Skip to main content

तूच तू...

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
तोच चांद नभी अन् रात आज तीच ती सागराच्या लाटेवरची गाज देखील तीच ती तोच वारा... तीच नशा तेच धूसर क्षितिजही..... त्याच त्या नभामधुनी चांद किरणे तीच ती.... मात्र आज नको मज हे आठव तुझी दाटते..... साय-ओल्या वाळूमधली पाऊल खुण बोलावते.... तू असशी जर इथे तर.... सर्वकाही हवेसे! तूच नाही जर इथे तर.... जीणे अर्थहीन... नकोसे!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1462
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान.

तोच चांद नभी अन् आज रात तीच ती लाटेवरी सागराच्या गाज पुन्हा तीच ती | तोच वारा... तीच नशा धूसर ते क्षितिजही..... त्याच त्या नभातुनी चांदकिरणे तीच ती.... नको काही आज मज आठव तुझी दाटते..... साय-ओल्या वाळूतली पाऊलखुण बोलवते.... तू असशी जर इथे .... सर्वकाही हवेवेसे! नसशी इथे तूच तर.... जीणे अर्थहीन... नकोसे!!!

छान