प्रेमदिनाची पूर्वसंध्या
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दिवस उगवला हळुवार
अलार्म पण किणकिणला नाजुक
कूस वळवून बघते तर
नवरा उभा हसतमु़ख
हातातलं गुलाबाचं फुल लाल
गालावरुन फिरलं पिसासारखं
"How Romantic Jaanu !"
मन नाचलं थुईथुई मोरासाऱखं
लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं
हातात हात घेऊन
"Tea....Your Highness..." म्हणाला
हातात कप देऊन
मूडात होती भलतीच स्वारी
म्हटलं घ्यावा भाव खाऊन
जे जे वाटतंय करवून घ्यावं
ते ते घ्यावं करवून
"कैसे मिजाज है आपके जानम ?"
जेव्हा सवाल आला
म्हटलं "जायचंय आज मला...
"रब ने बना दी" बघायला "
एरव्ही ह्याला शाहरुखची त्या
कायम असते ऍलर्जी
आज मात्र चक्क बोलला,
"जैसी आपकी मर्जी "
हॉलवरची झुंबड बघताच
जीव माझा चरकला
पण ब्लॅक मधे तिकिट मिळवून
मूड त्याने बनवला
पिक्चरनंतर जेवण शाही
डेझर्ट मात्र राहिलंच बाई
"शॉपिंगला नेतो" म्हणताच त्यानं
कसं राहिल लक्षात काही ?
डिझायनर साडी शोकेसमधली
कधीपासून होती खुणावत
मॅचिंग ज्वेलरी त्याच्यासोबत
वाढवत होती नजाकत
मनातले भाव माझ्या सारे
दाखवत होता चेहरा
मनासारखं शॉपिंग होऊन
खुलत होता चेहरा
डोळ्यामधे सवाल होता,
आता पुढे काय....
"लाँग ड्राईव्ह ला जाऊया का,
क्या है आपकी राय ?"
अपुन तो खल्लाऽऽऽऽ स !!
मंद सुरावट गाडीमधली
सारं बोलुन गेली
नयनामधली भाषा नयनी
सारे बोलुन गेली
तृप्तीची त्या पेंग छानशी
आली का अवेळी
डोळे झाले जड
लागली ब्रम्हानंदी टाळी
दचकून उठले गाली होता
स्पर्श रेशमी करांचा
नवरा हलके उठवत होता
गुच्छ घेऊनी सुमनांचा
स्वप्नामधुनी जागी झाले
वास्तव होते स्वप्नपरी
प्रेमदिनाची पहाट होती
आता मात्र खरीखुरी :)
जयश्री अंबासकर
वाचन
2653
प्रतिक्रिया
0