तिचे हासणे चांदण्याचा चुरा...
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!
तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!
चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!
कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!
मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा...
अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!
—सत्यजित
वाचने
6272
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
अतिशय सुरेख प्रतिमा आहेत एकेक!
मस्त !!
असेच लिहीत राहा.
शब्द अपुरे आहेत कौतुकाला
आवडली.
किती सुंदर, लयवती!!
फार सुंदर!
अतीव देखणी कविता! क्या बात है!!!
शेवटच्या वाक्यात एक बदल सुचवतो,
'फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!' ऐवजी
'फिकी मेनका अन् फिक्या अप्सरा!' असं करून पहा. मेनका एकच आहे. ऊर्वशी, रंभाप्रमाणे.
सर्व प्रतिसादक रसिकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!आवडल्या ओळी. -दिलीप बिरुटे
क्या बात है! सही लिहीताय राव..
आवडल्या गेली आहे...
कविता खूपच आवडल्या गेली आहे!
Sandy
क्या बात! सुरेख गजल.
सुंदर !!!!!!
ते सापळा तेवढं समजवून सांगा ना
In reply to सुंदर !!!!!! by मितान
अर्थ सहज आहे तसा...
तिचे धारदार नजरेने पाहणे इतके मोहक असते की कुणाचीही नजर मिळताच,सापळ्यात अडकावा तसा तो गुंतून पडतो जणू काही एखाद्या सावजाने (मृगाने) खुद्द शिकाऱ्याच्याच (केसरी-सिंहाच्या) प्रेमात पडावे!
शिवाय कुठलीही गजल रसिकाला स्वतःच्या संदर्भाने (अनुभव,इच्छा,कल्पना ई.) अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य देते,ही तिची खासियत आहेच.हे अवांतर!
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आ.दिलीप सर,मंदारजी,राउत सर,संदिपजी,यशोदाजी आपणा सर्वांचे हार्दीक धन्यवाद!
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONIखुप सुरेख!
हसण्याला चांदण्याचा चुरा ही उपमा प्रचंड आवडली.
कविता आवडली.
मदनबाण,पद्मावतीजी,रेवतीजी...मनःपूर्वक धन्यवाद!

वाह!