वीरगळ
महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ.
वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.
उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना. वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत.
काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला.
महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.
१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ
२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ
३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ
गधेगाळ
ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्याचशा पुसट झालेल्या आहेत.
रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.
अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील गधेगाळ
६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)
संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.

वाचने
70899
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय उत्तम माहीती!
छान लेख
लेख नेहमी प्रमाणे चांगला...
उत्तम लेख.
+१
In reply to उत्तम लेख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लेख!
वल्ली, महाराष्ट्रातील काही
नाही. गाळीव च आहे. वीरगळ व
In reply to वल्ली, महाराष्ट्रातील काही by किसन शिंदे
मस्त माहिती.
माहितीपूर्ण लेख !!
मस्त हो वल्ली :)छान
नवीन माहिती...
मस्त हो वल्लीशेठ!
लै भारी
कारण असेच शाप आम्ही काही
In reply to लै भारी by अन्या दातार
आम्हीपण समस्त प्राणिसृष्टीचा
In reply to लै भारी by अन्या दातार
'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि
In reply to लै भारी by अन्या दातार
अन ही उज्ज्वल परंपरा जतन
In reply to 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि by यसवायजी
मस्त लिहिलं आहेस रे., या
मस्त संकलन रे
छान माहीती
वीरगळ माहिती होता. हे गधेगाळ
तुळजापूर मंदिराबाहेर पण आशी एक गधेगाळ
अशा काही
फारच उत्कृष्ट माहिती.. बादवे
+१
In reply to फारच उत्कृष्ट माहिती.. बादवे by गवि
सतीशिळा पण वीरगळासारखीच असते.
In reply to फारच उत्कृष्ट माहिती.. बादवे by गवि
शंकानिरसनाबद्दल आभार रे..
In reply to सतीशिळा पण वीरगळासारखीच असते. by प्रचेतस
वीरगळ ठाऊक होते
अजुन एका विशयाची छान माहीती
विरगळाच्या उभ्या तिन
In reply to अजुन एका विशयाची छान माहीती by स्वच्छंदी_मनोज
धन्यवाद
In reply to विरगळाच्या उभ्या तिन by प्रचेतस
>>विरगळाच्या उभ्या तिन
In reply to विरगळाच्या उभ्या तिन by प्रचेतस
असे असूही शकेल किंवा असेच
In reply to >>विरगळाच्या उभ्या तिन by बॅटमॅन
वल्ली द ग्रेट.. उत्तम माहिती
मस्त लेख वल्ली.. अजा
रोचक माहिती पण...
सुसंस्कृत व असंस्कृत तुम्ही
In reply to रोचक माहिती पण... by हुप्प्या
असहमत
In reply to सुसंस्कृत व असंस्कृत तुम्ही by शैलेन्द्र
छान लेख!
गालिप्रदान
गालिप्रदान
'वाचल्याची' नोंद करीत आहे !!!
सांप्रतकाळी चालू असलेल्या
चांगला लेख
In reply to सांप्रतकाळी चालू असलेल्या by धन्या
गधेगाळ आणि पूजा-अर्चा....
अज्ञान आणि अति देवभोळेपणा
In reply to गधेगाळ आणि पूजा-अर्चा.... by मुक्त विहारि
हा लेख वाचला नसता तर हा दगड कसला आहे हे मलाही कळलं नसतं.
In reply to अज्ञान आणि अति देवभोळेपणा by हकु
हे शासन कुणी भंग करील तेहाची
हो ना!
In reply to हे शासन कुणी भंग करील तेहाची by कैलासवासी सोन्याबापु
साहजिकच आहे... असणारच.
In reply to हो ना! by हकु
तेव्हाच्या काळातील गाळींवर
In reply to हो ना! by हकु
अलंगगडावरचा शिलालेख
हा लेख पहिल्यांदाच पाहात आहे.
In reply to अलंगगडावरचा शिलालेख by हकु
या पुस्तकात बहुदा अलंग
In reply to हा लेख पहिल्यांदाच पाहात आहे. by प्रचेतस
आज हे पुस्तक मराठी ग्रंथ
In reply to या पुस्तकात बहुदा अलंग by मनो
९ कुवली धान्य म्हणजे किती
नऊ कुवली म्हणजे नऊ मापे.
उखळीसारख्या आकाराचं पण लहान
In reply to नऊ कुवली म्हणजे नऊ मापे. by प्रचेतस
"आठवा" का? त्याचाही आकार
In reply to उखळीसारख्या आकाराचं पण लहान by सतिश गावडे
हो. बहुतेक तेच.
In reply to "आठवा" का? त्याचाही आकार by रुपी
ते तसं लहान मोठं बारमध्ये
In reply to हो. बहुतेक तेच. by प्रचेतस
चिपटं एकाच बाजूनं तोंड असलेलं
In reply to ते तसं लहान मोठं बारमध्ये by अभ्या..
अच्छा. हा आठवा पण आकाराने
In reply to चिपटं एकाच बाजूनं तोंड असलेलं by धनंजय माने
मराठी मोजमापे…१२
In reply to अच्छा. हा आठवा पण आकाराने by रुपी
२९ जून २०१६ च्या लोकसत्ता
कन्नडमधे संधी(?) होताना "क,त
In reply to २९ जून २०१६ च्या लोकसत्ता by मार्मिक गोडसे
तेच.
In reply to कन्नडमधे संधी(?) होताना "क,त by यसवायजी
वीरगळ
नाही हो.
In reply to वीरगळ by दिगोचि
नेहमीप्रमाणे उत्तम माहिती!
आजोबा गडावरील वीरगळ
माझ्या प्रतिसादाला मिळालेल उत्तर
निसटत्या बाजू
In reply to माझ्या प्रतिसादाला मिळालेल उत्तर by दिगोचि
प्रचेतस यानी मला दिलेल्या
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
मी 'नाही' म्हटलं ह्याचा अर्थ
In reply to प्रचेतस यानी मला दिलेल्या by दिगोचि
मी विचारांची चिकित्सा करतो
In reply to प्रचेतस यानी मला दिलेल्या by दिगोचि
प्रचेतस यानी मला दिलेल्या
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
जे उत्तर आज वाचले तेच जर
तुम्ही कुठे आहात आणि कुठे
In reply to जे उत्तर आज वाचले तेच जर by दिगोचि
वीरगळांचे दस्तावेजीकरण
कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली.
तुम्ही दुवा दिलेला दिसत नाही.
In reply to कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली. by उपयोजक
फोटो
In reply to कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली. by उपयोजक
हीच ती शिळा!
In reply to फोटो by उपयोजक
हा वीरगळ आहे. अतिशय सुस्थितीत
In reply to फोटो by उपयोजक
वीरगळच आहे. एस यांनी
In reply to हा वीरगळ आहे. अतिशय सुस्थितीत by एस
वीरगळ
हाय वल्ली. काल कराड आणि पुढे देवराष्ट्रला गेलो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव बघायचं होतं, तिथून जवळ असलेल्या देवराष्ट्रे या गावी गेलो. 'कृष्णकाठ' मधे उल्लेख आहे, म्हणून पुरातन महादेवाचे मंदिर बघायला गेलो, छान आहे, त्यास 'समुद्रेश्वर' म्हणतात. गावाचं दैवत म्हणून 'सागरोबा' असेही नाव आहे. तिथे बाहेर दोन वीरगळ दिसले. डोंगरातून तिथे पाणी झीरपत येते आणि एका खोलगट भागात पाणी साठवून असते, बारमाही पाणी असते म्हणे. तर, तिथे दोन वीरगळ दिसले.
एकावर काही आकार तर, एक पूर्ण सपाट दगड झाला होता. वीरगळ बघीतल्यावर, तुम्ही आणि तुमच्या धाग्याची आठवण झाली. मग छायाचित्र काढले. आता माहिती सांगावी. पण या वीरगळात तीन स्त्रिया दिसत आहेत. वर महादेवाची पींड दिसत आहे. बाकी खालील भाग सपाट झालेला दिसतो. सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. वीरगळ अनेक ठीकाणी दिसतात. छायाचित्र घ्यायचे राहून जाते. -दिलीप बिरुटे
धन्यवाद सर,
In reply to वीरगळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to धन्यवाद सर, by प्रचेतस