वीरगळ आणि गधेगाळ
३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ
गधेगाळ
ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्याचशा पुसट झालेल्या आहेत.
रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.
अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील गधेगाळ
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)
संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
In reply to उत्तम लेख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वल्ली, महाराष्ट्रातील काही by किसन शिंदे
In reply to लै भारी by अन्या दातार
कारण असेच शाप आम्ही काही मित्रमंडळींना देत असू*, पण कधीच प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.अरारा ! किती दिले त्याची गणतीच नाही रे ;-) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वल्ली: संकलन जबर्या.
In reply to लै भारी by अन्या दातार
In reply to लै भारी by अन्या दातार
In reply to 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि by यसवायजी
In reply to फारच उत्कृष्ट माहिती.. बादवे by गवि
In reply to फारच उत्कृष्ट माहिती.. बादवे by गवि
In reply to सतीशिळा पण वीरगळासारखीच असते. by प्रचेतस
In reply to अजुन एका विशयाची छान माहीती by स्वच्छंदी_मनोज
विरगळाच्या उभ्या तिन भागांपैकी वरच्या भागावर बहुधा पर्वती शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेली त्याचे कारण काय असावे?हे वीरगळ शिलाहारांच्या काळात जास्त करून उभारले गेले. शिलाहार शिवोपासक त्यामुळेही शिवलिंगाची पूजा दाखवली जात असेल. नक्की कारण सांगता येणार नाही.
जिथे विरगळ उभा केला जातो त्याच ठीकाणी त्या वीराला वीरमरण आले असे समजायचे की युद्धात विरमरण आलेल्या वीराचा त्याच्या मुळ गावात विरगळ उभा केला जायचा?वीरगळ हे गावांवर आलेले संकट परतून टाकणार्या वीरांच्या स्मरणार्थ उभारले जात असल्याने ज्या गावांमध्ये जिथे वीरगळ आहेत त्या गावांत युद्ध झाले असे समजायला काहीच प्रत्यवाय नसावा. गडांवर असलेले वीरगळ हे गडांवरच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीरांची स्मारके आहेत. तुमच्या फोटोतील साल्हेरच्या पायथ्याची शिळा हा वीरगळ आहे.
In reply to विरगळाच्या उभ्या तिन by प्रचेतस
In reply to विरगळाच्या उभ्या तिन by प्रचेतस
In reply to >>विरगळाच्या उभ्या तिन by बॅटमॅन
In reply to रोचक माहिती पण... by हुप्प्या
In reply to सुसंस्कृत व असंस्कृत तुम्ही by शैलेन्द्र

In reply to सांप्रतकाळी चालू असलेल्या by धन्या
In reply to गधेगाळ आणि पूजा-अर्चा.... by मुक्त विहारि
In reply to अज्ञान आणि अति देवभोळेपणा by हकु
In reply to हे शासन कुणी भंग करील तेहाची by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हो ना! by हकु
In reply to हो ना! by हकु
In reply to अलंगगडावरचा शिलालेख by हकु
In reply to हा लेख पहिल्यांदाच पाहात आहे. by प्रचेतस
पुण्यात असाल तर मंडळात अथवा डेक्कन कॉलेज येथे सचिन जोशी यांना विचारून पहा. मंडळात महेश तेंडुलकरही कदाचित भेटतील.
In reply to या पुस्तकात बहुदा अलंग by मनो
In reply to नऊ कुवली म्हणजे नऊ मापे. by प्रचेतस
उखळीसारख्या आकाराचं पण लहान असं ( hourglass shape)माझ्या लहानपणी हे माप मी प्रत्यक्ष वापरात असलेलं पाहीलेलं आहे. आदोली/आधोली (बहुतेक कशाच्या तरी अर्धे माप) म्हणायचे त्याला. आंब्याच्या हंगामात कातकरी बायका आंबे विकायला यायच्या. तेव्हा त्या आंब्यांचा मोबदला म्हणून या मापाने भात दिला जायचा त्या कातकरी बायकांना. आदोलीपेक्षा छोटे माप "निटवा" होते. तो बहुधा आदोलीच्याही अर्धा असावा.
In reply to उखळीसारख्या आकाराचं पण लहान by सतिश गावडे
In reply to "आठवा" का? त्याचाही आकार by रुपी
In reply to हो. बहुतेक तेच. by प्रचेतस
In reply to ते तसं लहान मोठं बारमध्ये by अभ्या..
In reply to चिपटं एकाच बाजूनं तोंड असलेलं by धनंजय माने
In reply to अच्छा. हा आठवा पण आकाराने by रुपी
वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ.वीरगळ मधील वीरचा संदर्भ समजला,परंतू कल्लू व गळ ह्यांची सांगड लागत नाही.
In reply to २९ जून २०१६ च्या लोकसत्ता by मार्मिक गोडसे
In reply to कन्नडमधे संधी(?) होताना "क,त by यसवायजी
In reply to वीरगळ by दिगोचि
In reply to माझ्या प्रतिसादाला मिळालेल उत्तर by दिगोचि
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
In reply to प्रचेतस यानी मला दिलेल्या by दिगोचि
In reply to प्रचेतस यानी मला दिलेल्या by दिगोचि
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
In reply to जे उत्तर आज वाचले तेच जर by दिगोचि
In reply to कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली. by उपयोजक
In reply to कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली. by उपयोजक

In reply to फोटो by उपयोजक
In reply to फोटो by उपयोजक
In reply to हा वीरगळ आहे. अतिशय सुस्थितीत by एस
हाय वल्ली. काल कराड आणि पुढे देवराष्ट्रला गेलो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव बघायचं होतं, तिथून जवळ असलेल्या देवराष्ट्रे या गावी गेलो. 'कृष्णकाठ' मधे उल्लेख आहे, म्हणून पुरातन महादेवाचे मंदिर बघायला गेलो, छान आहे, त्यास 'समुद्रेश्वर' म्हणतात. गावाचं दैवत म्हणून 'सागरोबा' असेही नाव आहे. तिथे बाहेर दोन वीरगळ दिसले. डोंगरातून तिथे पाणी झीरपत येते आणि एका खोलगट भागात पाणी साठवून असते, बारमाही पाणी असते म्हणे. तर, तिथे दोन वीरगळ दिसले.
![]() |
वीरगळ |
एकावर काही आकार तर, एक पूर्ण सपाट दगड झाला होता. वीरगळ बघीतल्यावर, तुम्ही आणि तुमच्या धाग्याची आठवण झाली. मग छायाचित्र काढले. आता माहिती सांगावी. पण या वीरगळात तीन स्त्रिया दिसत आहेत. वर महादेवाची पींड दिसत आहे. बाकी खालील भाग सपाट झालेला दिसतो. सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. वीरगळ अनेक ठीकाणी दिसतात. छायाचित्र घ्यायचे राहून जाते. -दिलीप बिरुटे
In reply to वीरगळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धन्यवाद सर, by प्रचेतस

अतिशय उत्तम माहीती!