकदम आवडली कविता.. आशय आणि रचना दोन्ही मस्त ! -- लिखाळ.

संदीप चित्रे गुरुवार, 02/19/2009 - 19:45
>> चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती या ओळी विशेष आवडल्या. भा. रा. तांबेंची 'जन पळभर म्हणतील हाय हाय' आठवली. तसेच सुधीर मोघेंच्या 'दयाघना...'मधील या ओळी आठवल्या -- बालपण उतू गेले तारुण्य नासले वार्धक्य साचले

प्राजु Fri, 02/20/2009 - 06:51
खूपच सुंदर आहे कविता. आशय अतिशय सुंदर आणि गंभिर आहे. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राघव Fri, 02/20/2009 - 08:26
सुंदर कविता. :) तुमच्या आधीच्या कविता अन् ही कविता - एकदम वेगळी प्रकृती/मांडणी/शब्दयोजना. सुंदर. येऊ द्यात अजून :) मुमुक्षु

वाहवा सुंदर कविता. :) आवडलीच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984