भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.
सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.
तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.
जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.
तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.
तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.
अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.
एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.
आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.
पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).
तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.
अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.
अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा .... | लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
86698
प्रतिक्रिया
290
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम माहिती दिली आहे.
हा हा हा.
In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
फारच सही निरिक्षणे बुवा तुमचं !
In reply to हा हा हा. by नितिन थत्ते
संक्षी फारच चांगली स्मरणशक्ती बुवा तुमची
In reply to फारच सही निरिक्षणे बुवा तुमचं ! by संजय क्षीरसागर
असं कसं ट्रेमा ?
In reply to संक्षी फारच चांगली स्मरणशक्ती बुवा तुमची by ट्रेड मार्क
या सगळ्याचा मी कुठे राहतो याच्याशी काय संबंध?
In reply to असं कसं ट्रेमा ? by संजय क्षीरसागर
अरे वा !
In reply to या सगळ्याचा मी कुठे राहतो याच्याशी काय संबंध? by ट्रेड मार्क
चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही.....अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत.भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा . जाहीर आभारप्रदर्शन करू.इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीयेमग कार्ड कशासाठी वापरतात ? का कार्ड आणि कॅशलेसचा काही संबंध नाही ? फक्त पॉइंटस कलेक्शन आणि रिडमप्शन इतकाच कार्डचा उपयोग आहे ?भारतात चार्जेस न लागणारी
In reply to अरे वा ! by संजय क्षीरसागर
भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा .संक्षी, मागच्या वेळी सुद्धा मी याबद्दल सांगितले होते परंतु त्या धाग्यावर प्रतिसादांच्या रतिबात माझा प्रतिसाद हरवून गेला असावा. कार्ड चार्जेस हा विषय निघाल्यावर मी नोटबंदीनंतर माझे जुने स्टेटमेंट्स काढून परत एकदा डोळ्यात तेल घालून चेक केले. एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत. तसेचं इतर जे प्रायव्हेट बँकांचे कार्ड्स वापरतो त्यांना सुद्धा चार्ज पडलेला नाही.हे बघतो :
In reply to भारतात चार्जेस न लागणारी by गणामास्तर
एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत.आणि सांगतो. धन्यवाद !...
In reply to हे बघतो : by संजय क्षीरसागर
State Bank of India Credit
In reply to अरे वा ! by संजय क्षीरसागर
हा हा हा
In reply to हा हा हा. by नितिन थत्ते
माझा अनुभव
In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
रिगालीया कार्ड असं आहे होय?
In reply to माझा अनुभव by गॅरी ट्रुमन
एसभाऊ धन्यवाद
In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
नाही विरोध झाला नाही
In reply to एसभाऊ धन्यवाद by ट्रेड मार्क
आणखी दोनचारजणांनी त्यांचे
तिकडची आणि इकडची तुलना कशी करणार ?
In reply to आणखी दोनचारजणांनी त्यांचे by कंजूस
आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार्
In reply to तिकडची आणि इकडची तुलना कशी करणार ? by संजय क्षीरसागर
पत हे सिबिल स्कोरच्या अँगलनं म्हटलेलं नाही
In reply to आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार् by सुबोध खरे
कर्ज हे ओझं आहे हे विचार
In reply to पत हे सिबिल स्कोरच्या अँगलनं म्हटलेलं नाही by संजय क्षीरसागर
प्रतिष्ठा
In reply to पत हे सिबिल स्कोरच्या अँगलनं म्हटलेलं नाही by संजय क्षीरसागर
ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे !
In reply to प्रतिष्ठा by ट्रेड मार्क
आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही.प्रश्न मालमत्तेचा नाही, कर्ज नसण्याचायं. क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही. त्यामुळे माझा सिबील स्कोर निघणं शक्य नाही. पण माझी बॅलन्सशीटस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटस इतके स्ट्राँग आहेत की कोणतीही बँक सिबील रेटींग फाट्यावर मारुन मला हवं तितकं कर्ज (त्यांच्या नॉर्मसमधे) द्यायला एका पायावर तयार होईल, नव्हे आहेच. म्हणजे ज्याला कर्जच नकोयं त्याची फिनान्शियल पत (किंवा प्रतिष्ठा) कर्जबाजारी व्यक्तीपेक्षा जास्त आहे. आता प्रतिष्ठा थोडी बाजूला ठेवून, डोक्यावर कर्जाचं ओझं असणारा आणि नसणारा यांच्या जगण्यातला फरक बघा. मी कधीही डोळे उघडल्याशिवाय उठत नाही. वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी माझा नाममात्र संबंध आहे. मी घड्याळ वापरत नाही. सकाळी बेसिक गोष्टी आवरल्या की योगासनं करुन मी कामाला नाही, खेळायला जातो. खेळून झाल्यावर मूड असेल तर काम करतो नाही तर पत्नी समवेत भटकायला जातो किंवा गाणी वाजवत बसतो. काम हा माझा छंद आहे कंपल्शन नाही आणि तरीही सगळी कामं वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. इथलेच काही सदस्य क्लायंट आहेत त्यांना कल्पना आहे, त्यामुळे वेगळ्या पुराव्याची गरज नाही . अगदी फारच मूड असेल तर तीला घेऊन सरळ जवळच्या रिसॉर्टला दोन/तीन दिवस ट्रीपला जातो. मजबूत भूक लागल्याशिवाय मी कधीही जेवत नाही आणि जेवण हा जवळजवळ तासभर चालणारा रसोत्सव असतो, नुसता आयटम टिकमार्क झाला असं नाही. इएमायची भानगडच नाही त्यामुळे आनंद हीच जीवनाची दिशा आहे. इतके वाजले, उद्या उठायचंय म्हणून आता झोपा हा प्रकार नाही. गडद्द झोप आल्याशिवाय झोपत नाही आणि दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन आला तरी घरचे झोपलेत म्हणून सांगतात, उठवत नाहीत. मला रेग्युलर बेसीसवर कोणतीही मेडीकल टेस्ट करायची कधीही गरज भासलेली नाही आणि काहीही पथ्यपाणी करायला लागत नाही. कर्ज नाही त्यामुळे भविष्यकाळाची फिकीर नाही. सगळं जीवन मनसोक्त जगायला उपलब्ध असलेला निव्वळ वर्तमान काळ आहे. याशिवाय हवी ती वस्तू हव्या त्या वेळेला घेण्याची क्षमता आहे. आता कर्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं , का अक्कलहुशारीनं असलेल्या साधन संपत्तीत आवश्यक ती खरेदी करत कर्जमुक्त आणि स्वच्छंद जगायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे.र्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं ,का अक्कल
In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
विचारसरणीतला फरक आहे !
In reply to र्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं ,का अक्कल by सुबोध खरे
२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे.त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल ! आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे.या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला.पूर्णपणे स्वेच्छेनं काम करुन सुद्धा, माझ्या मुलाला (गरज असल्यास) सध्याच्या किंमतीत मी नवं घर घेऊ शकतो. आणि घर घेऊन दिल्यावर सुद्धा माझ्या जीवनशैलीत कणमात्र फरक पडणार नाही कारण मला भविष्याची कधीही चिंता नाही. भविष्य ही कल्पना आहे आणि केवळ वर्तमानच जगायला आणि उपभोगायला उपलब्ध आहे. वर्तमानात धमाल करत जगण्याची कला जमून गेली आहे.आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे.या क्षणात समोर असलेल्या प्रसंगासाठी आवश्यक असेल तेवढा पैसा बिनदिक्कत खर्च करण्याचं कौशल्य मी शिकलो आहे. आणि कारण पुन्हा तेच आहे : मला भविष्याची कधीही चिंता नाही. तस्मात, सिबील स्कोर माझ्यासाठी व्यर्थ आहे.थोडे गणित
In reply to विचारसरणीतला फरक आहे ! by संजय क्षीरसागर
कॅलक्युलेशन्सनी माणूस सुखी झाला असता तर
In reply to थोडे गणित by गॅरी ट्रुमन
त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाहीउद्या नाहीच असं जगण्याचा ज्याचा अनुभव आहे तोच स्वप्नवत जगतो, बेफिकीर जगतो. आजचा दिवस मनमानी करत जगू शकतो आणि त्याचा प्रत्येक दिवसच आजचा दिवस असतो. इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही.ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.तुमच्या कल्पनेतला गरीब मी तरी नाही. गाडी, फ्लॅट, सहली, खेळ, विविध व्यासंग, नातेवाईक आणि मित्रांबरोबरची गेटटुगेदर्स, संगीत, योगा, प्राणायाम, स्विमिंग, लेखन, फारच मूड असेल तेव्हा दारुकाम आणि हे काय कमीये म्हणून जीवनाचा अल्टीमेट आयाम, अध्यात्म ! त्यामुळे वेळेपासून सर्वस्वी मुक्त जीवन.... आणि यातला कुठला ही छंद भर वर्कींग डेला, फुल वर्कींग अवर्समधे मन मानेल तसा करण्याचं साहस. भोंगळ संत वचनांची मला कधीही गरज भासत नाही. आणि उपलब्ध असलेला पैसा समोर असलेल्या प्रसंगावर मनमुराद खर्च करायचं कौशल्य असल्यानं मी कायम श्रीमंतच असतो.त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही.कर्ज घेणारा वर्तमान भविष्यासाठी गहाण ठेवून असतो. त्यामुळे सगळा स्वच्छंद ज्यानं भविष्यकाळ शून्य केला, त्यालाच उपलब्ध असतो. असो, हा सगळा अनुभवाचा भाग आहे. चर्चा करुन काहीही साध्य होत नाही. साहस करायला डायरेक्ट दिवसाचं काँपोझिशनच बदलायला लागतं . सो, तुम्ही कॅलक्युलेशन्समधे जगा, मी वर्तमानाची मजा घेतो. अर्थात, तुम्ही मजेत जगतायं असं वाटत असेल तर चर्चेला अर्थ नाही कारण प्रत्येकाचं जगणं त्याच्या अभिव्यक्तीतून दिसतं. आणि मला आहे त्यापेक्षा अजून श्रीमंत होण्यात रस नाही. त्यामुळे तुमची कॅलक्युलेशन्स माझ्या उपयोगाची नाहीत.गृहितक
In reply to कॅलक्युलेशन्सनी माणूस सुखी झाला असता तर by संजय क्षीरसागर
हा दुराग्रह मी आयुष्याची
In reply to विचारसरणीतला फरक आहे ! by संजय क्षीरसागर
माझ्या लेखी आयुष्य म्हणजे
In reply to हा दुराग्रह मी आयुष्याची by गणामास्तर
दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन.....
In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
हल्ली कधीकधी सहा पर्यंत झोप असते !
In reply to दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन..... by कुंदन
संक्षी, तुमचा नुसता फुलटॉस
In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
फार सिरियस घेऊ नका हो !
In reply to संक्षी, तुमचा नुसता फुलटॉस by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय?इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात?तेच उत्तरे. इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे, ती धंद्याचं साहस करु देत नाही.शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल?माझ्या बघण्यात तरी अजून नाही. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सांगा, भेटायला नक्की आवडेल.इएमआय ही काँस्टंट लाईनीत
In reply to फार सिरियस घेऊ नका हो ! by संजय क्षीरसागर
मी जितक्या आयटीमधल्या तरुणांना भेटलो त्यांनी प्रामाणिकपणे
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by संदीप डांगे
इएमआय ही काँस्टंट लाईनीत
In reply to मी जितक्या आयटीमधल्या तरुणांना भेटलो त्यांनी प्रामाणिकपणे by संजय क्षीरसागर
धंद्याचं साहस
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by सुबोध खरे
सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by सुबोध खरे
संक्षि, ते आयटी बुम वगैरे ठीक
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
ते आयटी बुम वगैरे ठीक आहे ?
In reply to संक्षि, ते आयटी बुम वगैरे ठीक by हतोळकरांचा प्रसाद
हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा?तुमच्याकडे सध्या नक्की किती पैसे आहेत, काय वाट्टेल ते झालं तरी आयुष्यात भविष्यकाळ निर्माण होऊ देणार नाही असा दृढ निश्चय तुम्ही आत्ता या क्षणी आणि आयुष्यभरासाठी करु शकता का ? तुम्ही निकड म्हणून फ्लॅट घेतायं की रेंट आणि हप्ता अॅडजस्ट होईल या हिशेबानं (उगीच) इनवेस्टमेंट म्हणून, उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का? यावर ते सगळं अवलंबून आहे. खरं तर वर सांगितलेले सगळे फॅक्टर्स एका वेळी जमवले तर फ्लॅट आणि आपले सोर्सेस सरळ आमने सामने होतात आणि व्यावहार होतो. मी आत्तापर्यंत असे चार व्यावहार केलेत. आयुष्यातल्या अगदी पहिल्या फ्लॅटचा, दुसरा बहिणीसाठी फ्लॅट घेतांना, तिसरा माझं ऑफिस घेतलं तेव्हा आणि चौथा सध्याचा फ्लॅट घेतला तेव्हा. बघा काही उपयोग झाला तर !नाही ब्वा! असलं काहींच्या
In reply to ते आयटी बुम वगैरे ठीक आहे ? by संजय क्षीरसागर
सहमत आहे
In reply to नाही ब्वा! असलं काहींच्या by हतोळकरांचा प्रसाद
.
In reply to नाही ब्वा! असलं काहींच्या by हतोळकरांचा प्रसाद
असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ!जे वास्तविक आहे ते काहीच्या काही कसं असेल ? मी स्वतः असे चार व्यावहार केलेत आणि मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही की पुढचा विचार करायला लागला नाही . आणि पैश्याचं सोंग वगैरे भानगड तर जन्मात कधी केली नाही ! उलट माझ्या ज्या मित्रांकडे करोडो रुपये आहेत ते अजून रुटीन गाडाच ओढतात आणि कायम मला एकच प्रश्न विचारतात. `आयला, असं जगायला तू नक्की किती पैसे जमवले आहेत ? 'तुमचा शिष्य बनवाल काय गुरुदेव
In reply to . by संजय क्षीरसागर
संजयसरांच्या प्रतिसादाला सहमत
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
महत्वाचा मुद्दा राहिला
In reply to संजयसरांच्या प्रतिसादाला सहमत by संदीप डांगे
ट्रेमा भाई
In reply to महत्वाचा मुद्दा राहिला by ट्रेड मार्क
जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली?मी गुंतवणूक वगैरे प्रकार करत नाही, खर्च करतो. घराची गरज वाटली म्हणून प्राइम लोकॅलिटीमधे (म्हणजे आजूबाजूला गर्द झाडी आणि दिवसभर संपूर्ण शांतता ) सगळे पैसे (स्वतःचे) लावून घर घेतलं.उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा.तेच तर मी केलं !संक्षी भाऊ...
In reply to ट्रेमा भाई by संजय क्षीरसागर
जे अनुभवातून येतं तेच लेखन मनाला भीडतं
In reply to संक्षी भाऊ... by चिनार
अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व
In reply to महत्वाचा मुद्दा राहिला by ट्रेड मार्क
दुसरं असं की त्यांच्या व
In reply to अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व by संदीप डांगे
डॉक्टर साहेबांनी याधीही
In reply to अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व by संदीप डांगे
सरळ साध्या प्रामाणिक मांडणीला
In reply to डॉक्टर साहेबांनी याधीही by सुबोध खरे
समजा आयटी बूम आलाच नसता तर
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
सुबोधजी वेगळा अँगल आहे, कृपया व्यक्तिगत घेऊ नका.
In reply to समजा आयटी बूम आलाच नसता तर by सुबोध खरे
माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच.बरोबरे पण आयटी बूममुळे रियल इस्टेट बेसुमार वधारली. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, बूमपूर्वी घेतलेले फ्लॅट आता स्वप्नवत किंमतीचे वाटतात आणि सध्या फ्लॅट घेणं स्वप्नवत वाटतं.मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही.त्याच सुमारास मी ही राहातोयं तो फ्लॅट घेतला. पण तेव्हाची किंमत आणि आताची किंमत यात कोट्यावधी रुपयांचं अंतर पडलंय ते ग्लोबलायझेशनमुळे.त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही.म्हणजे तुम्ही निकड नसतांना कर्ज काढून, इनवेस्टमेंट म्हणून (किंवा पुढे लागेल म्हणून) दुसरं घर घेतलं. माझा एक फंडा आहे, पैसा ही खर्चासाठी वापरायची गोष्ट आहे, गुंतवणूकीसाठी नाही. याचा अर्थ हप्ते भरणारा स्वच्छंद जगू शकणार नाही असं नाही, त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो. आता दुसरा फ्लॅट घ्यायचा झाला तरी मी आहे तो सर्व पैसा एका वेळी नव्या फ्लॅटसाठी खर्चून टाकीन कारण मला भविष्याची कणमात्र चिंता नाही. आणि मजा म्हणजे दरम्यानच्या काळात मनसोक्त जगून मिळवलेला पैसा नव्या फ्लॅटसाठी पुरेसा आहे. कदाचित तुमच्यासारखे धोरणी व्याही मिळाले तर त्यांना (माझ्या मुलाच्या हिश्श्याची) निम्मी रक्कम लग्न झाल्याझाल्या देऊन टाकीन. म्हणजे पुन्हा निम्मी रक्कम उरेलच. आणि नवदांपत्यानं स्वाभिमानानं सगळं स्वतः मॅनेज करायचं ठरवलं तर तोही प्रश्न येणार नाही. या उप्पर मुलगा एकत्र कुटुंबात वाढला आहे, सूनही तशीच मिळाली तर सगळे आनंदानं एकत्र राहू, मग तर विषयच संपला!त्याच्याकडे तसं जगायला वेळच
In reply to सुबोधजी वेगळा अँगल आहे, कृपया व्यक्तिगत घेऊ नका. by संजय क्षीरसागर
सुबोधजी तुम्ही आणि मी एक्सेप्शनल आहोत असं समजा, आणि
In reply to त्याच्याकडे तसं जगायला वेळच by सुबोध खरे
त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. हे आपल्याला कुणी सांगितले?पैसा हा माझा व्यावसाय आहे. पैश्यामुळे लोकांची काय परिस्थिती आहे ते मी जवळून बघितलंय. मला कुणी सांगायची गरज काय ? लोकांची बँक स्टेटमेंटस त्यांच्या जगण्याचा पॅटर्न दाखवतात. सध्याच्या किंमतीत कर्ज काढून फ्लॅट घेणारा आयुष्य भविष्यकाळाला गहाण टाकून आहे. अणि इएमआय त्याला कायम घेरुन आहे.संजयजी
In reply to सुबोधजी तुम्ही आणि मी एक्सेप्शनल आहोत असं समजा, आणि by संजय क्षीरसागर
मीही नेमकं हेच विचारलं होतं
In reply to संजयजी by ट्रेड मार्क
इएमआय आयुष्याची कोंडी करतो
In reply to मीही नेमकं हेच विचारलं होतं by हतोळकरांचा प्रसाद
उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला.तो लेख समजला तर मी पैसा खर्च करतो उधळत नाही हे लक्षात येईल. आणि अमेरिकन कर्जबाजारी होऊ शकतो पण माझ्याबाबतीत ती शक्यताच नाही कारण मी कर्जच घेत नाही इतकी उघड गोष्ट कळायला अडचण येणार नाही.अंशतः सहमत
In reply to इएमआय आयुष्याची कोंडी करतो by संजय क्षीरसागर
इएमआय आयुष्याची कोंडी करतो- याच्याशी अंशतः सहमत. कारण इएमआय जर खूप असेल, म्हणजे घरात येणाऱ्या सकल उत्पन्नाचा शक्य तेवढा मोठा भाग इएमआय फेडण्यात जात असेल, तर कोंडी होते. पण अगदी सहज परवडेल एवढा इएमआय असेल तर कोंडी व्हायचा प्रश्न येत नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमधला पैसा हा लेख आणि प्रतिक्रिया वाचला. पैश्याच्या मागे पळू नये या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खूप पैसा मिळवायचाय म्हणून २४ तास व ३६५ दिवस राबू नये हे खरंच आहे. पण मग पण मग जो काही मिळवायचाय किंवा काम करायचंय त्या अनुषंगाने स्वच्छंदीपणाला थोडाफार लगाम येतोच. उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो. पण एखाद्या मीटिंगमध्ये आहे आणि चला फिरून येऊ म्हणून मी मीटिंग मधून बाहेर पडू शकत नाही. तसेच तुम्ही पण क्लायंट समोर बसलाय, महत्वाचं काही बोलतोय आणि तुम्हाला मूड आला म्हणून त्याला ऑफिसमध्ये सोडून लॉन्ग ड्राईव्हला जाऊ शकत नाही. किंवा क्लायंटचे रिटर्न भरायचा शेवटचा आठवडा आहे आणि तुम्हाला काम करावंसं वाटत नाहीये म्हणून तुम्ही हातातलं काम सोडून रिटर्न काय भरू पुढच्या वर्षी असा म्हणून त्यादिवसापासून १ महिना परदेशी सुट्टीवर जाऊ शकत नाही. त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये. उलट मी तर म्हणीन आधीच्या अनुभवांवरून आणि भविष्याचा थोडा अंदाज घेऊन खर्च/ गुंतवणूक केली तर मनासारखे आयुष्य जगता येते. बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे मनुष्याच्या स्वच्छंदीपणाला आवर घातला जातो. पण अर्थात जबाबदारी ही जो घेतो नेहमी त्याच्याच मागे लागते हे स्वानुभवावरून सांगतो. हे विधान तुम्हाला उद्देशून नाहीये त्यामुळे गैरसमज नसावा. तर तुम्ही म्हणताय ते तत्वतः ठीक आहे आणि बहुतेक सगळे मिपाकर ते आचरणातही आणतात. कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत.@ ट्रेमा
In reply to अंशतः सहमत by ट्रेड मार्क
माझे क्रेडिट कार्डचे अनुभव
भारतात बहुसंख्य जनतेला कॅशलेस
स्वतःच्या नांवाबद्दल गोपनीयता ठीके
In reply to भारतात बहुसंख्य जनतेला कॅशलेस by मराठी कथालेखक
गुप्तता कुठे.. ते उघडच आहे
In reply to स्वतःच्या नांवाबद्दल गोपनीयता ठीके by संजय क्षीरसागर
थँक्स!
In reply to गुप्तता कुठे.. ते उघडच आहे by मराठी कथालेखक
आता क्रेडिट कार्ड वापरणे
मला (अडाण्याला) कुणीतरी
तुम्हाला खरच माहीत नाही असं गृहीत धरुन सांगत आहे :)
In reply to मला (अडाण्याला) कुणीतरी by कैवल्यसिंह
धन्यवाद.. पन मग यापैकी
In reply to तुम्हाला खरच माहीत नाही असं गृहीत धरुन सांगत आहे :) by मराठी कथालेखक
माझ्या दूसर्या प्रतिसादात मी
In reply to धन्यवाद.. पन मग यापैकी by कैवल्यसिंह
संत्रे सफरचंद तुलना
लेख रँडमली वाचला का?
In reply to संत्रे सफरचंद तुलना by अनरँडम
तुम्ही केली नाही
In reply to लेख रँडमली वाचला का? by ट्रेड मार्क
जाता जाता
In reply to लेख रँडमली वाचला का? by ट्रेड मार्क
मान्य
In reply to जाता जाता by अनरँडम
हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.मान्य आणि क्षमस्व पण एकूण तुमचा प्रतिसाद सकारात्मक वाटला नाही. एक तर प्रतिसादाचे हेडिंग "संत्रे सफरचंद तुलना" हेच म्हणताय की मी तुलना केली पण चुकीची केली. पुढे "पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो." हे पण विषयाला सोडूनच आहे कारण लेखाचा उद्देश हा नाहीये. बाकी वाचाळ असण्याबाबत - मी हे लिहिलेलं सगळं स्वतः केलंय आणि मग सांगितलंय. बाकी कोणी वाचाळ आहेत आणि का आहेत हे तुम्ही का सांगताय ते कळलं नाही. असो. पण सकारात्मक चर्चा करायची असेल तर नक्कीच करूया पण कृपया ती विषयाला धरून असावी.संबंध
In reply to मान्य by ट्रेड मार्क
माहितीपूर्ण आणि मनोरंजक
धन्यवाद
In reply to माहितीपूर्ण आणि मनोरंजक by चित्रगुप्त
एक शंका.
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे
In reply to एक शंका. by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे by ट्रेड मार्क
व्यवस्थित वापरले तर
मी पण HDFC regalia क्रेडिट
अप्रत्यक्ष फायदा
अरे वा
In reply to अप्रत्यक्ष फायदा by मराठी कथालेखक
ट्रेडमार्क भाऊ..
साईट्स आहेत
In reply to ट्रेडमार्क भाऊ.. by चिनार
https://www.creditkarma.com/credit-cards/search-cc: इथे तुम्हाला रजिस्टर करून तुमचा क्रेडिट स्कोअर (जो फारसा अचूक नसतो) कळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळतील आणि त्याचे फायदे सांगितले जातात.http://www.creditcards.com/http://www.comparecards.com/भारतातल्या कार्ड्ससाठीhttps://www.bankbazaar.com/credit-card.htmlhttp://www.paisabazaar.com/credit-card/