चित्तथरारक अस्वल दर्शन
दरवर्षी बुद्धपोर्णिमेदरम्यान वनविभागातर्फे घेतली जाणारी वन्यजीवगणना वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचं असते. वर्षभर वन्यजीवप्रेमी ह्या गणनेची आतुरतेने वाट पाहत असतात. मी देखील त्याला अपवाद नाही. ह्या गणनेमुळे वन्यजीव प्रेमींना खरया अर्थाने जंगल जवळुन बघायला व अनुभवायला मिळते.
ह्या वर्षी 15 मे ते 22 मे दरम्यान वन्यजीव गणनेसाठी स्वयंसेवक म्हणुन मी व माझा मित्र इम्रान मलिक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. कोल्हापुर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमधे राधानगरी अभयारण्य वसलेलं आहे. राधानगरी अभयारण्य म्हणजे जणु जैवविविधतेचा खजिनाच आहे. पश्चिम घाटाच्या डोंगररांगा, घनदाट झाडी, विस्तीर्ण मैदाने आणी राधानगरी, काळम्मावाडी व माळीवाडी या धरणांचे बॅकवाॅटर यामुळे राधानगरीचं जंगल वन्यजीवांसाठी एक उत्तम आधिवास आहे. या अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारचे वन्यप्राणी व २३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. अभयारण्यात वाघ ( वाघ दिसणं तस दुर्मिळ आहे परंतु २०११ साली वनविभागाने लावलेल्या कॅमेरयात वाघाचा फोटो आला आहे व ३१ जानेवारी २०१६ रोजी वनकर्मचारयांना वाघाचे दर्शन झाले आहे.) , बिबट्या, रानकुत्रा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवलेमांजर, शेकरू, लंगुर, माकड, ससा इ. प्राणी आढळतात तर मोर, अबलक धनेश, मलबारी धनेश, स्वर्गीय नर्तक, मधुबाज, निलगिरी कबुतर, हरेल, सिलोन फ्राॅग माउथ, सुतार, रातवा, तुरेवाला कोतवाल, रानकोंबडी, गरूड, घुबड, बुलबुल इ. पक्षी आढळतात. अभयारण्यात ३३ प्रजातींचे साप व १२१ प्रजातींचे फुलपाखरे देखील आढळतात.
अभयारण्याच्या दाजीपुर रेंजमधील नानीवळे बीटात आम्ही दोघे प्राणीगणना करतं फिरतं होतो. सकाळचे नऊ वाजले होते, ट्रांसेक्ट लाईनवरची फिरती उरकुन आम्ही नानीवळेतील पावणेश्वर मंदिराकडुन सतीचामाळं या गावाकडे निघालो. चालताना दोघेही वन्यजीवांच दर्शन घडावं म्हणुन कसलाही आवाज न करता चालत होतो. थोडं चालुन झाल्यावर रस्त्याच्या उजवीकडच्या बाजुच्या झाडावर मला शेकरू व माकडं दिसली मी त्यांचे फोटो काढायला सुरूवात केली. इम्रान माझ्यापासुन पाच-सहा पाऊलं पुढे चालत गेला व अचानक जोरात मागे आला व समोरच्या झाडीकडे हात दाखवत म्हणाला ' सच्या वहां भालु है '. शेकरू व माकडं दिसल्यामुळे झालेल्या आनंदाच्या जागी आता मनात प्रचंड भीती निर्माण झाली, कारण अस्वल जिथं होत ती जागा आमच्या पासुन जेमतेम दहा फुट अंतरावर होती. अस्वल हा जंगलातील सगळ्यात बेभरवश्याचा प्राणी आहे व अस्वलाचा हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अस्वलाने एकाचं वेळी चौघांचा जीव घेतला होता तर म्हैसूरच्या जंगलात स्वातंत्र्यापूर्वी एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ‘ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. या अस्वलाला केनेथ अँडरसन नावाच्या शिकाऱ्याने गोळी घालून ठार केले होते. मरण्यापूर्वी त्या अस्वलाने तेवीस लोकांना जखमीही केले होते. चंद्रपूरच्या जंगलातही एका अस्वलाने दोघांचा जीव घेतल्याची घटना पन्नासच्या दशकात घडली असल्याच्या नोंदी आहेत. आम्ही फिरत असलेल्या नानीवळे भागात मागच्या वर्षी अस्वलाने वनविभागाने लावलेला कॅमेरा सतत पडणारया फ्लॅशला वैतागुन चावुन चावुन फोडुन टाकला होता. सुप्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांच्या ‘मेळघाटी सातपुडा’ पुस्तकाच्या अवलोकनात मेळघाटातील कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना घाबरत नाही, परंतु आपल्या साऱ्या देवतांना आवाहने करीत जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना करीत धास्तावलेलाच प्रवास करताना दिसतो असे लिहीले आहे. इम्रानला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यामुळे तो निवांत होता. त्याला जंगलाबद्दल जास्त माहिती नाव्हती व हि त्याची पहिलीच जंगलवारी होती. अस्वल मला दिसलं नव्हत परंतु आपल्यापासुन जेमतेम दहा फुटांच्या अंतरावर अस्वल आहे ह्यामुळे माझी जाम तंतरली. विलंब न करता मी इम्रानला सांगितले ' इम्मा पिछे चल '. अस्वल ज्या झाडीत बसले होते त्या दिशेने तोंड करून आम्ही रस्त्यावर उलटं चालायला सुरूवात केली. अस्वलापासुन सुरक्षित अंतरावर गेल्यावर आम्ही थांबलो. मागे चालताना आमची नजर पुर्णपणे अस्वल बसलेल्या झाडीकडे होती. त्या झाडीतं थोडीथोडी हलचाल होत होती पण अस्वल आम्हाला बघुन तिथुन पळालं नव्हतं व जास्त हालचाल देखील करत नव्हतं, त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी इम्रानला माझ्या मोबाईल मधला रानडुक्कराचा फोटो दाखवत विचारलं ' भाई वहा सच्ची भालु ही है या फिर एैसा सुवर है ?'. ' अरे सच्या वहा भालु ही है बहुत बडा ' इम्रान म्हणाला. इम्रानने दोन दिवसांपुर्वीच राजिगरे नावच्या वनरक्षकासोबत फिरताना याच रस्त्यावर अस्वल जवळुन बघितल होतं त्यामुळे त्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. वीस मिनीटं झाले आम्ही त्या झाडीकडे पापणी लवु न देता टक लावुन उभे होतो, अधुनमधुन हालचाल व्हायची. आमची उत्सुकता शिगेला पोहचली होती, अचानक त्या झाडीतुन अतिशय देखणं व रूबाबदार अस्वल बाहेर निघालं व आमच्याकडे लक्ष न देता विरूद्ध दिशेने चालायला लागलं.
आमच नशीब बलवत्तर ते आमच्या दिशेने चालत आलं नाही. अस्वल निवांत रस्त्यावर पडलेली गोडगोड जांभळं खात चालु लागलं आम्हीदेखील सुरक्षित अंतर ठेवुन त्याच्यामागे चालायला सुरूवात केली. मी मनसोक्त फोटो व व्हिडीवो काढुन घेतले. दहा-बारा मिनीटं चालुन झाल्यावर अस्वल आमच्याकडे बघुन उजव्याबाजुच्या घनदाट जंगलात शांतपणे निघुन गेल.
अस्वल निघुन गेल्या नंतर आम्ही ते जिथं बसलं होत तिथं गेलो. अस्वलाने तिथं आपल्या धारदार नखांनी वाळवी (White Ant) खाण्यासाठी भलमोठं खड्डं केलेलं होतं.
वाळवी हे अस्वलाच सगळ्यात आवडतं खाद्य. त्याने तिथं वाळवी खाऊन झाल्यावर आपली पाठपण खाजवली होती त्यामुळे खड्यात व आसपास त्याचे केसं पडलेले होते. अस्वलाच इतक्या जवळुन दर्शन झाल्यामुळे आमचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. थोड्यावेळाने आम्ही सतीचामाळ गावात पोहचलो. वनकर्मचारी व गावकरयांना अस्वलाचे फोटो दाखवल्यावर त्यांनी अस्वलाच्या इतक्या जवळ जाऊन व त्याच्यामागे चालुन देखील त्याने आमच्यावर हल्ला कसकायं नाही केला यावर आश्चर्य व्यक्त केलं. मी त्यांना उत्तर दिलं कि ' कदाचित अस्वलाने ओळखलं असेल कि ही माणसं प्राणी व जंगलावर नितांत प्रेम करणारी आहेत म्हणुन त्याने आमच्यावर हल्ला केला नसावा.' :)
या अस्वल दर्शनानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले अस्वलं खरच माणसांची शत्रू आहेत का ? अस्वलं खरच खुनशी व हिंस्र असतात का? कि माणसाने भितीपोटी उगाचचं त्यांची हिंस्त्र प्रितिमा तयार केली आहे ? जसं साप दिसल्यावर माणसं जमीन धोपटायला सुरूवात करतात मग तो विषारी असो किंवा बिनविषारी....
मी लहान असताना गावोगावी वाघवाले लोकं ( प्राण्यांचे खेळ दाखवुन पैसे कमावणारी जात ) अस्वलं नाचवायचे व त्यांचे नखं व केसं विकुन पैसे कमवायचे. अस्वलाची कलाबाजी बघुन बालगोपाल खुश व्हायचे तर मोठी माणसं त्याची नखं व केसं विकत घ्यायची. ह्या खेळात अस्वलाला प्रचंड वेदना व्हायच्या पण त्याकडे कुणाचचं लक्ष जात नसत. जेव्हा जंगलाच्या आसपास राहणारे लोक गुरं चारण्यासाठी किंवा लाकडं तोडण्यासाठी जंगलात जातं तेव्हा जर त्यांना एखाद्या ठिकाणी अस्वलाची पिल्लं दिसली तर ते वाघवाल्यांना येवुन सांगत. 10-15 वाघवाले लोकं मिळुन त्या ठिकाणी जात व आग लावुन फटाके फोडुन अस्वलाच्या मादीला पळवुन लावतं व पिल्लं घेवुन येत. सहा-सात महिण्यांनंतर दाभण गरम करून त्या पिल्लांच्या नाकात आरपार घुसवुन छिद्र तयार करत व त्यात दोरी घालुन त्यांना वेसन घालत व वर्षभरानंतर त्या पिल्लांचे लोखंड कापायच्या यंत्राने दात कापुन टाकतं. नंतर पिल्लांना हाणुन-मारूण कधी कधी उपाशी ठेवुन त्यांना आपल्या इशारयावर नाचायला व कलाबाजी करायला शिकवत. अशाप्रकारे माणसाने अस्वलांवर प्रचंड अत्याचार केले आहेत. कदाचित या सगळ्यामुळे भितीपोटी अस्वलं माणसांप्रती हिंस्र झाली असावीत. अस्वलं हिंस्त्र असली तरी ती नरभक्षक होणं दुर्मिळ आहे. नशीब आता हे असे अस्वल नाचवायचे खेळ बंद झाले आहेत.
अस्वलाचे माणसावर हल्ले हे पहाटे किंवा तिन्हीसांजेला जास्त होतात कारण एकतर अस्वलाची दृष्टी अधू व कान मंद असतात यामुळे अस्वलाला माणसाचे अस्तीत्व लवकर समजत नाही व अस्वलाच्या काळ्या रंगामुळे अंधुक प्रकाशात माणसाला अस्वल दिसत नाही यामुळे अस्वलाचे हल्ले हे माणसाशी अचानक होणारी भेट यातुन निर्माण झालेल्या भितीमुळे स्वरक्षणासाठी केलेले असतात. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत अस्वलांच्या हल्ल्यांच प्रमाण जास्त असतं कारण हा काळ अस्वल माद्यांचा विणीचा काळ असतो. आपल्या पिलांच्या संगोपनाच्या संदर्भात माद्या अधिक आक्रामक व दक्ष असतात. पिल्ले असणारया क्षेत्राजवळ माणसं गेल्यास ती चवताळुन हल्ला करते. आपल्या पिलांना कुठलिही हानी पोहचु नये हि वृत्ती प्रत्येक प्राण्यामधे असते. अगदी आपण घरी प्रेमाने पाळलेली कुत्री किंवा मांजर सुद्धा तिला पिल्लं झाल्यावर सुरूवातीचा काही काळ आपल्याला जवळ येवु देत नाही. हे तर जंगली अस्वलं आहे ते कसकाय आपल्याला त्याची पिल्लं असलेल्या क्षेत्रात येवु देईल ? खर तर अस्वलं हि गोंधळी असतात, चालताना आणि भोजन करताना नेहमी काहीतरी आवाज करीत असतात, यामुळे जागरूक असल्यास माणुस अंधारातही अस्वलाचे अस्तीत्व जाणुन घेवु शकतो व अस्वलापासुन दुर जावुन संघर्ष टाळु शकतो.
आपल्याप्रमाणेच जंगली जिवांनादेखील भावना असतात. त्यांनादेखील जगायला जागा हवी आहे. आपल्या भावनांइतकच महत्व जर आपण वन्यजीवांच्या भावनेला दिलं तर माणुस आणि वन्यजीव नक्कीच सुरक्षित व सुखसमृद्धीने राहु शकतील.
मित्रांनो मिपावर पहिल्यांदाचं लिहायचा प्रयत्न केलाय आशा करतो तुम्हाला आवडले असेल. भटकंती दरम्यान तुम्हाला देखील असे वन्यजीवांचे चित्तथरारक अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा.

वाचने
21864
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
अल्टिमेट हाय हा लेख अँड द
In reply to अल्टिमेट हाय हा लेख अँड द by फेदरवेट साहेब
धन्यवाद
चांगला अनुभव.
In reply to चांगला अनुभव. by एस
धन्यवाद
भारी.
In reply to भारी. by यशोधरा
धन्यवाद
छान लेख
In reply to छान लेख by वरुण मोहिते
धन्यवाद
फोटो दिसेनात.
विलक्षण अनुभव आला तुम्हाला.
In reply to विलक्षण अनुभव आला तुम्हाला. by किसन शिंदे
धन्यवाद
थरारक अनुभव
In reply to थरारक अनुभव by पाटीलभाऊ
धन्यवाद
उत्तम लेख.. तुमच्या
In reply to उत्तम लेख.. तुमच्या by पुंबा
धन्यवाद
छान लेख
In reply to छान लेख by वन्दना सपकाल
धन्यवाद
उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय
In reply to उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय by गवि
तुमचे अनुभव इथे शेअर करा, आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील
In reply to तुमचे अनुभव इथे शेअर करा, आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील by यमगर्निकर
+1
In reply to उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय by गवि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by रानवेडा सचिन
जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा
In reply to जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा by गवि
गवगवा!
झकास लिहीलाय लेख, उत्तम..
In reply to झकास लिहीलाय लेख, उत्तम.. by सानझरी
धन्यवाद
छान लिहिलंय.
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
धन्यवाद
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
धन्यवाद
In reply to मस्त! by पैसा
धन्यवाद
बापरे! थरारक आहे हे.
In reply to बापरे! थरारक आहे हे. by अजया
अस्वल अंगावर आलं की ज्याम हसायला लागायचं
In reply to बापरे! थरारक आहे हे. by अजया
नशीब
वाघवाले
In reply to वाघवाले by Nitin Palkar
वाघवाले
तिकडे नागेश्वरला गेलेलो.
In reply to तिकडे नागेश्वरला गेलेलो. by कंजूस
अस्वल
फोटो आवडले.
In reply to फोटो आवडले. by कंजूस
धन्यवाद
झक्कास हो दादा
In reply to झक्कास हो दादा by अल्पिनिस्ते
धन्यवाद
खत्रा
In reply to खत्रा by टवाळ कार्टा
धन्यवाद
सुंदर लेख.
In reply to सुंदर लेख. by बोका-ए-आझम
धन्यवाद
In reply to धन्यवाद by रानवेडा सचिन
प्रत्येकाचे आभार मानत नका बसू
अजुन पण असेच अनुभव असतील
In reply to अजुन पण असेच अनुभव असतील by पियुशा
धन्यवाद
जबरदस्त
In reply to जबरदस्त by इडली डोसा
धन्यवाद
एकदम खतरनाक अनुभव! अजून असतील
In reply to एकदम खतरनाक अनुभव! अजून असतील by नरेश माने
धन्यवाद
मस्त अनुभव..
In reply to मस्त अनुभव.. by शलभ
धन्यवाद
तुमचा शेवटचा फोटो पाहून पोटात
एकदम खतरनाक अनुभव
मस्त.कसा भाग घ्यायचा ह्या गणन
खरंच नशीबवान आहात!
लै भारी भो
थरारक अनुभव आला आहे.
मस्त
मस्त अनुभव
फार छान अनुभव व तितकेच छान