तूच तू...
लेखनविषय:
काव्यरस
तोच चांद नभी अन्
रात आज तीच ती
सागराच्या लाटेवरची
गाज देखील तीच ती
तोच वारा... तीच नशा
तेच धूसर क्षितिजही.....
त्याच त्या नभामधुनी
चांद किरणे तीच ती....
मात्र आज नको मज हे
आठव तुझी दाटते.....
साय-ओल्या वाळूमधली
पाऊल खुण बोलावते....
तू असशी जर इथे तर....
सर्वकाही हवेसे!
तूच नाही जर इथे तर....
जीणे अर्थहीन... नकोसे!!!
वाचने
1462
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान.
तोच चांद नभी अन्
आज रात तीच ती
लाटेवरी सागराच्या
गाज पुन्हा तीच ती |
तोच वारा... तीच नशा
धूसर ते क्षितिजही.....
त्याच त्या नभातुनी
चांदकिरणे तीच ती....
नको काही आज मज
आठव तुझी दाटते.....
साय-ओल्या वाळूतली
पाऊलखुण बोलवते....
तू असशी जर इथे ....
सर्वकाही हवेवेसे!
नसशी इथे तूच तर....
जीणे अर्थहीन... नकोसे!!!
In reply to कविता थोडी रिपेअर करायला हवी... by संजय क्षीरसागर
मस्त. खूप आवडली दुरुस्त केलेली
In reply to मस्त. खूप आवडली दुरुस्त by ज्योति अळवणी
.
In reply to मस्त. खूप आवडली दुरुस्त by ज्योति अळवणी
.
आवडली
छान
छान.