मसालेभात

वाचने
8868
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मस्तच आहे ग मसालेभात...:-)
फोटो पाहुन भूक चाळवली...
-स्मिता.
फोटो आवडला
फक्त भातावर चा तो मधला (तो गटणे स्टाईल च्यायनीज पदार्थ ओळखा ...)खाद्या पदार्था ऍवजी मस्त कोथीबीर टाकली तर लई बेस्ट दिसेल अन चवीला बी झकास लागेल
In reply to फोटो by शंकरराव
शंकरराव,
भातावर खोबरं घालून त्यावर काजू ठेवला आहे.
कोथीबीर टाकली तर लई बेस्ट दिसेलनक्कीच.. तसे कृतीमध्ये सांगितले आहेच.. पण काय करणार आमच्या इथे कोथिंबीर मिळतेच असं नाही. म्हणून मी वरून कोथिंबीर घातली नाही. :) --शाल्मली.
अरे वा आता केला पाहीजे.
फक्त भोपळी मिरचीपेक्षा तोंडली असलेला मसालेभात "ऑथेंटीक" वाटतो मला. :-) कोबीदेखील अनैच्छीक :-)
In reply to सही by सहज
फक्त भोपळी मिरचीपेक्षा तोंडली असलेला मसालेभात "ऑथेंटीक" वाटतो मला.तोंडली घालूनही मसालेभात छानच लागतो. तश्या ह्या भातात फ्लॉवर, कोबी, भो.मिरची, वांगी कोणत्याही भाज्या छानच लागतात. डाळिंब्या घालूनही हा भात मस्त लागतो.
कोबीदेखील अनैच्छीकओक्के. मग तुम्ही कोबी वगळूनच टाका.. :) --शाल्मली.
वाटलेला मसाला आणि पुन्हा गरम मसाला?? हे दोन्ही घातलं तर एकदम घशाला जळजळीत नाही का वाटणार? कारण वाटणात काळी मिरी, लवंग आणि दालचिनी आहेच ना.
भाताचा रंग एकदम छान आला आहे.
भाज्यामध्ये, फ्लॉवर, गाजर, मटार, भोपळी मिरची, कोबी.. जितक्या असतील तितक्या छान लागतात. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा !!
फोटो एकदम छान
गरमागरम मसालेभात त्यावर तूप म्हणजे मेजवानीच :)
चकली
http://chakali.blogspot.com
आजच करतो....फक्त एक प्रश्न की गोडा मसाला आणि गरम मसाल्यामध्ये काय फरक आहे ??
मला तर स्वप्नातही भुक लागते....
In reply to तोंडाला पाणी सुटले.... by खादाड_बोका
गोडा मसाला आणि गरम मसाल्यामध्ये काय फरक आहे ??गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला जो भाजी-आमटीसाठी वापरतात. आणि गरम मसाला म्हणजे लवंग, मिरी, दालचिनी, धने, जिरे, शहाजिरे, वेलदोडा यापासून करतात तो. आणि वाटणात लवंग, मिरी, दालचिनी हे पदार्थ वाटणात असल्याने गरम मसाला घालताना त्या अंदाजाने घालावा. अथवा चव बघून मग त्या प्रमाणात घालावा. --शाल्मली.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
पाकृ आणि फोटो सुंदर.
गरम मसाला जर थोडा परतला गेला तर त्याचा स्वाद चांगला येतो. म्हणून, गरम मसाला फोडणीत आणि उकळी आली की गोडा मसाला, असा बदल केला तर?
भोपळी मिरची सोबतच वांगीदेखिल चालू शकतील, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आज काय विशेष शाल्मलीबाई?
ही पाकृ न आवडणारा माणूस(ह्यात बायकाही आल्या) विरळाच!
आज एकदम मसालेभात, जिलबी असे पदार्थ मिपावर बघून भारतात असल्यासारखं वाटतय.
मीही मसालेभात जवळजवळ अश्याच पद्धतीने करते. गरम मसाला किंचितच घालते.
भाज्याही बदलून कधी कोबी तर कधी तोंडली घालते (जी भाजी असेल ती..).
फोडणीनंतर घातलेला प्रत्येक पदार्थ चांगला परतला जाणे महत्वाचे नाही का?:)
फोटू छान आलाय.
गरम भाताबरोबर टोमॅटोचं सार.;) छानच.
रेवती
In reply to आज काय by रेवती
मीही मसालेभात जवळजवळ अश्याच पद्धतीने करते. गरम मसाला किंचितच घालते.
भाज्याही बदलून कधी कोबी तर कधी तोंडली घालते (जी भाजी असेल ती..).
फोटू छान आलाय
असेच म्हणते,,, :)
---वल्लरी
फोटू पाहून शेवटच्या घटका मोजू लागलो..!
पाकृ आणि फोटू, दोन्हीही जबरा...! :)
शाल्मलीतै, येऊ द्यात प्लीज अजूनही अश्याच बहारदार पाकृ!
तात्या.
व्वा..तोंडाला पाणि सुट्ले. पण भाता वरती घात्लेल्या 'सॉसेज' ची पाक्रू कुठे आहे :)
In reply to सॉसेज ? by रामोजी
सॉसेज नव्हे रामोजी ते. मला तर तो किसलेला नारळ आणी त्यावर तळलेला काजु दिसतोय. सॉसेज मांसाहारी पदार्थ आहे आणि सॉसेजच्या शक्यतो चकत्या असतात.
लिखाळशेट,
मज्जा चाल्लीये.
-- सर्किट
रेसिपीही छान आहे...त्यात कांदा-लसूण नसल्यामुळे नैवेद्याच्या ताटामधे याचे स्थान असायचे, माझी आई नेहमी असाच भात करते, पण फक्त मटार, आणि कोबी किंवा तोंडली वापरते..गरम मसाला वापरत नाही..त्यामुळे हा भात कमी तिखट लागतो. घशाला त्रास होत नाही..
मस्त दिसतोय मसालेभात! फोटो पाहून (बहुतेक सर्व लग्नांच्या) आठवणी जागृत झाल्या.
शाल्मलीताई,
पाककृती मस्तच आणि फोटो तर सुंदरच..
आम्ही असा मसालेभात सोलकढी बरोबर खातो. मस्त लागतो. :)
सर्व खवय्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
:)
--शाल्मली.
झक्कासच...