मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमदिनाची पूर्वसंध्या

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दिवस उगवला हळुवार अलार्म पण किणकिणला नाजुक कूस वळवून बघते तर नवरा उभा हसतमु़ख हातातलं गुलाबाचं फुल लाल गालावरुन फिरलं पिसासारखं "How Romantic Jaanu !" मन नाचलं थुईथुई मोरासाऱखं लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन मूडात होती भलतीच स्वारी म्हटलं घ्यावा भाव खाऊन जे जे वाटतंय करवून घ्यावं ते ते घ्यावं करवून "कैसे मिजाज है आपके जानम ?" जेव्हा सवाल आला म्हटलं "जायचंय आज मला... "रब ने बना दी" बघायला " एरव्ही ह्याला शाहरुखची त्या कायम असते ऍलर्जी आज मात्र चक्क बोलला, "जैसी आपकी मर्जी " हॉलवरची झुंबड बघताच जीव माझा चरकला पण ब्लॅक मधे तिकिट मिळवून मूड त्याने बनवला पिक्चरनंतर जेवण शाही डेझर्ट मात्र राहिलंच बाई "शॉपिंगला नेतो" म्हणताच त्यानं कसं राहिल लक्षात काही ? डिझायनर साडी शोकेसमधली कधीपासून होती खुणावत मॅचिंग ज्वेलरी त्याच्यासोबत वाढवत होती नजाकत मनातले भाव माझ्या सारे दाखवत होता चेहरा मनासारखं शॉपिंग होऊन खुलत होता चेहरा डोळ्यामधे सवाल होता, आता पुढे काय.... "लाँग ड्राईव्ह ला जाऊया का, क्या है आपकी राय ?" अपुन तो खल्लाऽऽऽऽ स !! मंद सुरावट गाडीमधली सारं बोलुन गेली नयनामधली भाषा नयनी सारे बोलुन गेली तृप्तीची त्या पेंग छानशी आली का अवेळी डोळे झाले जड लागली ब्रम्हानंदी टाळी दचकून उठले गाली होता स्पर्श रेशमी करांचा नवरा हलके उठवत होता गुच्छ घेऊनी सुमनांचा स्वप्नामधुनी जागी झाले वास्तव होते स्वप्नपरी प्रेमदिनाची पहाट होती आता मात्र खरीखुरी :) जयश्री अंबासकर

वाचने 2653 वाचनखूण प्रतिक्रिया 11

विसोबा खेचर गुरुवार, 02/12/2009 - 22:55
जियो जयू! अतिशय सुरेख, चित्रदर्शी कविता केली आहेस! लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन ओहोहो खल्लास! क्य केहेने..! जयू, तू आणि तुझा दादला, दोघं भारीच रोमॅन्टिक दिसता बॉ! पिक्चर काय, शाही जेवण काय! मज्जा आहे बॉ! बाय द वे, कवितेतली, "How Romantic Jaanu !" ही मराठी ओळ खूप आवडून गेली! :) असो, तुम्हा उभयतांना प्रेमदिनाच्या शुभेच्छा! आपला, (रोमॅन्टिक) तात्या.

प्राजु गुरुवार, 02/12/2009 - 22:58
अगदी ड्रिम कम ट्रू! मस्त कविता... जयूताई, अभिनंदन! पहाटे पहाटे मला जाग आली... प्रेमदिनाची अशी सुरूवात झाली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग गुरुवार, 02/12/2009 - 23:04
स्वप्नभारल्या ओळी आणि एकदम त्यातूनच वास्तवाची गुंफण, मस्तच! जियो!! (मी या. वि. क. ना. का. न. ;) ) चतुरंग

संदीप चित्रे गुरुवार, 02/12/2009 - 23:18
एकदम तरल ... >> अपुन तो खल्लाऽऽऽऽ स !! ही ओळ तर इतकी अनपेक्षितपणे आली ना... व्वा ! व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा.

दशानन Fri, 02/13/2009 - 07:23
+१ सुंदर. व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला एकदा पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! - देवदास पण आता बाय-बाय =))

अनिल हटेला Fri, 02/13/2009 - 13:05
=D> =D> क्या बात है !!! जीयो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल Fri, 02/13/2009 - 17:48
जयवी ताई, कसली गोड स्वप्न दाखवलीस तु. :) मस्तच प्रेमकाव्य.. :)

वाहीदा Fri, 02/13/2009 - 18:09
काय मस्त Romantic आहात ग तुम्ही दोघे ! Ultimate !! खरच रब ने बना दी जोडी तुमची ! ! असेच रहा नेहमी ... हसत खेळत ~ वाहीदा