चित्तथरारक अस्वल दर्शन
आमच नशीब बलवत्तर ते आमच्या दिशेने चालत आलं नाही. अस्वल निवांत रस्त्यावर पडलेली गोडगोड जांभळं खात चालु लागलं आम्हीदेखील सुरक्षित अंतर ठेवुन त्याच्यामागे चालायला सुरूवात केली. मी मनसोक्त फोटो व व्हिडीवो काढुन घेतले. दहा-बारा मिनीटं चालुन झाल्यावर अस्वल आमच्याकडे बघुन उजव्याबाजुच्या घनदाट जंगलात शांतपणे निघुन गेल.
अस्वल निघुन गेल्या नंतर आम्ही ते जिथं बसलं होत तिथं गेलो. अस्वलाने तिथं आपल्या धारदार नखांनी वाळवी (White Ant) खाण्यासाठी भलमोठं खड्डं केलेलं होतं.
वाळवी हे अस्वलाच सगळ्यात आवडतं खाद्य. त्याने तिथं वाळवी खाऊन झाल्यावर आपली पाठपण खाजवली होती त्यामुळे खड्यात व आसपास त्याचे केसं पडलेले होते. अस्वलाच इतक्या जवळुन दर्शन झाल्यामुळे आमचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. थोड्यावेळाने आम्ही सतीचामाळ गावात पोहचलो. वनकर्मचारी व गावकरयांना अस्वलाचे फोटो दाखवल्यावर त्यांनी अस्वलाच्या इतक्या जवळ जाऊन व त्याच्यामागे चालुन देखील त्याने आमच्यावर हल्ला कसकायं नाही केला यावर आश्चर्य व्यक्त केलं. मी त्यांना उत्तर दिलं कि ' कदाचित अस्वलाने ओळखलं असेल कि ही माणसं प्राणी व जंगलावर नितांत प्रेम करणारी आहेत म्हणुन त्याने आमच्यावर हल्ला केला नसावा.' :)
या अस्वल दर्शनानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले अस्वलं खरच माणसांची शत्रू आहेत का ? अस्वलं खरच खुनशी व हिंस्र असतात का? कि माणसाने भितीपोटी उगाचचं त्यांची हिंस्त्र प्रितिमा तयार केली आहे ? जसं साप दिसल्यावर माणसं जमीन धोपटायला सुरूवात करतात मग तो विषारी असो किंवा बिनविषारी....
मी लहान असताना गावोगावी वाघवाले लोकं ( प्राण्यांचे खेळ दाखवुन पैसे कमावणारी जात ) अस्वलं नाचवायचे व त्यांचे नखं व केसं विकुन पैसे कमवायचे. अस्वलाची कलाबाजी बघुन बालगोपाल खुश व्हायचे तर मोठी माणसं त्याची नखं व केसं विकत घ्यायची. ह्या खेळात अस्वलाला प्रचंड वेदना व्हायच्या पण त्याकडे कुणाचचं लक्ष जात नसत. जेव्हा जंगलाच्या आसपास राहणारे लोक गुरं चारण्यासाठी किंवा लाकडं तोडण्यासाठी जंगलात जातं तेव्हा जर त्यांना एखाद्या ठिकाणी अस्वलाची पिल्लं दिसली तर ते वाघवाल्यांना येवुन सांगत. 10-15 वाघवाले लोकं मिळुन त्या ठिकाणी जात व आग लावुन फटाके फोडुन अस्वलाच्या मादीला पळवुन लावतं व पिल्लं घेवुन येत. सहा-सात महिण्यांनंतर दाभण गरम करून त्या पिल्लांच्या नाकात आरपार घुसवुन छिद्र तयार करत व त्यात दोरी घालुन त्यांना वेसन घालत व वर्षभरानंतर त्या पिल्लांचे लोखंड कापायच्या यंत्राने दात कापुन टाकतं. नंतर पिल्लांना हाणुन-मारूण कधी कधी उपाशी ठेवुन त्यांना आपल्या इशारयावर नाचायला व कलाबाजी करायला शिकवत. अशाप्रकारे माणसाने अस्वलांवर प्रचंड अत्याचार केले आहेत. कदाचित या सगळ्यामुळे भितीपोटी अस्वलं माणसांप्रती हिंस्र झाली असावीत. अस्वलं हिंस्त्र असली तरी ती नरभक्षक होणं दुर्मिळ आहे. नशीब आता हे असे अस्वल नाचवायचे खेळ बंद झाले आहेत.
अस्वलाचे माणसावर हल्ले हे पहाटे किंवा तिन्हीसांजेला जास्त होतात कारण एकतर अस्वलाची दृष्टी अधू व कान मंद असतात यामुळे अस्वलाला माणसाचे अस्तीत्व लवकर समजत नाही व अस्वलाच्या काळ्या रंगामुळे अंधुक प्रकाशात माणसाला अस्वल दिसत नाही यामुळे अस्वलाचे हल्ले हे माणसाशी अचानक होणारी भेट यातुन निर्माण झालेल्या भितीमुळे स्वरक्षणासाठी केलेले असतात. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत अस्वलांच्या हल्ल्यांच प्रमाण जास्त असतं कारण हा काळ अस्वल माद्यांचा विणीचा काळ असतो. आपल्या पिलांच्या संगोपनाच्या संदर्भात माद्या अधिक आक्रामक व दक्ष असतात. पिल्ले असणारया क्षेत्राजवळ माणसं गेल्यास ती चवताळुन हल्ला करते. आपल्या पिलांना कुठलिही हानी पोहचु नये हि वृत्ती प्रत्येक प्राण्यामधे असते. अगदी आपण घरी प्रेमाने पाळलेली कुत्री किंवा मांजर सुद्धा तिला पिल्लं झाल्यावर सुरूवातीचा काही काळ आपल्याला जवळ येवु देत नाही. हे तर जंगली अस्वलं आहे ते कसकाय आपल्याला त्याची पिल्लं असलेल्या क्षेत्रात येवु देईल ? खर तर अस्वलं हि गोंधळी असतात, चालताना आणि भोजन करताना नेहमी काहीतरी आवाज करीत असतात, यामुळे जागरूक असल्यास माणुस अंधारातही अस्वलाचे अस्तीत्व जाणुन घेवु शकतो व अस्वलापासुन दुर जावुन संघर्ष टाळु शकतो.
आपल्याप्रमाणेच जंगली जिवांनादेखील भावना असतात. त्यांनादेखील जगायला जागा हवी आहे. आपल्या भावनांइतकच महत्व जर आपण वन्यजीवांच्या भावनेला दिलं तर माणुस आणि वन्यजीव नक्कीच सुरक्षित व सुखसमृद्धीने राहु शकतील.
मित्रांनो मिपावर पहिल्यांदाचं लिहायचा प्रयत्न केलाय आशा करतो तुम्हाला आवडले असेल. भटकंती दरम्यान तुम्हाला देखील असे वन्यजीवांचे चित्तथरारक अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा.In reply to अल्टिमेट हाय हा लेख अँड द by फेदरवेट साहेब
In reply to चांगला अनुभव. by एस
In reply to छान लेख by वरुण मोहिते
In reply to विलक्षण अनुभव आला तुम्हाला. by किसन शिंदे
In reply to थरारक अनुभव by पाटीलभाऊ
In reply to उत्तम लेख.. तुमच्या by पुंबा
In reply to उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय by गवि
In reply to तुमचे अनुभव इथे शेअर करा, आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील by यमगर्निकर
In reply to उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय by गवि
In reply to धन्यवाद by रानवेडा सचिन
जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा माझ्यासमोर आलेला.अगदी अशाच प्रसंगी दाट झाडीतून धावणारा गवा बेसावध अवस्थेत (गव्याची बेसावध अवस्था, गविची नव्हे) अंगावर आला बिथरुन. तेव्हा फॉरेस्टगार्डने सांगून ठेवलेला खच्चून ओरडण्याचा उपाय* कामी आला. गव्याचं धूड दचकून काटकोनात वळून पसार झालं अँड गवि'ज सोल फेल इन युटेन्सिल. * टीप: उपाय माहीत नसता तरी मी वेगळं काय केलं असतं म्हणा..
In reply to जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा by गवि
In reply to झकास लिहीलाय लेख, उत्तम.. by सानझरी
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
In reply to बापरे! थरारक आहे हे. by अजया
In reply to बापरे! थरारक आहे हे. by अजया
In reply to वाघवाले by Nitin Palkar
In reply to तिकडे नागेश्वरला गेलेलो. by कंजूस
In reply to फोटो आवडले. by कंजूस
In reply to झक्कास हो दादा by अल्पिनिस्ते
In reply to सुंदर लेख. by बोका-ए-आझम
In reply to धन्यवाद by रानवेडा सचिन
In reply to अजुन पण असेच अनुभव असतील by पियुशा
In reply to जबरदस्त by इडली डोसा
In reply to एकदम खतरनाक अनुभव! अजून असतील by नरेश माने
In reply to मस्त अनुभव.. by शलभ
अल्टिमेट हाय हा लेख अँड द