सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
Taxonomy upgrade extras
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती
तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती
सुखाची काळजी काही करावी लागली नाही
मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती
भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?
तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?
सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की
बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती
खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला
कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
वाचने
2820
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
खल्लास! एक अत्यंत सशक्त व दर्जेदार काव्य वाचल्याचा आनंद मिळाला.
ओंकारा, जियो..! या सुंदर काव्याकरता तुला माझ्याकडून एका संध्याकाळी दारू सप्रेम भेट! भेटू लौकरच पुण्यात..! :)
तात्या.
छान गजल !!
येउ देत अजुन देखील !!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
++++++++++++++++
मस्तच ....
--अवलिया
In reply to +१ by अवलिया
सुंदर गजल!
हातच्याचा शेर विशेष आवडला.
चतुरंग
सुंदर...!
छान रे ॐकार .. आवडली गझल.
आवडली गझल !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मतल्याचा शेर आवडला खूपच...
>> तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
हा शेरही खूप आवडला.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
In reply to सुरेख गझल by संदीप चित्रे
खूप आवडली गझल.
हातच्याचा शेर खास.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुझ्या