राउळी या मनाच्या
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी मी मना लाविली शिस्त आहे
करू लागले योजना ते उद्याच्या
न ठेवीन विश्वास आता त्वरेने
न मोडीन मी कायद्याला जगाच्या
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व
जरी ठेवितो बंद काचा घराच्या
- अपूर्व ओक
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी मी मना लाविली शिस्त आहे
करू लागले योजना ते उद्याच्या
न ठेवीन विश्वास आता त्वरेने
न मोडीन मी कायद्याला जगाच्या
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व
जरी ठेवितो बंद काचा घराच्या
- अपूर्व ओक
वाचने
7964
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
सुंदरच! प्रचंड आवडल्या गेली आहे!
Sandy
In reply to वा! by चांदणे संदीप
"प्रचंड आवडल्या गेली आहे!" हा काय प्रकार आहे?
In reply to हा काय प्रकार आहे? by अनन्त्_यात्री
"प्रचंड आवडल्या गेली आहे!"ये मिपाका श्टाईल है रे बाबा! (ह. घ्या) Sandy
जय जय रघुवीर समर्थ! =))
सुरेख कविता!
किंचित छिद्रान्वेष ....
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या
दुसर्या ओळीत किंचित लय जाते आहे..
तिला काढता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
असे काही जमेल का?
In reply to सुरेख! by चतुरंग
जमेल तर!!! वाह. धन्यवाद सुधार केल्याबद्दल
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर कविता!
आवडली!
सुरेख!
वृत्त बित्त देऊन ?!!! हायला खतरा काम आहे राव... भारी भारी.
In reply to वृत्त बित्त देऊन ?!!! हायला by स्रुजा
हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)
In reply to हो म्हणजे झालं असं की, by वेल्लाभट
दंडवत !!
अतिशय सुंदर रचना !!
कौतुकास शब्द अपुरे आहेत !!
थेट मनास भेदुन गेली !!
In reply to अप्रतिम !! by शार्दुल_हातोळकर
धन्यवाद शार्दुल
Atishay surekh kavita aani tyala sajesa photo.

सुंदर रचना.
अप्रतिम .. आवडली कविता!
कौतुकाबद्दल सगळ्यांना धन्यवाद ! :)
वृत्तात बित्तात कोण कविता लिहिला की आपण फक्त सॅल्युट करतो.
In reply to वृत्तात बित्तात कोण कविता by अभ्या..
धन्यवाद :)
खुप मस्त गझल.
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P
In reply to तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व by प्रसाद_कुलकर्णी
मनाच्या श्लोकांच्या चालीत म्हणा.
In reply to मनाच्या श्लोकांच्या चालीत by अनुप ढेरे
हो ना राव!! मला वाटलं जय जय रघुवीर समर्थ कोणाच्या तरी लक्षात येईल.
वृत्तातली कविता पाहिली कि आय फील जेलस
खुप छान ....आवडली कविता ! मनापासून शुभेच्छा !!
अरे वा! भुजंगप्रयाती य चारीहि येती.
कविता आवडली. या निमित्ताने उपक्रमावरचा अक्षरगणवृत्त वगैरेवरचा एक धागा आठवला.
व्वा व्वा, क्या बात है!
वा! आवडली.
खुप छान ....आवडली कविता
शुभेच्छा
खुप छान ....आवडली कविता
शुभेच्छा
कविता आवडलीच पण फोटोतले घर आणि निसर्ग खूपच आवडला. काय मजा येईल अशा एखाद्या ठिकाणी राहायला मिळाले तर.
वा!