२०१७ विधानसभा निवडणुक - पंजाब, मणीपूर, उत्तराखंड, गोवा
(१) पंजाब
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा ११७ काँग्रेस ४६ जागा (४०.०९ % मते), अकाली दल ५६ जागा (३४.७३ % मते) + भाजप १२ जागा (७.१८ % मते) = एकूण ६८ जागा (४१.९१% मते) बसप शून्य जागा (४.७३ % मते) पीपल्स पार्टी इन पंजाब (५.०४ % मते) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा १३ काँग्रेस ३ जागा (३३.१० % मते), अकाली दल ४ जागा (२६.३० % मते) + भाजप २ जागा (८.७० % मते) = एकूण ६ जागा (३५.०० % मते) आआप ४ जागा (२४.४० % मते) या दोन्ही निवडणुकीवरून असे दिसते की काँग्रेस व अकाली दल-भाजप यांच्यात जेमतेम १.९० % मतांचा फरक आहे. २०१२ व २०१४ मधील मुख्य फरक म्हणजे पंजाबच्या राजकारणात आआपचा प्रवेश. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आआपने तब्बल २४.४० % मते मिळवून १३ पैकी ४ खासदार निवडून आणले होते. पंजाबच्या राजकारणात १९६६ पासून सातत्याने अकाली दल व काँग्रेस एकाआड एक निवडणुकात सत्ता मिळवित होते. ही परंपरा २००७ पर्यंत सुरू राहिली. २०१२ मध्ये ही परंपरा खंडीत झाली व अकाली दल-भाजप युती २००७ पाठोपाठ २०१२ मध्ये सुद्धा निवडून आली. परंतु आता खूप बदल झाला आहे. सलग १० वर्षे सत्तेत असल्याने या सरकारविरूद्ध प्रस्थापितविरोधी लाट मोठ्या प्रमाणात आहे. आआपच्या स्वरूपात एक अजून पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे निवडणुक अतिशय रंगतदार झाली आहे. आपल्याला किमान ९०-१०० जागा मिळतील अशी हवा आआपने गेले वर्षभर निर्माण केली होती. परंतु त्यात तथ्य नाही. आआप म्हणजे निव्वळ नाटकीपणा हे सर्वत्र दिसून येत आहे. दिल्ली निवडणुकीप्रमाणे आआपने पंजाब्यांना देखील भरमसाठ आश्वासने दिली आहेत. शालेय विद्यार्थ्याना लॅपटॉप, मालमत्ता कर रद्द करणे, दलित उपमुख्यमंत्री, ५ रूपयात पोटभर जेवण, वीजदरात ५०% घट, सर्व नागरिकांना खाजगी इस्पितळात ५ लाखापर्यंत कॅशलेस आरोग्यविमा, वाळू व दारू विक्रीचे परवाने युवकांना देणार, शेतकर्यांना कर्जमाफी, उद्योगांना प्रति युनिट ५ रूपये दराने वीज, सर्वत्र मोफत वायफाय . . . अशी भरमसाठ अव्यवहारी आश्वासने आआपने दिली आहेत. या निवडणुकीत अकाली दल-भाजप युतीचा पराभव नक्की मानला जातो. परंतु राजकारणात काहीही घडू शकते. भाजपने १ महिन्यांपूर्वीच चंदिगड महापालिकेत २६ पैकी २० जागा जिंकल्या आहेत. केजरीवाल व आआपच्या नेत्यांच्या ढोंगीपणामुळे आआपची २०१४ ची हवा राहिलेली नाही. आआपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आपापसात खूप भांडणे आहेत. त्या तुलनेत काँग्रेस चांगल्या परिस्थितीत आहे. या सर्व प्रकारात सर्वात जास्त फजिती झाली असेल तर ती सिद्धूची. आआपच्या भरवशावर राहून सिद्धूने नियुक्त खासदारपद सोडून दिले. आआपने आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे व आपल्या पत्नीलासुद्धा तिकीट द्यावे ही त्याची मागणी होती. केजरीवालांनी त्याला झुलवत ठेवून शेवटी हातात ठेंगा दिला. त्यामुळे सिद्धूने आआपमध्ये न जाता स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर काँग्रेसशी बोलणी करून स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ज्या राहुलला सिद्धूने शाळेत जायचा सल्ला दिला होता व काँग्रेसवर अनेकवेळा कठोर शब्दात टीका केली होती, त्याच सिद्धूने राहुलची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे अशी त्याची मागणी होती. परंतु सर्व स्थिरस्थावर झाल्यावर राहुलने अमरिंदर सिंग हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केल्याने सिद्धूची जाहीर फजिती झाली आहे. माझ्या अंदाजानुसार, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल व अकाली दल-भाजप युती दुसर्या क्रमांकावर असेल. आआप तिसर्या क्रमांकावर असेल व आआपच्या पाठिंब्याने काँग्रेस सरकार स्थापन करेल. अकाली दलाबरोबरील युतीत भाजप ११७ पैकी फक्त २३ जागा लढवितो. त्यामुळे भाजपची वाढ खुंटली आहे. अकाली दलाच्या सर्व दोषांचे खापर भाजपला सहन करावे लागते. राज्यात वर्तमान सरकारविरोधी भावना असली तरी लोकभावना फक्त अकाली दलाविरूद्ध आहे, भाजपविरूद्ध नाही. या निवडणुकीनंतर भाजपने अकाली दलाशी फारकत घेऊन स्वतंत्रपणे उभे राहिले पाहिजे. __________________________________________(२) मणीपूर
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा ६० काँग्रेस ४२ जागा (४२.४२ % मते), भाजप शून्य जागा (२.१२ % मते) राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा (७.२३ % मते) भाकप शून्य जागा (५.७८ % मते) तॄणमूल काँग्रेस ७ जागा (१७.०० % मते) मणिपूर स्टेट काँग्रेस पक्ष ५ जागा (८.३९% मते) नागा पीपल्स फ्रंट ४ जागा (४.५० % मते) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा २ काँग्रेस २ जागा (४१.७० % मते), भाजप शून्य जागा (११.९० % मते) भाकप शून्य जागा (१४.०० % मते) नागा पीपल्स फ्रंट शून्य जागा (१९.९० % मते) एकंदरीत मणीपूरमध्ये राष्ट्रीय पक्षांबरोबरच अनेक प्रभावी स्थानिक पक्ष आहेत. १५ वर्षे उपोषण केल्यामुळे प्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडून राज्याच्या राजकारणात पडण्याचा निर्णय घेतल्याचे वाचले होते. मणीपूरच्या राजकारणाची मला फारशी माहिती नाही. ऑक्टोबर २०१६ मधील इंडिया टुडे-अॅक्सिस च्या सर्वेक्षणानुसार भाजप ४०% मते मिळवून ३१-३५ जागा मिळवेल व कॉंग्रेस ३७% मते मिळवून १९-२४ जागा मिळवेल असे भाकीत केले होते. हे भाकीत खूपच अविश्वसनीय आहे कारण इतर २-३ संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला दोन आकडी जागा मिळताना सुद्धा दाखविलेल्या नाहीत. _____________________________________________________________________ (३) उत्तराखंड २०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा ७० काँग्रेस ३२ जागा (३३.७९ % मते), भाजप ३१ जागा (३३.१३ % मते) बसप ३ जागा (१२.१९ % मते) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा ५ काँग्रेस शून्य जागा (३३.०९ % मते), भाजप ५ जागा (५५.३२ % मते) बसप शून्य जागा (४.७३ % मते) २०१२ मध्ये भाजप व काँग्रेस यांना जवळपास सारखीच मते पडली होती व काँग्रेसला फक्त १ जागा जास्त मिळाली होती. बहुमतासाठी काँंग्रेसला ४ जागा कमी होत्या. बसपच्या ३ आमदारांनी व ३ अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला सरकार स्थापन करता आले होते. हरीश रावत अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदासाठी धडपड करीत होते. परंतु त्यांना डावलून काँग्रेसने विजय बहुगुणा यांना निवडण्याची चूक केली. २०१३ मध्ये झालेल्या केदारनाथ येथे आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले. एकूण किती जण वाहून गेले याचा अचूक आकडा अजूनही माहिती नाही. पुनर्वसनात विजय बहुगुणा पूर्ण अपयशी ठरले. त्यानंतर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने तब्बल ५५ % हून अधिक मते मिळवून सर्व ५ जागा जिंकल्या. काँग्रेसला जवळपास विधानसभएवढीच ३३% मते मिळाली. त्यामुळे बहुगुणांना हटवून काँग्रेसने हरीश रावतना मुख्यमंत्रीपदी नेमले. नाराज बहुगुणांनी बंड केल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट आली. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्याची चूक करून बहुगुणांना जवळ केले. नंतर न्यायालयाने हरीश रावतांची पुनर्स्थापना केल्याने भाजप तोंडघशी पडला. उत्तराखंडमध्ये दर ५ वर्षांनी राजवट बदलते असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यानुसार यावेळी भाजपला संधी आहे. यावेळी उत्तराखंडमध्ये भाजप साधे बहुमत मिळवून सत्ता मिळवेल असा माझा अंदाज आहे. ____________________________________________ (४) गोवा २०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा ४० काँग्रेस ९ जागा (३०.७८ % मते), भाजप २१ जागा (३४.६८ % मते) + मगोप ३ जागा (६.७२ % मते) = एकूण २४ जागा (एकूण ४१.४० % मते) राष्ट्रवादी काँग्रेस शून्य जागा (४.०८ % मते) गोवा विकास पक्ष २ जागा (३.५० % मते) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती - एकूण जागा २ काँग्रेस शून्य जागा (३६.६० % मते), भाजप २ जागा (५३.४० % मते) विधानसभेसाठी भाजपने मगोपबरोबर युती करून बहुमत मिळविले होते. लोकसभेत भाजपने तब्बल ५३ % मते मिळवून दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आता परिस्थिती बदलली आहे. २०१२ मध्ये मनोहर पर्रीकरांचा चेहरा समोर होता. आता लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत. त्यांची लोकप्रियता पर्रीकरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मगोपने साथ सोडली आहे. संघाच्या गोवा प्रांताचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी राजभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून बंड करून भाजपविरूद्ध उमेदवार उभे केले आहेत. त्यासाठी त्यांनी मगोप व शिवसेनेबरोबर युती केली आहे. एकंदरीत भाजपला निवडणुक अवघड आहे. परंतु याचा काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. मतदारांना लुभावण्यासाठी मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्यात परतू शकतात असे संदिग्ध विधान करून भाजपने संभ्रम निर्माण केला आहे. जरी भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळाले तरी पर्रीकर केंद्रीय संरक्षण मंत्री हे महत्त्वाचे पद सोडून गोव्यासारख्या अत्यंत लहान राज्यात परतण्याची शक्यता अत्यल्प आहे. एकंदरीत भाजपने मतदारांना हूल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या अंदाजानुसार यावेळी गोव्यात कोणालाही बहुमत मिळणार नाही व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल. _________________________________________________________________________________________________ उत्तराखंड वगळता इतर राज्यात हंग विधानसभा असेल असा माझा अंदाज आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीवर जमल्यास वेगळा लेख लिहीन.In reply to संतुलित धागा हो गुरुजी by वरुण मोहिते
In reply to गोवा by गॅरी ट्रुमन
त्याच फोटोवरील प्रतिसादांमध्ये अनेकांनी हा फोटो मोदींची सभा सुरू होण्यापूर्वी बराच वेळ घेतला होता असे म्हटले. एकाने तर मोदींच्याच सभेचा खालील फोटो पोस्ट केला---
खरी परिस्थिती काय आहे समजायला मार्ग नाही. अर्थातच केजरीवाल हा ढोंगी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. नोटबंदीच्या काळात मध्य प्रदेशात एक चोर बँकेत दरोडा घालायच्या उद्देशाने रात्री घुसला आणि बाहेर पोलिस आले आहेत हे समजताच त्याने आत्महत्या केली. केजरीवालांनी हा फोटो "नोटबंदीमुळे पाहिजे तितक्या नोटा न मिळाल्यामुळे व्यथित झालेल्या नागरीकाने आत्महत्या केली" असे बिनदिक्कतपणे खोटे ट्विटवर पोस्ट करून टाकले . असा माणूस आणि असा पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो याविषयी अजिबात शंका नाही.In reply to गोवा आणि आआप by गॅरी ट्रुमन
In reply to केजरीवाल जरी दिल्लीचे अधिकृत by श्रीगुरुजी
In reply to नवीन नवीन नाही by वरुण मोहिते
In reply to केजरीवाल जरी दिल्लीचे अधिकृत by श्रीगुरुजी
केजरीवाल जरी दिल्लीचे अधिकृत मुख्यमंत्री असले तरी त्यांनी ऑगस्टपासून दिल्लीत फारच कमी वेळ घालविला आहे असं दिसतंय.हो आताही परत केजरीवाल ट्रिटमेन्टसाठी बंगलोरला गेले आहेत. अन्यथा जगभरात यांच्या मोहल्ला क्लिनिकचे डंके पिटले जात असतात.जगात कोणीकोणी या मोहल्ला क्लिनिकविषयी काय काय बोलले हे केजरीवाल लगेच टिवटिवाट करून सांगत असतात.पण स्वतः उपचार घ्यायला मात्र मोहल्ला क्लिनिक सोडून दुसरीकडे जातात. बहुदा मोहल्ला क्लिनिकमध्ये हृदय, यकृत, किडनी इत्यादी ट्रान्सप्लॅन्टपेक्षा कमी गुंतागुंतीचे उपचार केले जात नसावेत म्हणून केजरीवाल स्वत:चा उपचार करायला मात्र दुसरीकडे जातात.
In reply to उत्तरप्रदेश साठी वेगळा धागा by श्रीगुरुजी
यावेळी सप-कॉंग्रेस युती प्रथम क्रमांकावर असेल असा माझा अंदाज आहे. भाजप दुसर्या व बसप तिसर्या क्रमांकावर असेल. जर सप-काँग्रेस युतीला बहुमत मिळाले नाही तर पुन्हा एकदा भाजप-बसप ही युती निवडणुक पश्चात होईल. अजितसिंगाच्या रालोदला बर्यापैकी जागा मिळाल्या तर त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळविला जाईल.यापैकी काहीही झाले तर भाजपचे कठिण आहे एकंदरीत. बसपाला तीन वेळा पाठिंबा देऊन भाजपनेच बसपाला इतके मोठे होण्यात मदत केली. हा प्रकार चौथ्यांदा होणार असेल तर "गॉड सेव्ह बीजेपी". तसेच पूर्वीच्या तीन वेळी भाजपने पाठिंबा दिला आणि मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या. यावेळी भाजप बसपाला पाठिंबा देणार नाही तर बसपाचा पाठिंबा घेईल कारण आकडे तसे असतील. आणि मायावती किती बेभरवशाच्या आहेत आणि त्या कधीही पाठिंबा काढतील हे नक्की. मग एकतर सत्ता गमावावी लागेल नाहीतर १९९७-९८ मध्ये कल्याणसिंगांनी केला तसा सत्तेचा अश्लाघ्य खेळ खेळावा लागेल. कल्याणसिंगांनी केलेल्या त्या प्रकारामुळे पक्षाचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मोदींमुळेच भाजप उत्तर प्रदेशात एवढ्या जागा जिंकू शकला. अन्यथा १० जागा जरी मिळवता आल्या असत्या की नाही कोणास ठाऊक. आणि मायावतींना बरोबर घेतले तर बिहारमध्ये रामविलास पासवानांचा पक्ष दूर जाईल. म्हणजे शेवटी धुपाटणेही हाती लागायचे नाही भाजपच्या. ज्या पध्दतीने पहिल्यांदा काँग्रेसला आणि मग भाजपला सत्तेपासून रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने केवळ आपल्यालाच दिली आहे या गैरसमजातून समाजवादी विचारांच्या पक्षांनी सुरवातीला जनसंघ/भाजप आणि नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला त्याप्रमाणेच उत्तर प्रदेशात स्थिर सरकार मिळावे ही जबाबदारी प्रभू रामचंद्राने केवळ आपल्यालाच दिली आहे या गैरसमजातून भाजपने बसपाशी हातमिळवणी केली आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. अजितसिंगांचा पाठिंबा घेणे हा दुसरा मूर्खपणा ठरेल. हा मनुष्य वि.प्र.सिंगांपासून मनमोहनसिंगांपर्यंत चंद्रशेखर यांचा अल्प कालावधी वगळला तर प्रत्येक सरकारमध्ये कधीनाकधी मंत्री होता. दिल्लीत सत्तेत कोणीही असू दे. अजितसिंग मंत्री असणे पक्केच असायचे.लोकांनी २०१४ मध्ये असल्या घाणेरड्या प्रकाराविरूध्द मते दिली होती. भाजप परत तेच करणार असेल तर कदाचित तात्कालिक फायद्यासाठी दीर्घकालीन हिताला धक्का पोहोचवेल. असे काही होणार नाही हीच इच्छा आणि अपेक्षा. जर भाजपला सत्ता मिळणार नसेल तर सरळ सपा-काँग्रेसला बहुमत मिळावे. असली टांगलेली अवस्था नको.
In reply to असे काही होऊ नको दे हिच इच्छा आणि अपेक्षा by गॅरी ट्रुमन
केजरीवाल व आआपच्या नेत्यांच्या ढोंगीपणामुळे आआपची २०१४ ची हवा राहिलेली नाही.मी चंदीगड मध्ये गेल्या तीन वर्षांपासून आहे, ह्या वाक्याशी मी बिलकुल सहमत नाही... जे २०१४ मध्ये भांडत होते ते आता आप मध्ये नाही ... माझ्या ऑफिस मध्ये जे कट्टर अंधभक्त (तुमच्यासारखे) आहेत ते सुद्धा मानतात कि पंजाब मध्ये आप १००% आहे. ट्विटर वर अरविंद केजरीवाल आणि भगवन्त मान ला फालो करा खरी परिस्थिती कळेल. पेड मेडिया ह्यातला काहीही दाखवत नाही. याउलट bjp आणि काँग्रेस च्या सभेत लोक पैसे देऊनही येत नाहीत.
In reply to पंजाब - सहमत नाही by कर्ण
पेड मेडिया ह्यातला काहीही दाखवत नाही.मिडिया आआपला दाखवत नाही?
याउलट bjp आणि काँग्रेस च्या सभेत लोक पैसे देऊनही येत नाहीत.हे चांगलं आहे. चांगले पक्ष असावेत हे दोन्ही.
In reply to पंजाब - सहमत नाही by कर्ण
In reply to पंजाब - सहमत नाही by कर्ण
ट्विटर वर अरविंद केजरीवाल आणि भगवन्त मान ला फालो करा खरी परिस्थिती कळेल.ट्विटर वर फॉलोकरून दिसणारी परिस्थिती खरी मानणाऱ्या लोकांचं कौतुक करावा तेवढं थोडं वाटतं! ट्विटर हे उपलब्ध असलेल्या सर्व सोशल मेडियांपैकी सर्वात निगेटिव्ह मीडिया आहे असे माझे मत बनले आहे. कुठल्याही क्षणी ट्रेंडिंग काय आहे पहिले कि एकतर "आपटार्ड" लोकांनी मोदींना शिव्या घातल्या असतात नाहीतर "भक्त" लोकांनी केजरीवालांना शिव्या घातल्या असतात. कमीत कमी शब्दात कमल अपमान करण्याचे माध्यम बनले आहे. बाकी चंदिगढमध्ये आआपची हवा आहे तर मग चंदिगढमध्ये भाजपने २६ पैकी २० जागा कशा काय जिंकल्या काय माहित?
In reply to ट्विटर वर अरविंद केजरीवाल आणि by हतोळकरांचा प्रसाद
ट्विटर वर फॉलोकरून दिसणारी परिस्थिती खरी मानणाऱ्या लोकांचं कौतुक करावा तेवढं थोडं वाटतं!हो ना. मी पण ट्विटरवर केजरीवालांना फॉलो करतो. मग त्या न्यायाने मी पण केजरीवाल समर्थक झालो की काय? :) :)
In reply to ट्विटर वर अरविंद केजरीवाल आणि by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दिल्ली & पेड मेडिया by कर्ण
In reply to दिल्ली & पेड मेडिया by कर्ण
In reply to गोव्यात तब्बल ८३% तर by श्रीगुरुजी
In reply to गोव्यात ८१ चं ८३ झालय. हा फार by अनुप ढेरे
पंजाबमध्ये तब्बल ७०% इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय.पंजाबमध्ये मागच्या वेळी ७८.६% इतके मतदान झाले होते. म्हणजे मागच्या वेळच्या तुलनेत मतदान कमी झालेले दिसते. अर्थातच पंजाबात अकाली निवडून येतील असे काही मला म्हणायचे नाही पण तो मुद्दा मांडायला आजच्या मतदानाची आकडेवारी पुरेशी नाही.
In reply to मागच्या वेळी आणखी जास्त मतदान झाले होते by गॅरी ट्रुमन
In reply to उ. प्र. च्या ७३ विधानसभा by श्रीगुरुजी
In reply to उत्तर प्रदेश मतदानाचा पहिला टप्पा by गॅरी ट्रुमन
In reply to डॉ. प्रवीण पाटील यांनी खूपच by श्रीगुरुजी
In reply to डॉ. प्रवीण पाटील यांनी खूपच by श्रीगुरुजी
In reply to उत्तर प्रदेश मतदानाचा पहिला टप्पा by गॅरी ट्रुमन
पण जागरण सारख्या उत्तर प्रदेशातील हिंदी पेपरच्या वेबसाईटवरही पहिल्या टप्प्यात भाजप पुढे असेल असे म्हटले जात आहे. अर्थातच जागरण आणि समाजवादी पक्ष यांचे वैर बरेच जुने आहे त्यामुळे नुसत्या त्या बातमीवर विसंबून चालणार नाही.'जागरण' अडचणीत सापडले आहे. मतदान सर्व मतदारसंघात पूर्ण होण्याआधीच पहिल्या फेरीच्या मतदानावर आधारीत "मतदानोत्तर चाचणी"चे आकडे घोषित केल्यामुळे निवडणुक आयोगाने त्यांच्याविरूद्द प्राथमिक चौकशीचा अहवाल दाखल केला आहे.
In reply to उत्तर प्रदेश मतदानाचा पहिला टप्पा by गॅरी ट्रुमन
In reply to डॉ. प्रवीण पाटील यांनी दुसर् by श्रीगुरुजी
१. बिहारमध्ये २०१४ मध्ये जदयु आणि राजद वेगवेगळे लढले त्यामुळे भाजपला विजय मिळाला पण जदयु, राजद आणि काँग्रेस यांना भाजपपेक्षा ६% मते जास्त मिळाली होती. त्यामुळे ही युती झाल्यावरच भाजप बॅकफूटला गेला होता (असे काही होईल असे त्यावेळी वाटले नव्हते पण आता लक्षात येते). तर उत्तर प्रदेशात मात्र २०१४ मध्ये सप+काँग्रेस ही मते एकत्र केली तरीही त्यापेक्षा ६% जास्त मते भाजपला होती.अगदी बरोबर. किंबहुना नोव्हेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पराभूत व्हायचे एकमेव कारण होते ते म्हणजे राजद, संजद व खांग्रेस यांच्या मतांची झालेली बेरीज. २०१४ च्या लोकसभेत संजद वेगळा लढल्याने संजद (१८%), राजद + खांग्रेस (२८%) व भाजप+ (३८%) असे विभाजन होऊन भाजप+ ने ४० पैकी ३२ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत संजद+राजद्+खांग्रेस यांची एकत्रित मते ४६% होती तर भाजप ८% मतांनी मागे होता. प्रत्यक्षात इतर स्थानिक पक्ष व अपक्षांमुळे दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी ४% मते गमाविली. त्यामुळे भाजप+ ३४% व राजद+संजद+खांग्रेस ४२% असे विभाजन होऊन भाजपचा दारूण पराभव झाला. अर्थात दोघांमधील ८% मतांचा फरक कायम राहिला. मोहन भागवतांचे राखीव जागांवरील वक्तव्य, असहिष्णुता व पुरस्कार-परती इ. मुळे भाजपचा पराभव झाला या दाव्यात अजिबात तथ्य नाही. भाजपविरोधातील मते एकवटल्यामुळेच भाजपचा पराभव झाला होता.
In reply to आजचे मतदान by गॅरी ट्रुमन
In reply to वाराणसीत होणार्या भाजपाच्या by प्रसाद_१९८२
उत्तराखंड