मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राउळी या मनाच्या

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोडीन मी कायद्याला जगाच्या तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व जरी ठेवितो बंद काचा घराच्या - अपूर्व ओक

वाचने 7964 वाचनखूण प्रतिक्रिया 38

चांदणे संदीप 02/03/2017 - 15:47
सुंदरच! प्रचंड आवडल्या गेली आहे! Sandy

पैसा 02/03/2017 - 19:12
सुरेख कविता!

चतुरंग 02/03/2017 - 21:45
किंचित छिद्रान्वेष .... तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या दुसर्‍या ओळीत किंचित लय जाते आहे.. तिला काढता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या असे काही जमेल का?

अमिता राउत 02/03/2017 - 22:29
सुंदर कविता!

अमिता राउत 02/03/2017 - 22:29
सुंदर कविता!

अमिता राउत 02/03/2017 - 22:29
सुंदर कविता!

अमिता राउत 02/03/2017 - 22:29
सुंदर कविता!

अमिता राउत 02/03/2017 - 22:30
सुंदर कविता!

In reply to by स्रुजा

वेल्लाभट 03/03/2017 - 11:25
हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)

शार्दुल_हातोळकर 02/03/2017 - 23:17
अतिशय सुंदर रचना !! कौतुकास शब्द अपुरे आहेत !! थेट मनास भेदुन गेली !!

सुमीत भातखंडे 03/03/2017 - 09:28
सुंदर रचना.

अॅस्ट्रोनाट विनय 03/03/2017 - 14:59
खुप मस्त गझल.

प्रसाद_कुलकर्णी 03/03/2017 - 15:29
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P

वटवट 03/03/2017 - 15:51
वृत्तातली कविता पाहिली कि आय फील जेलस

अभिजीत अवलिया 05/03/2017 - 20:07
कविता आवडलीच पण फोटोतले घर आणि निसर्ग खूपच आवडला. काय मजा येईल अशा एखाद्या ठिकाणी राहायला मिळाले तर.