क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा .... In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
In reply to हा हा हा. by नितिन थत्ते
In reply to फारच सही निरिक्षणे बुवा तुमचं ! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी फारच चांगली स्मरणशक्ती बुवा तुमची by ट्रेड मार्क
In reply to असं कसं ट्रेमा ? by संजय क्षीरसागर
In reply to या सगळ्याचा मी कुठे राहतो याच्याशी काय संबंध? by ट्रेड मार्क
चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही.....अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत.
भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा . जाहीर आभारप्रदर्शन करू.
इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीये
मग कार्ड कशासाठी वापरतात ? का कार्ड आणि कॅशलेसचा काही संबंध नाही ? फक्त पॉइंटस कलेक्शन आणि रिडमप्शन इतकाच कार्डचा उपयोग आहे ?In reply to अरे वा ! by संजय क्षीरसागर
भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा .
संक्षी, मागच्या वेळी सुद्धा मी याबद्दल सांगितले होते परंतु त्या धाग्यावर प्रतिसादांच्या रतिबात माझा प्रतिसाद हरवून गेला असावा.
कार्ड चार्जेस हा विषय निघाल्यावर मी नोटबंदीनंतर माझे जुने स्टेटमेंट्स काढून परत एकदा डोळ्यात तेल घालून चेक केले.
एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत.
तसेचं इतर जे प्रायव्हेट बँकांचे कार्ड्स वापरतो त्यांना सुद्धा चार्ज पडलेला नाही.
In reply to भारतात चार्जेस न लागणारी by गणामास्तर
एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत.
आणि सांगतो. धन्यवाद !In reply to अरे वा ! by संजय क्षीरसागर
In reply to हा हा हा. by नितिन थत्ते
In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
अमेरिकन कार्डांवर जितक्या सवलती मिळतात तितक्या भारतातील कार्डांवर मिळत नाहीत असे माझे निरीक्षण आहे.मला दोन कार्डांचे खूपच चांगले अनुभव आहेत. १. एच.डी.एफ.सी रिगॅलिआ कार्डावर खूपच चांगले पॉईंट्स मिळतात. मी २००८ पासून एच.डी.एफ.सी चे क्रेडिट कार्ड वापरत आहे. आणि अर्थातच एकदाही मी बिल भरायला उशीर केलेला नसल्यामुळे बँकेने माझे कार्ड आणि क्रेडिट लिमिट दोन्ही अपग्रेड केल्या आणि २०१४ मध्ये मला हे कार्ड मिळाले. त्यापूर्वी एच.डी.एफ.सी च्या इतर कार्डावर केलेल्या खर्चावर मिळालेले सगळे पॉईंट्स या कार्डावर ट्रान्स्फर झाले. जुने आणि या कार्डावर मिळालेले नवे पॉईंट्स वापरून मी पुढील गोष्टी मिळविल्या--- अ. ऑगस्ट २०१५ मध्ये पिझ्झा हटची ८०० रूपयाची कुपन्स ब. जानेवारी २०१६ मध्ये आमच्या दोघांची मुंबई ते गोवा विमानाची जाऊन येऊन तिकिटे (एकूण ४ तिकिटे) क. सप्टेंबर २०१६ मध्ये माझे मुंबई ते दिल्ली विमानाचे जाऊन येऊन तिकिट (एकूण २ तिकिटे) ड. सप्टेंबर २०१६ मधील दिल्ली भेटीदरम्यान दिल्लीतील एका ठिकठाक "बेड अॅन्ड ब्रेकफास्ट" हॉटेलात एका दिवसाचे (ओव्हरनाईट) बुकिंग या रिगॅलिआ कार्डावर विमानतळावरील लाऊंज अॅक्सेसही आहे. त्याचाही दिल्ली विमानतळावर वापर केला होता. रिगॅलिआपेक्षाही मोठे असे इन्फिनिआ कार्ड आहे. पण त्यासाठी आपण अर्ज करू शकत नाही. हे कार्ड "इन्व्हिटेशन ओन्ली" आहे. मला वाटते त्यासाठी वार्षिक उत्पन्न वगैरे अटी बर्याच जास्त आहेत. त्यामुळे मला त्याचे आमंत्रण अजून आलेले नाही :) २. अमेरिकन एक्सप्रेसचे कार्डः हे कार्ड मी २०१२-१३ या काळात वापरले होते. त्यावेळी दर महिन्याला २५०+ रूपयांची चार ट्रॅन्झॅक्शन केली की १००० पॉईंट्स मिळत असत. महिन्यातून २५०+ रूपयांचे चार व्यवहार कसेही होत असत. आमच्या दोघांची फोनची बिले आणि वीजेचे बिल हे तीन व्यवहार हटकून २५०+ पेक्षा जास्त असत. तसेच महिन्यातून एखादा चित्रपट तरी बघितला जात असेच. त्यामुळे महिन्यातून हे ४ व्यवहार करायला कसलीच अडचण नसे. तसेच एक वर्ष पूर्ण झाल्यावर लॉयल्टी अॅडिशन वगैरे पॉईंट्स मिळाले होते. या कार्डाची माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या वर्षी १००० रूपये की अशी काहीतरी फी होती. हे सगळे पॉईंट्स एकत्र करून मी साडेसात हजाराचे एक आणि एक हजाराची दोन गिफ्ट सर्टिफिकिटे घेतली होती. त्यातून बायकोचा मोबाईल फोन घेता आला :) अमेरिकन एक्सप्रेसने २०१३ मध्ये २५०+ रूपयांऐवजी १०००+ रूपयांचे चार व्यवहार असा बदल केल्यावर मी कार्ड परत केले. मध्यंतरी ते कार्ड परत घेतले आहे. यावर पेटीएमचे १००० रूपयांपेक्षा जास्त केलेले चार रिचार्जही चालतात. त्यामुळे हे चार पेटीएम रिचार्ज पहिल्यांदा करायचे आणि मग फोन बिले, वीज बिल, उबर इत्यादी भानगडी पेटीएमवरून भरायच्या. अमेरिकन एक्सप्रेसकडून पॉईंट्स घ्यायचे आणि पेटीएमकडूनही सवलती घ्यायच्या. हाकानाका :) एक वर्ष झाल्यावर ते सगळे पॉईंट्स वापरून किमान ६ हजार रूपयांचे स्टेटमेन्ट क्रेडिट घेता येणार आहे. २००८ मध्ये मी अमेरिकेतून भारतात परत आलो. त्यावेळी मला क्रेडिट कार्ड घेणे अगदी अत्यावश्यक होते असे अजिबात नाही. पण आपण कधीनाकधी होमलोन घेणार तेव्हा त्यासाठी चांगला सिबिल स्कोअर बनवावा या उद्देशाने मी क्रेडिट कार्ड घेतले. त्यातून सिबिल स्कोअर चांगला झालाच आणि असे इतर फायदेही झाले. तसेच मी कार्ड आहे म्हणून स्वाईप करा आणि विनाकारण काहीतरी विकत घ्या असे करणारा नसल्यामुळे भरायला जड जाईल इतके बिलही कधी आले नाही. अमेरिकेत असताना (२००२ ते २००७) सुध्दा मी क्रेडिट कार्ड भरपूर वापरत असे. त्यावेळी शून्य क्रेडिट हिस्ट्री असतानाही आणि मी विद्यार्थी होतो तरीही अमेरिकन एक्सप्रेसचे कार्ड मिळाले होते आणि त्यासाठी डिपॉझिटही ठेवावे लागले नव्हते. त्यातून क्रेडिट हिस्ट्री चांगली बनवून मग एका वर्षासाठी ०% ए.पी.आर वगैरे ऑफर २००६ पर्यंत यायला लागल्या होत्या. अशा कार्डांवरील पॉईंट्स एकत्र करूनही मी अॅमॅझॉनची १०० की १५० डॉलर्सची तर स्टारबक्सची १० डॉलर्सची सर्टिफिकिटेही मिळवली होती. मला वाटते की २००७-०८ च्या आर्थिक संकटानंतर अशी कोणालाही कार्डे देणे अमेरिकन बँकांनी बंद केले आहे.
In reply to माझा अनुभव by गॅरी ट्रुमन
In reply to उत्तम माहिती दिली आहे. by एस
In reply to एसभाऊ धन्यवाद by ट्रेड मार्क
मला खात्री आहे की जेव्हा अमेरिकेत लेस कॅशचे वारे वाहू लागले तेव्हा अमेरिकेतही विरोध झालाच असेल.विरोध झाला नाही. अमेरिकन परंपरेला अनुसरून ज्यांना कार्ड वापरणे फायद्याचे ठरले ते कार्ड वापरू लागले. काही अमेरिकन लोक फक्त रोखीनेच व्यवहार करतात. अमेरिकेत रोकीने पेट्रोलपासून अगदी घर विकत घेण्यापर्यंतचे व्यवहार केले जातात.
In reply to आणखी दोनचारजणांनी त्यांचे by कंजूस
In reply to तिकडची आणि इकडची तुलना कशी करणार ? by संजय क्षीरसागर
In reply to आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार् by सुबोध खरे
In reply to पत हे सिबिल स्कोरच्या अँगलनं म्हटलेलं नाही by संजय क्षीरसागर
In reply to पत हे सिबिल स्कोरच्या अँगलनं म्हटलेलं नाही by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिष्ठा by ट्रेड मार्क
आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही.
प्रश्न मालमत्तेचा नाही, कर्ज नसण्याचायं. क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही. त्यामुळे माझा सिबील स्कोर निघणं शक्य नाही. पण माझी बॅलन्सशीटस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटस इतके स्ट्राँग आहेत की कोणतीही बँक सिबील रेटींग फाट्यावर मारुन मला हवं तितकं कर्ज (त्यांच्या नॉर्मसमधे) द्यायला एका पायावर तयार होईल, नव्हे आहेच. म्हणजे ज्याला कर्जच नकोयं त्याची फिनान्शियल पत (किंवा प्रतिष्ठा) कर्जबाजारी व्यक्तीपेक्षा जास्त आहे.
आता प्रतिष्ठा थोडी बाजूला ठेवून, डोक्यावर कर्जाचं ओझं असणारा आणि नसणारा यांच्या जगण्यातला फरक बघा. मी कधीही डोळे उघडल्याशिवाय उठत नाही. वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी माझा नाममात्र संबंध आहे. मी घड्याळ वापरत नाही. सकाळी बेसिक गोष्टी आवरल्या की योगासनं करुन मी कामाला नाही, खेळायला जातो. खेळून झाल्यावर मूड असेल तर काम करतो नाही तर पत्नी समवेत भटकायला जातो किंवा गाणी वाजवत बसतो. काम हा माझा छंद आहे कंपल्शन नाही आणि तरीही सगळी कामं वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. इथलेच काही सदस्य क्लायंट आहेत त्यांना कल्पना आहे, त्यामुळे वेगळ्या पुराव्याची गरज नाही . अगदी फारच मूड असेल तर तीला घेऊन सरळ जवळच्या रिसॉर्टला दोन/तीन दिवस ट्रीपला जातो. मजबूत भूक लागल्याशिवाय मी कधीही जेवत नाही आणि जेवण हा जवळजवळ तासभर चालणारा रसोत्सव असतो, नुसता आयटम टिकमार्क झाला असं नाही. इएमायची भानगडच नाही त्यामुळे आनंद हीच जीवनाची दिशा आहे. इतके वाजले, उद्या उठायचंय म्हणून आता झोपा हा प्रकार नाही. गडद्द झोप आल्याशिवाय झोपत नाही आणि दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन आला तरी घरचे झोपलेत म्हणून सांगतात, उठवत नाहीत. मला रेग्युलर बेसीसवर कोणतीही मेडीकल टेस्ट करायची कधीही गरज भासलेली नाही आणि काहीही पथ्यपाणी करायला लागत नाही. कर्ज नाही त्यामुळे भविष्यकाळाची फिकीर नाही. सगळं जीवन मनसोक्त जगायला उपलब्ध असलेला निव्वळ वर्तमान काळ आहे. याशिवाय हवी ती वस्तू हव्या त्या वेळेला घेण्याची क्षमता आहे.
आता कर्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं , का अक्कलहुशारीनं असलेल्या साधन संपत्तीत आवश्यक ती खरेदी करत कर्जमुक्त आणि स्वच्छंद जगायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे.In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to र्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं ,का अक्कल by सुबोध खरे
२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे.
त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल ! आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे.
या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला.
पूर्णपणे स्वेच्छेनं काम करुन सुद्धा, माझ्या मुलाला (गरज असल्यास) सध्याच्या किंमतीत मी नवं घर घेऊ शकतो. आणि घर घेऊन दिल्यावर सुद्धा माझ्या जीवनशैलीत कणमात्र फरक पडणार नाही कारण मला भविष्याची कधीही चिंता नाही. भविष्य ही कल्पना आहे आणि केवळ वर्तमानच जगायला आणि उपभोगायला उपलब्ध आहे. वर्तमानात धमाल करत जगण्याची कला जमून गेली आहे.
आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !
सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे.
या क्षणात समोर असलेल्या प्रसंगासाठी आवश्यक असेल तेवढा पैसा बिनदिक्कत खर्च करण्याचं कौशल्य मी शिकलो आहे. आणि कारण पुन्हा तेच आहे : मला भविष्याची कधीही चिंता नाही. तस्मात, सिबील स्कोर माझ्यासाठी व्यर्थ आहे. In reply to विचारसरणीतला फरक आहे ! by संजय क्षीरसागर
त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल !वर डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या आकड्यांबरोबर खेळून बघू. २००४ मध्ये १८ लाखांचे घर असेल तर त्याच्या २०% म्हणजे ३.६० लाख इतकी इक्विटी स्वत: डॉक्टरांनी त्यात टाकली असेल आणि १४.४ लाख इतके कर्ज घेतले असेल. आज घराची किंमत सव्वा कोटी आहे आणि डॉक्टरसाहेबांनी लिहिलेल्या दुसऱ्या प्रतिसादाप्रमाणे ६ लाख कर्ज अजूनही शिल्लक आहे.म्हणजे डॉक्टरसाहेबांची त्या घरातील इक्विटी १.२५ कोटी वजा ६ लाख बरोबर १.१९ कोटी इतकी झाली आहे. म्हणजे २००४ ते २०१७ या १३ वर्षात त्यांची त्या घरातील इक्विटी १.१९ कोटी भागिले ३.६० लाख बरोबर ३३ पटींनी वाढलेली आहे. १३ वर्षात ३३ पटींनी इक्विटी वाढली म्हणजे दरवर्षी सुमारे ३१% ने वाढ झाली. तुमच्या घराची आजची किंमत १.५० कोटी आहे तर डॉक्टरसाहेबांच्या घराची आजची किंमत १.२५ कोटी आहे. आकडेमोडीच्या सोयीसाठी २००४ मध्येही हे गुणोत्तर तेवढेच असेल हे गृहित धरू. म्हणजे डॉक्टरसाहेबांच्या घराची किंमत २००४ मध्ये १८ लाख असेल तर त्यावेळी तुमच्या घराची किंमत १८ लाख गुणिले ६ भागिले ५ = २१.६ लाखच्या आसपास असेल. म्हणजे तुमची घरातील इक्विटी १.५० कोटी भागिले २१.६ लाख = जवळपास ७ पटींनी वाढली. म्हणजे १३ वर्षात दरवर्षी सुमारे १६% ने वाढ झाली. तेव्हा डॉक्टरसाहेबांना हे जास्तीचे ’लिव्हरेज’ मिळाले कर्ज घेतल्यामुळेच. तसेच समजा २००४ मध्ये एखाद्याकडे एकरकमी टाकायला २१.६ लाख नसतील पण साडेतीन-चार लाखच असतील तर मग काय करायचे? कर्ज नकोच असेल तर ज्या वेगाने घरांच्या किंमती वाढत आहेत त्यापेक्षा जास्त वेगाने उत्पन्न वाढले पाहिजे आणि कधीनाकधी १००% इक्विटी टाकता येईल अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. सर्वांचे उत्पन्न दरवर्षी १६% पेक्षा जास्त वेगाने वाढत नसते. तेव्हा कर्ज घेतले नाही तर स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न मृगजळाप्रमाणे दूरदूर पळत राहिल हीच शक्यता अनेकांच्या बाबतीत होईल. तेव्हा तुम्हाला शक्य झाले ते सगळ्यांना शक्य होईलच असे नाही
आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहेत्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.
In reply to थोडे गणित by गॅरी ट्रुमन
त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही
उद्या नाहीच असं जगण्याचा ज्याचा अनुभव आहे तोच स्वप्नवत जगतो, बेफिकीर जगतो. आजचा दिवस मनमानी करत जगू शकतो आणि त्याचा प्रत्येक दिवसच आजचा दिवस असतो. इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही.
ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.
तुमच्या कल्पनेतला गरीब मी तरी नाही. गाडी, फ्लॅट, सहली, खेळ, विविध व्यासंग, नातेवाईक आणि मित्रांबरोबरची गेटटुगेदर्स, संगीत, योगा, प्राणायाम, स्विमिंग, लेखन, फारच मूड असेल तेव्हा दारुकाम आणि हे काय कमीये म्हणून जीवनाचा अल्टीमेट आयाम, अध्यात्म ! त्यामुळे वेळेपासून सर्वस्वी मुक्त जीवन.... आणि यातला कुठला ही छंद भर वर्कींग डेला, फुल वर्कींग अवर्समधे मन मानेल तसा करण्याचं साहस. भोंगळ संत वचनांची मला कधीही गरज भासत नाही. आणि उपलब्ध असलेला पैसा समोर असलेल्या प्रसंगावर मनमुराद खर्च करायचं कौशल्य असल्यानं मी कायम श्रीमंतच असतो.
त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही.
कर्ज घेणारा वर्तमान भविष्यासाठी गहाण ठेवून असतो. त्यामुळे सगळा स्वच्छंद ज्यानं भविष्यकाळ शून्य केला, त्यालाच उपलब्ध असतो.
असो, हा सगळा अनुभवाचा भाग आहे. चर्चा करुन काहीही साध्य होत नाही. साहस करायला डायरेक्ट दिवसाचं काँपोझिशनच बदलायला लागतं . सो, तुम्ही कॅलक्युलेशन्समधे जगा, मी वर्तमानाची मजा घेतो. अर्थात, तुम्ही मजेत जगतायं असं वाटत असेल तर चर्चेला अर्थ नाही कारण प्रत्येकाचं जगणं त्याच्या अभिव्यक्तीतून दिसतं. आणि मला आहे त्यापेक्षा अजून श्रीमंत होण्यात रस नाही. त्यामुळे तुमची कॅलक्युलेशन्स माझ्या उपयोगाची नाहीत. In reply to कॅलक्युलेशन्सनी माणूस सुखी झाला असता तर by संजय क्षीरसागर
In reply to विचारसरणीतला फरक आहे ! by संजय क्षीरसागर
हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !मी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुमचं एकंदरीत सगळं रुटीन रोचक वाटल्यामुळे तुमचे प्रतिसाद नीट वाचतोय. वरती एके ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी तुमचा नाममात्र संबंध आहे, तर प्रत्येक रात्र शनिवार आणि प्रत्येक दिवस रविवार वाटण्यामागे कारण काय? तुमच्या लेखी शनिवार रविवार हे दिवस काही वेगळे असतात काय ?
In reply to हा दुराग्रह मी आयुष्याची by गणामास्तर
In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन..... by कुंदन
In reply to ट्रेमा, तुम्ही सॉलीड फुलटॉस दिलायं म्हटल्यावर खेळणं भाग आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी, तुमचा नुसता फुलटॉस by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय?
इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.
समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात?
तेच उत्तरे. इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे, ती धंद्याचं साहस करु देत नाही.
शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल?
माझ्या बघण्यात तरी अजून नाही. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सांगा, भेटायला नक्की आवडेल.In reply to फार सिरियस घेऊ नका हो ! by संजय क्षीरसागर
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by संदीप डांगे
In reply to मी जितक्या आयटीमधल्या तरुणांना भेटलो त्यांनी प्रामाणिकपणे by संजय क्षीरसागर
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by सुबोध खरे
In reply to इएमआय ही काँस्टंट लाईनीत by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
In reply to संक्षि, ते आयटी बुम वगैरे ठीक by हतोळकरांचा प्रसाद
हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा?
तुमच्याकडे सध्या नक्की किती पैसे आहेत, काय वाट्टेल ते झालं तरी आयुष्यात भविष्यकाळ निर्माण होऊ देणार नाही असा दृढ निश्चय तुम्ही आत्ता या क्षणी आणि आयुष्यभरासाठी करु शकता का ? तुम्ही निकड म्हणून फ्लॅट घेतायं की रेंट आणि हप्ता अॅडजस्ट होईल या हिशेबानं (उगीच) इनवेस्टमेंट म्हणून, उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का? यावर ते सगळं अवलंबून आहे.
खरं तर वर सांगितलेले सगळे फॅक्टर्स एका वेळी जमवले तर फ्लॅट आणि आपले सोर्सेस सरळ आमने सामने होतात आणि व्यावहार होतो.
मी आत्तापर्यंत असे चार व्यावहार केलेत. आयुष्यातल्या अगदी पहिल्या फ्लॅटचा, दुसरा बहिणीसाठी फ्लॅट घेतांना, तिसरा माझं ऑफिस घेतलं तेव्हा आणि चौथा सध्याचा फ्लॅट घेतला तेव्हा.
बघा काही उपयोग झाला तर !In reply to ते आयटी बुम वगैरे ठीक आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to नाही ब्वा! असलं काहींच्या by हतोळकरांचा प्रसाद
लोक लोन/ईएमआय कडे वळतात कारण कोणाकडेही घर घेण्यासाठी इतके पैसे नसतात. कसेतरी 20% जमा होतात, तेव्हा 80% लोन घेऊन घर घेतलं जातं. दृढ निश्चय वगैरे आणता येईल पण पैशाचं सोंग आणायचं कसं?मी या अनुभवातून काही काळापूर्वीच गेलो असल्यामुळे हा अनुभव नक्की कसा असतो हे मला चांगलेच माहित आहे. सगळी इन्व्हेस्टमेन्ट --- शेअर्स, म्युच्युअल फंड, युलिप इत्यादी विकूनही मुळातले २०% कसेबसे उभे केले होते. वरचे ८०% कुठून उभे करणार होतो? खरे सांगायचे तर संक्षींचा सल्ला अजिबात व्यवहार्य नाही.
In reply to नाही ब्वा! असलं काहींच्या by हतोळकरांचा प्रसाद
असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ!
जे वास्तविक आहे ते काहीच्या काही कसं असेल ? मी स्वतः असे चार व्यावहार केलेत आणि मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही की पुढचा विचार करायला लागला नाही . आणि पैश्याचं सोंग वगैरे भानगड तर जन्मात कधी केली नाही ! उलट माझ्या ज्या मित्रांकडे करोडो रुपये आहेत ते अजून रुटीन गाडाच ओढतात आणि कायम मला एकच प्रश्न विचारतात. `आयला, असं जगायला तू नक्की किती पैसे जमवले आहेत ? ' In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
आयटी पब्लिकला कडून किती इएमआय खेचता येईल गुणीले मॅक्सिमम टर्म या हिशेबानं फ्लॅट विकायला सुरुवात केली. महिना सत्तर/ ऐंशी हजार हप्ता म्हणजे वर्कींग कपलला `इटस ओके यार' वाटतं आणि मग बिल्डर फ्लॅटची किंमत दोन कोटी करतो (त्यामुळे तुमच्या आणि माझ्या फ्लॅटची किंमत उगीचच स्वप्नवत वाटते आहे).हेच लिहणार होतो पण तुम्ही आधीच लिहिले आहे. :) २००७ ते २०१३ हा कालखंड चमत्काराने भरलेला आहे त्यामुळे त्याला रेफरन्स पॉईन्ट ठेवू नये. २००४ ला घेतलेले अठरा लाखाचे घर २०१६ ला सव्वा कोटीचे होणे हा चमत्कार आहे, थंबरुल नव्हे. २०१३-१४ साली घेतलेली ३० लाखाला घेतलेली घरे आज फारतर ३५-३८ लाख देऊ शकतात. अजून पुढे पाच वर्षांनी फार तर ४५-५० लाख देतील. आता बोला! आज पस्तीस हजार इएमआय कोणी राहत्या घरासाठी भरत असेल तर त्याचे घराचे सर्व उत्पन्न किमान ९० हजार हवे, आणि हे ९० हजार दरवर्षी किती वाढेल हे किती टक्क्याने पगारवाढ होते, महागाईदर काय, नोकरीत प्रमोशन मिळण्याच्या किती संधी आहेत ह्या वेरियेबल्स वर अवलंबून आहे. आजचे अंदाजे २०१७ ते २०३२ चे गणित मांडूया: १. ३५ लाखाचे कर्ज. ३५ हजार इएमआय पुढची पंधरा वर्ष. २. पगार ९० हजारः पुढच्या पंधरा वर्षात (दरवर्षी अपेक्षित १० टक्के पगारवाढ ) पंधरा वर्षांनी साडेतीन लाख रुपये.* ३. घराची किंमत ४० लाखः पंधरा वर्षाने (दरवर्षी अपेक्षित दरवाढ ६ %) होइल ९५ लाख तर ३५ हजार असणारा इएमआय हा आज पगाराच्या ४०% पासून हळूहळू कमी होत १०% पर्यंत राहिल. हा दरवर्षी २% कमी होत जाईल. तर डॉक्टर आणि संक्षी यांची घरे नॉर्मल दरवाढ राहिली असती तर फारतर जास्तीत जास्त ४० लाख किंमतीची राहिली असती. जी आज सव्वा ते दिड कोटीची आहेत. आज २०१७ मध्ये घेतलेल्या घरांच्या किंमती २०३२ मध्ये फारतर अडीचपट होतील. आठ पट नाही. *(आता ज्यांचे पगार आज ९० हजार आहेत ते पंधरा वर्षांनी साडेतीन लाख होतील काय हा मोठा प्रश्न आहे. २००४ मध्ये १० हजार पगार असणार्याला आज ३५ हजार पगार असायला हवा. आमच्यासारख्या फास्टेट ग्रोथ पोटेन्शियल असलेल्या क्षेत्रात ते शक्य होउ शकते. २००६ ला ६ हजार रुपये महिन्यावर लागलेला माझा मित्र आज दिड लाख रुपये महिना कमवतो. पण त्याच्याच ऑफिसातला तेव्हा ८ हजार रुपये महिना वाला मदतनीस २०-२५ पर्यंत तरी पोचलाय का ते माहिती नाही.) आता घरांच्या किंमती आणि लोकांचे पगार यांचे समिकरण जबरदस्त बिघडलेले आहे. एकाच्या पगारात घर शक्यच नाही. पत्नीला त्यासाठी नोकरी करावीच लागते. ह्याबद्दल मागे कुठल्या तरी धाग्यावर लिहिले आहे. त्यामुळे घरांचे इएमाय ही वेठबिगारी होत आहे हे माझे मत आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायही आजच्या नोकरदारांपुढे नाही हे दुर्दैव आहे, ज्याला कोणीही काहीही करु शकत नाही. घरांच्या किंमती वाढतच राहतील त्यामुळे घरे गुंतवणुकीची उत्तम साधने आहेत ह्या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर येणे श्रेयस्कर. बाकी, दिलेल्या लिंकचा अभ्यास करुन अभ्यासू लोकांनी आपली मते कळवावीत ही विनंती. http://www.jagoinvestor.com/2009/12/returns-of-real-estate-in-india.html डिस्क्लेमरः वरच्या गणितांत काही भूलचूक झाल्यास माफी असावी. फार काटेकोर आकडेमोड नाहीये ती.
In reply to संजयसरांच्या प्रतिसादाला सहमत by संदीप डांगे
In reply to महत्वाचा मुद्दा राहिला by ट्रेड मार्क
जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली?
मी गुंतवणूक वगैरे प्रकार करत नाही, खर्च करतो. घराची गरज वाटली म्हणून प्राइम लोकॅलिटीमधे (म्हणजे आजूबाजूला गर्द झाडी आणि दिवसभर संपूर्ण शांतता ) सगळे पैसे (स्वतःचे) लावून घर घेतलं.
उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा.
तेच तर मी केलं ! In reply to ट्रेमा भाई by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी भाऊ... by चिनार
In reply to महत्वाचा मुद्दा राहिला by ट्रेड मार्क
In reply to अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व by संदीप डांगे
In reply to अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व by संदीप डांगे
In reply to डॉक्टर साहेबांनी याधीही by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या आयटी बूममुळे by संजय क्षीरसागर
In reply to समजा आयटी बूम आलाच नसता तर by सुबोध खरे
माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच.
बरोबरे पण आयटी बूममुळे रियल इस्टेट बेसुमार वधारली. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, बूमपूर्वी घेतलेले फ्लॅट आता स्वप्नवत किंमतीचे वाटतात आणि सध्या फ्लॅट घेणं स्वप्नवत वाटतं.
मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही.
त्याच सुमारास मी ही राहातोयं तो फ्लॅट घेतला. पण तेव्हाची किंमत आणि आताची किंमत यात कोट्यावधी रुपयांचं अंतर पडलंय ते ग्लोबलायझेशनमुळे.
त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही.
म्हणजे तुम्ही निकड नसतांना कर्ज काढून, इनवेस्टमेंट म्हणून (किंवा पुढे लागेल म्हणून) दुसरं घर घेतलं. माझा एक फंडा आहे, पैसा ही खर्चासाठी वापरायची गोष्ट आहे, गुंतवणूकीसाठी नाही. याचा अर्थ हप्ते भरणारा स्वच्छंद जगू शकणार नाही असं नाही, त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो.
आता दुसरा फ्लॅट घ्यायचा झाला तरी मी आहे तो सर्व पैसा एका वेळी नव्या फ्लॅटसाठी खर्चून टाकीन कारण मला भविष्याची कणमात्र चिंता नाही. आणि मजा म्हणजे दरम्यानच्या काळात मनसोक्त जगून मिळवलेला पैसा नव्या फ्लॅटसाठी पुरेसा आहे. कदाचित तुमच्यासारखे धोरणी व्याही मिळाले तर त्यांना (माझ्या मुलाच्या हिश्श्याची) निम्मी रक्कम लग्न झाल्याझाल्या देऊन टाकीन. म्हणजे पुन्हा निम्मी रक्कम उरेलच. आणि नवदांपत्यानं स्वाभिमानानं सगळं स्वतः मॅनेज करायचं ठरवलं तर तोही प्रश्न येणार नाही. या उप्पर मुलगा एकत्र कुटुंबात वाढला आहे, सूनही तशीच मिळाली तर सगळे आनंदानं एकत्र राहू, मग तर विषयच संपला!In reply to सुबोधजी वेगळा अँगल आहे, कृपया व्यक्तिगत घेऊ नका. by संजय क्षीरसागर
In reply to त्याच्याकडे तसं जगायला वेळच by सुबोध खरे
त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. हे आपल्याला कुणी सांगितले?
पैसा हा माझा व्यावसाय आहे. पैश्यामुळे लोकांची काय परिस्थिती आहे ते मी जवळून बघितलंय. मला कुणी सांगायची गरज काय ? लोकांची बँक स्टेटमेंटस त्यांच्या जगण्याचा पॅटर्न दाखवतात. सध्याच्या किंमतीत कर्ज काढून फ्लॅट घेणारा आयुष्य भविष्यकाळाला गहाण टाकून आहे. अणि इएमआय त्याला कायम घेरुन आहे.
In reply to सुबोधजी तुम्ही आणि मी एक्सेप्शनल आहोत असं समजा, आणि by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी by ट्रेड मार्क
In reply to मीही नेमकं हेच विचारलं होतं by हतोळकरांचा प्रसाद
उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला.
तो लेख समजला तर मी पैसा खर्च करतो उधळत नाही हे लक्षात येईल. आणि अमेरिकन कर्जबाजारी होऊ शकतो पण माझ्याबाबतीत ती शक्यताच नाही कारण मी कर्जच घेत नाही इतकी उघड गोष्ट कळायला अडचण येणार नाही.In reply to इएमआय आयुष्याची कोंडी करतो by संजय क्षीरसागर
इएमआय आयुष्याची कोंडी करतो - याच्याशी अंशतः सहमत. कारण इएमआय जर खूप असेल, म्हणजे घरात येणाऱ्या सकल उत्पन्नाचा शक्य तेवढा मोठा भाग इएमआय फेडण्यात जात असेल, तर कोंडी होते. पण अगदी सहज परवडेल एवढा इएमआय असेल तर कोंडी व्हायचा प्रश्न येत नाही.
तुम्ही दिलेल्या लिंकमधला पैसा हा लेख आणि प्रतिक्रिया वाचला. पैश्याच्या मागे पळू नये या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खूप पैसा मिळवायचाय म्हणून २४ तास व ३६५ दिवस राबू नये हे खरंच आहे. पण मग पण मग जो काही मिळवायचाय किंवा काम करायचंय त्या अनुषंगाने स्वच्छंदीपणाला थोडाफार लगाम येतोच. उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो. पण एखाद्या मीटिंगमध्ये आहे आणि चला फिरून येऊ म्हणून मी मीटिंग मधून बाहेर पडू शकत नाही. तसेच तुम्ही पण क्लायंट समोर बसलाय, महत्वाचं काही बोलतोय आणि तुम्हाला मूड आला म्हणून त्याला ऑफिसमध्ये सोडून लॉन्ग ड्राईव्हला जाऊ शकत नाही. किंवा क्लायंटचे रिटर्न भरायचा शेवटचा आठवडा आहे आणि तुम्हाला काम करावंसं वाटत नाहीये म्हणून तुम्ही हातातलं काम सोडून रिटर्न काय भरू पुढच्या वर्षी असा म्हणून त्यादिवसापासून १ महिना परदेशी सुट्टीवर जाऊ शकत नाही.
त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये. उलट मी तर म्हणीन आधीच्या अनुभवांवरून आणि भविष्याचा थोडा अंदाज घेऊन खर्च/ गुंतवणूक केली तर मनासारखे आयुष्य जगता येते.
बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे मनुष्याच्या स्वच्छंदीपणाला आवर घातला जातो. पण अर्थात जबाबदारी ही जो घेतो नेहमी त्याच्याच मागे लागते हे स्वानुभवावरून सांगतो. हे विधान तुम्हाला उद्देशून नाहीये त्यामुळे गैरसमज नसावा.
तर तुम्ही म्हणताय ते तत्वतः ठीक आहे आणि बहुतेक सगळे मिपाकर ते आचरणातही आणतात. कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत. In reply to अंशतः सहमत by ट्रेड मार्क
In reply to भारतात बहुसंख्य जनतेला कॅशलेस by मराठी कथालेखक
In reply to स्वतःच्या नांवाबद्दल गोपनीयता ठीके by संजय क्षीरसागर
In reply to गुप्तता कुठे.. ते उघडच आहे by मराठी कथालेखक
In reply to मला (अडाण्याला) कुणीतरी by कैवल्यसिंह
In reply to तुम्हाला खरच माहीत नाही असं गृहीत धरुन सांगत आहे :) by मराठी कथालेखक
In reply to धन्यवाद.. पन मग यापैकी by कैवल्यसिंह
In reply to संत्रे सफरचंद तुलना by अनरँडम
In reply to लेख रँडमली वाचला का? by ट्रेड मार्क
In reply to लेख रँडमली वाचला का? by ट्रेड मार्क
In reply to जाता जाता by अनरँडम
हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.
मान्य आणि क्षमस्व
पण एकूण तुमचा प्रतिसाद सकारात्मक वाटला नाही. एक तर प्रतिसादाचे हेडिंग "संत्रे सफरचंद तुलना" हेच म्हणताय की मी तुलना केली पण चुकीची केली. पुढे "पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो." हे पण विषयाला सोडूनच आहे कारण लेखाचा उद्देश हा नाहीये.
बाकी वाचाळ असण्याबाबत - मी हे लिहिलेलं सगळं स्वतः केलंय आणि मग सांगितलंय. बाकी कोणी वाचाळ आहेत आणि का आहेत हे तुम्ही का सांगताय ते कळलं नाही.
असो. पण सकारात्मक चर्चा करायची असेल तर नक्कीच करूया पण कृपया ती विषयाला धरून असावी. In reply to मान्य by ट्रेड मार्क
In reply to माहितीपूर्ण आणि मनोरंजक by चित्रगुप्त
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
In reply to एक शंका. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे by ट्रेड मार्क
In reply to अप्रत्यक्ष फायदा by मराठी कथालेखक
In reply to ट्रेडमार्क भाऊ.. by चिनार
https://www.creditkarma.com/credit-cards/search-cc : इथे तुम्हाला रजिस्टर करून तुमचा क्रेडिट स्कोअर (जो फारसा अचूक नसतो) कळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळतील आणि त्याचे फायदे सांगितले जातात.
http://www.creditcards.com/
http://www.comparecards.com/
भारतातल्या कार्ड्ससाठी
https://www.bankbazaar.com/credit-card.html
http://www.paisabazaar.com/credit-card/

उत्तम माहिती दिली आहे.