आदिप्रश्न
लेखनविषय:
काव्यरस
धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अहर्निश जेथे
का अनादि ब्रह्माण्डाचे
लघुरूप जन्मते तेथे ?
अणुगर्भ कोरुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?
का अंत असे ज्ञेयाला
की ज्ञान तोकडे ठरते
की सीमा अज्ञेयाची
अज्ञात प्रदेशी वसते ?
वाचने
2325
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पण तुमची एक कविता वाचली की "सखाराम गटणेच्या" चालीवर असे म्हणावेसे वाटते की पुढचा आठवडाभर एखादी चारोळीही वाचू नये! ;)
कृहघ्या!
Sandy
धन्यवाद स॑दीप. कृहघ्या म्हणजे?
In reply to धन्यवाद ! by अनन्त्_यात्री
कृपया हलके घ्या! :)
अप्रतिम. थेट विश्र्वनिर्मितीच्या गाभ्यालाच हात घातलात !
धन्यवाद, फूत्कार!
वाह!
आत्मब॑ध, धन्यवाद !
कविता आवडली !!
धन्यवाद, शार्दूल!
आवडली. इतकी धगधगीत की खरंतर "जे देखे रवी" या सदरात जास्त समर्पक ठरेल. :)
धन्यवाद प्राची अश्विनी ! निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची धग एखाद्या अस्पष्टपणे ऐकू येणाऱ्या मोहक गीतासारखी पिच्छा सोडत नाही !
कविता खूप आवडली.
धन्यवाद, पैसा !
६ अधिक ६
@सूड, स्कोअर-कीपि॓गची अनाहूत सेवा पुरविल्याबद्दल आभार !
कविता अप्रतिम!