ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला
नको नेमका तो, मनकवडा निघाला
त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले
अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला
नीती नियम सारे, त्याला जरी पढवले
माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला
घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले
म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला
नागास पाहता मी, वार इतके केले
घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला
देवास नवसून, ज्यास हुलकावले
‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला
(दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे. नियमांचा फारसा अभ्यास न करता लिहिली आहे. चुकत माकत शिकायलाच आवडते. बरोबर उतरली आहे की नाही हे कळल्यास आनंद वाटेल.)
वाचने
2694
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
गजल आवडली . नियम मलाही काही
धन्यवाद :)
In reply to गजल आवडली . नियम मलाही काही by पद्मावति
वा उत्तम भाव. एक दोन शेर तर
सकस
धन्यवाद :)
सुन्दर
वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला
:)
In reply to वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला by शार्दुल_हातोळकर
काही ठिकाणी ..
म्हणजे नक्की काय?
In reply to काही ठिकाणी .. by चौकटराजा
सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते
In reply to म्हणजे नक्की काय? by संदीप-लेले
" सर्वप्रथम शेरांमधे लय आणि
In reply to सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते by शार्दुल_हातोळकर
मान्य, पण.....
In reply to " सर्वप्रथम शेरांमधे लय आणि by संदीप-लेले
वृत्ते व्यवस्थीत अभ्यासली की
In reply to मान्य, पण..... by शार्दुल_हातोळकर
बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे
प्रतिक्रिया आत्ता पहिल्या
In reply to बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे by विशाल कुलकर्णी