नितंबावतीची कथा.....
लेखनप्रकार
...सारंगची भानगड ऐकून मित्रमंडळीत एकदम गडबड उडाली. मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या आमच्या मित्रमंडळींची फार मोठी पंचाईत झाली खरी. त्याला आता कसे सुनवायचे, किंवा त्याची मित्रमंडळींतून कशी हकालपट्टी करायची याबद्दल एकत्र व खाजगीत चर्चा झडू लागल्या.
खरे तर त्याचा हा वैयक्तिक प्रश्र्न होता आणि आमच्यापैकी कोणालाही त्यात नाक खुपसायची गरज नव्हती. पण समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावरच असल्यासारखी आमची मंडळी व त्यांच्या बायका वागत होत्या. सारंगने सध्याच्या नैतिक अधिष्ठानाला जोरदार धक्का दिला व आमच्या मित्रमंडळींना व त्यांच्या बायकांना तोंडघशी पाडले. त्यांना समाजात तोंड दाखविण्यास जागा उरली नाही असे त्यांचे म्हणणे होते. बायकांनीही फारसा विचार न करता नवऱ्यांच्या हो ला हो मिळविण्यातच आपली खरी वडपूजा आहे अशा ठामसमजुतीने त्यांच्या विचाराभोवती स्वत:चे धागे गुंडाळले. यात त्या बाईचेही म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे हे त्या सोयिस्कररित्या विसरल्या.
सारंग काय म्हणतोय याचा विचार न करता हे सगळे चालले होते. तो सांगून सांगून दमला की त्याचीही बाजू कोणीतरी ऐकावी. पण नाही. पुरुष मंडळी खरे तर त्याच्यावर जळत होती. अशी सुंदर स्त्री त्याच्या नशिबी यावी याचा सगळ्यांनाच मत्सर वाटत होता. मत्सराने विचारांना तिलांजली दिली व त्याच्या धुरात आमच्या मैत्रीचा जीव घुसमटला.
सारंगने गावाहून एका बाईला पळवून आणले होते. दुर्दैवाने तिचे लग्न झाले होते. त्यामुळे हे सगळे मोहोळ उठले होते. असो. आज याचा तुकडा पाडायचा असे ठरवून सगळे भेटणार होते. अखेरीस सगळे समीरच्या घरी जमले. बायकांनीही हट्ट धरल्यामुळे सारंगच्या प्रेमपात्रासही हजर होण्यासाठी हुकुम सोडला गेला होता. आता तुम्ही विचाराल की सारंगने हे सर्व कसे काय कबूल केले. एकतर त्याला तो याला यशस्वीपणे तोंड देईल याची त्याला खात्री असावी. दुसरे म्हणजे आम्ही शाळेपासून मित्र असल्यामुळे त्याला हे बंध तोडणे जड जात असावे आणि तिसरे पण मुख्य म्हणजे समाजातील अत्यंत सामान्य विचारांच्या माणसांवर व त्यांच्या सामान्य विचारांवर आसूड ओढण्याची एकही संधी तो सोडत नसे.
ग्लास भरल्यावर चर्चा सुरु झाली. प्रत्येकाने त्याचे हे वागणे कसे आवडले नाही, त्याच्या अशा वागण्याने त्यांचीही कशी बदनामी होते इ.इ. ठासून सांगितले. बायकांना खरे तर यात काहीच रस नव्हता. त्यांना रस होता त्यांच्या प्रेमकहाणीत. ते एकमेकांना कसे भेटले, तिच्या नवऱ्याने आता याचा सूड घेतला तर.....म्हणजे त्यांना या कहाणीच्या सिरियलमधे खरा रस होता. पार्वती मात्र गुपचुपपणे एका खिडकीजवळ खुर्चीत बसली होती. फारच झाले की खिडकीबाहेर तंद्रीत नजर लावण्याचे नाटक करीत होती. पुरुष मंडळी तर चोरुन तिच्याकडे चोरुन पहाण्यात गर्क होती. एका दोघांना तिच्याकडे पाहताना सारंगने त्यांना पकडले सुद्धा. त्यांच्या ओशाळलेल्या हास्याकडे पहात त्याने नुसते स्मितहास्य केले. पण त्या हास्याने आमच्या सगळ्यांचे पितळ उघडे पाडले हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. आता तुम्हाला प्रकरण काय आहे याची कल्पना आली असेल्. अखेर सांरंगने तोंड उघडले.
‘‘मला कल्पना आहे की तुमच्या चारित्र्य या विषयीच्या भ्रामक समजुतींना फार मोठा धक्का बसलाय. अर्थात मी ‘तुम्हाला काय करायचे आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसून?’ असे सहज विचारु शकलो असतो पण मी तसे करणार नाही. त्याची कारणे नंतर पाहू. पण माझी बाजू मांडण्याआधी मी तुम्हाला एक कथा सांगतो. नंतर काही प्रश्र्न विचारतो. त्याची उत्तरे प्रामाणिकपणे देण्याची गरज तुम्हाला आहे. बहुदा त्यानेच हे प्रकरण येथेच संपेल. नाही संपले तर मी तुमच्या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे देईन. या प्रश्र्नांची उत्तरे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांनीही द्यायची आहेत कारण त्यांनी एका स्त्रिला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अजून एक. हे सगळे झाल्यावर आणि तुम्हाला माझी बाजू समजा पटली तर झालं गेलं सगळं विसरुन पूर्वीप्रमाणे आपले संबंध रहावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेला तुम्ही प्रामाणिकपणे मान द्यावा असे माझे मागणे आहे.
‘‘माझी अजून एक अट आहे. माझे बोलून झाल्यावर सगळ्यांच्या नावाने चिठ्ठ्या टाकाव्यात व प्रत्येकाने त्याने केलेल्या कुठल्याही स्त्रिवरील अन्यायाची हकिकत सांगावी. मग ती कोणीही असो..प्रेयसी, बायको, आई, बहीण मैत्रिण...इ. इ. आयुष्यात कुठल्याच स्त्रीवर अन्याय केलाच नाही असे होऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना अगदी जवळून ओळखतोच. मान्य असेल तर चिठ्ठ्या टाका.’’
सगळ्यांनी अडखळत होकार दिल्यावर चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. ..अर्थात त्याची ही अट कशाला मान्य केली, असे सगळ्यांना वाटले असणार या बद्दल शंकाच नाही. सात क्रमांक लावण्यात आले. समीरचा दुसरा क्रमांक आला. आठवा सारंग म्हणाला,
‘‘तर ऐका तर...
शूरसेन देशात एक मथुरा नावाची नगरी होती. तेथे शूद्र जातीचा एक माणूस रहात होता. तो बुद्धीमान, कलेचा व सौंदर्याचा मोठा भोक्ता होता. मित्रामित्रांमधील कलह मिटविण्यात तर त्याचा हात कोणीही धरत नसे. तो त्याच्या या गुणामुळे एवढा लोकप्रिय झाला की त्याला सर्वजण कलह-कंटक म्हणून ओळखू लागले.
एकदा कलहकंटकाने एका चित्रकाराने रंगविलेले कुठल्यातरी स्त्रीचे तैलचित्र पाहिले. ते चित्र पाहताच तो कामातूर झाला व म्हणाला,
“महाराज या चित्रात भरपूर विरोधाभास भरलेला दिसतोय.” चित्रकाराने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर त्याने त्याच्या विधानापुष्ट्यर्थ खालील निरीक्षणे नोंदविली-
‘एवढी सुंदर स्त्री सामान्य, सभ्य घरात जन्माला येणे जरा अशक्यच वाटते पण तिच्या शांत, नम्र चेहऱ्यावरुन ती एका घरंदाज घरातील वाटते. तिचा चेहरा तरुण व शरीर एखाद्या तरुण वयातील स्त्रीसारखे दिसत आहे पण तिच्या डोळ्यातील भाव एखाद्या प्रौढ अनुभवी स्त्रीसारखे दिसत आहेत. तिने केसाची एकच वेणी घातली आहे पण तिचा पती परगावी गेल्याच्या इतर खुणा दिसत नाहीत. तिच्या फक्त उजव्या अंगावर नखक्षते दिसतात म्हणजे बहुधा ती एखाद्या वयस्कर माणसाची पत्नी असावी व ती असमाधानी असावी. रतिसुखापासून वंचित राहिलेल्या या स्त्रीचे चित्र तू कुठे काढले आहेस? कोणाची पत्नी आहे ही?’’
त्याने बांधलेले आडाखे बरोबर ठरल्याने त्या चित्रकाराने त्याचे अभिनंदन केले व म्हणाला,
“उज्जैनीचा प्रसिद्ध सार्थवाह अनंतकीर्तिची ती पत्नी आहे. तिच्या नितंबाच्या मोहक हालचालींमुळे तिचे नाव नितंबावती पडले आहे. मी तिला प्रथम पाहिले तेव्हाच तिचे सौंदर्य माझ्या मनात भरल्यामुळे मी लगेचच तिचे तैलचित्र रंगविले.’’
कलहकंटक त्या चित्राकडे पहात तिच्या प्रेमातच पडला. तो इतका कामातूर झाला की त्याने तिच्या दर्शनासाठी तडक उज्जैनिचा रस्ता धरला. ज्योतिषाचा वेष करुन तो भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तो तिच्या घरात शिरला. तेथे त्याला त्याच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. तिला प्रत्यक्ष पाहताच तिला प्राप्त करण्याची त्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली. तिच्या दर्शनाने तृप्त झाल्या झाल्या त्याने गावातील प्रतिष्ठितांची गाठ घेतली व स्मशानाचा राखणदार म्हणून ठेवण्याची त्यांना विनंती केली. अर्थातच त्या जागेवर काम करण्यासाठी कोणी मिळत नसल्यामुळे त्याची ती विनंती लगेचच मान्य करण्यात आली. नंतर त्याने एका अर्हंतिका नावाच्या श्रमणिकेशी संधान बांधले व प्रेतांवरील अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन तिला खूष केले.
अर्हंतिकेकडून त्याने नितंबवतीला अनेक निरोप पाठविले पण ते सगळे प्रयत्न वाया गेले. अर्हंतिकेने शेवटी त्याला समजावून सांगितले की घरंदाज स्त्रिया अशा कारस्थानांना बळी पडून गैरमार्गाला लागणे अवघडच असते. हे पटल्यावर त्याने अर्हंतिकेला तिच्याकडे परत एकदा जाण्यास सांगितले व खाजगीमधे तिला निरोप सांगण्यास सांगितले,
‘मी जग फार जवळून पाहिले आहे. जगाचे भलेबुरे मार्ग मला चांगलेच माहीत आहेत पण मी आता सगळे सोडून योगाभ्यासाच्या मागे लागलोय. मी आपल्यासारख्या कुलीन स्त्रीला भ्रष्ट करण्याचा विचार तरी कसा करेन? मी तुमची परिक्षा घेत होतो. अर्थात आपण त्यात उत्तीर्ण झाला आहात हे सांगणे न लगे. आता तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी एवढेच माझे परमेश्वराजवळ मागणे आहे. पण आपला पती पंडुरोगाने ग्रस्त आहे त्यामुळे ते अवघड आहे. आपण काळजी करु नका. आपण वृक्षवाटिकेमधे या. तेथे मी एका मांत्रिकाला पाठवतो. तेथे आपण आपले पाऊल त्याच्या हातात ठेवा व त्याला त्याचे मंत्र म्हणू द्या. एकदा हे झाले की प्रणयकाळात त्याच पायाने तुमच्या पतीच्या छातीवर एक लाथ मारा. याने त्याला त्याची शक्ती परत मिळेल व त्याच्यापासून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. एवढेच नाही तर तो शेवटपर्यंत आपल्या आज्ञेत राहील याची मी खात्री देतो..’
‘मला खात्री आहे हा निरोप मिळाल्यावर ती तुझ्याबरोबर येण्यास तयार होईल. मी रात्री वृक्षवाटिकेत गेल्यावर तू तिला तेथे घेऊन ये. मी तुझे उपकार या जन्मी विसरणार नाही.’
अर्हंतिकेने त्याने सांगितल्याप्रमाणे सगळे केले. त्याच रात्री कलहकंटक आनंदाने वृक्षवाटिकेत गेला. अर्हंतकिनेही नितंबावतीचे मन तेथे जाण्याबद्दल वळविले. मंत्र उच्चारणावेळी त्याने तिच्या पायाला हलकासा हात लावला व चलाखीने तिच्या त्या पायातील पैजण काढून घेतले. एवढेच नाही तर त्याने तिच्या मांडीच्या आतील बाजूस एका सुईने जखम केली व तेथून पळून गेला.
ती घाबरली व स्वत:च्या मूर्खपणाला दूषणे देत तिने त्या माणसाचा उद्धार केला व घरी परतली. घरी परत आल्यावर तिने ती जखम धुतली व त्यावर मलमपट्टी केली. आजारी असल्याचा बहाणा करत तिने तिच्या पायातील दुसरे पैंजण काढले व झोपी गेली. काही दिवस असेच गेले.
इकडे हा बदमाष अनंतकीर्तिकडे ते पैजण विकण्यास गेला. अनंतकीर्तिने ते पैंजण त्याच्या पत्नीचे आहे हे ओळखले व त्याला ते कुठे सापडले हे दरडावून विचारले. पण तो गप्प बसला. खोदून विचारल्यावर त्याने ती हकिकत व्यापार्यांच्या समितीसमोरच सांगेल अशी अट घातली.
अनंतकीर्तिने ताबडतोब त्याच्या पत्नीकडे तिची पैजणे पाठवून देण्यास सांगितले. तिने घाबरुन उत्तर दिले,
‘मी रात्री वृक्षवाटिकेत गेले असता माझे एक पैंजण तेथे पडले आहे. बराच शोध घेऊनही ते सापडले नाही पण मी दुसरे तुमच्याकडे पाठवीत आहे.’
ही माहिती मिळाल्यावर अनंतकिर्तीने ते पैंजण व कलहकंटकाला बरोबर घेऊन व्यापार्यांचे समिती कार्यालय गाठले.
त्या बैठकीत उलट तपासणीला उत्तर देत असताना त्याने त्याला ते पैंजण कुठे व कसे सापडले ते सांगितले,
“मी स्मशानभूमित रखवालदाराचे काम करतो हे आपल्याला माहितच आहे. आपणच मला ते काम दिले आहे. मी तेथेच राहतो व रात्री स्मशानात झोपतो कारण काही लोभी निशाचर रात्री प्रेते जाळण्यास येतात. त्या दिवशी रात्री मला एक बुरखा घेतलेली स्त्री एक अर्धवट जळालेले प्रेत चितेवरुन खाली खेचताना दिसली. माझ्या कर्तव्याला जागून, न घाबरता मी त्या स्त्रीला पकडले. झालेल्या झटापटीत तिचे हे पैंजण माझ्या हातात आले व तिच्या मांडीवर माझ्या हातातील शस्त्राने जखमही झाली. पण दुर्दैवाने ती पळून गेली. ते हे पैजण, याचे पुढे काय करायचे ते आपण ठरवा!’
त्याच्या कबुलीजबाबावर चर्चा झाल्यावर व मांडीवरील जखमेची खातरजमा केल्यावर सर्वानुमते नितंबावती एक चेटकीण आहे असा निकाल झाला. झालेल्या अपमानाने दु:खी होत तिने आत्महत्या करण्यासाठी स्मशान गाठले. तिला पाहिल्याबरोबर या बदमाषाने तिला गाठले. तिच्या हातापाया पडून, गयावया करत त्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला,
‘हे सुंदरी मी तुला प्राप्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले व शेवटी हा मार्ग स्वीकारला. मी तुझ्यावाचून राहूच शकत नाही. माझ्यावर कृपा कर व माझी हो! तुझ्याशिवाय मला कोण आहे? मी तुझा दास होऊन राहीन.’’
अनेकवेळा तिच्या पाया पडत व अनेक वचने देत त्याने ही विनंती वारंवार केली. शेवटी तिलाही कोठे जाण्यास जागा नसल्यामुळे तिने त्याची विनंती मान्य केली. नंतर ते सुखाने संसार करु लागले...
आता माझे प्रश्र्न...
१ नितंबावती अपत्यसुखासाठी तडफडत होती, ते चूक आहे का? ती स्त्रिसुलभ भावना नाही का ?
२ जर एखाद्या स्त्रिला मूल नाही म्हणून आजही घराबाहेर काढले जाते तर ती नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडू शकत नाही का ?
३ रतिसुख हे एक जिवनाचे महत्वाचे अंग आहे तर नितंबावतीने स्वत:ला त्यापासून वंचित का ठेवावे ?
४ जर नितंबावती तिच्या नवऱ्याला शारीरिक सूख देऊ शकली नसती तर त्याने काय केले असते.
५ आहे तसेच आयुष्य जगून दोघांचेही आयुष्य बरबाद झाले असते. आणि ते केवळ समाजाच्या दबावाखाली. हे बरोबर आहे का ?
६ मी एखाद्या स्त्रिला जर या प्रकरणात अशी मदत केली आणि ती तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीतही नसल्यास माझे काय चुकले ?
७ या प्रकरणात मी कोणावर अन्याय केला आहे ?
थांबा ! उत्तरे देण्याआधी तुम्हालाही बोलायचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्हालाही प्रश्र्न विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या आणि मग उत्तरे द्या.. अशी माझी विनंती आहे...''
एवढे बोलून त्याने एक मोठा श्र्वास घेतला व काय परिणाम साधला आहे हे पाहण्यासाठी श्रोत्यांवरुन एक भेदक नजर फिरविली...
क्षणभर तेथे स्मशान शांतता पसरली....
बायकांची कुजबुज थांबली.
त्या त्यांच्या नवऱ्यांकडे पाहू लागल्या.
त्याच्या नजरेतच अनेक प्रश्र्न दडलेले होते....
जयंत कुलकर्णी.
या लिखाणातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
नितंबावतीची कहाणी मी अनुवाद केलेल्या दशकुमारचरितम्मधून घेतलेली आहे. मुळ लेखक आचार्य श्री दण्डी. (ही पुस्तकाची जहिरात नाही. मी ही कथा लिहिण्याचे ते पुस्तक वाचल्यावाचल्याच ठरविले होते)
वाचने
22129
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
+१.
In reply to +१. by एस
हेच
रोचक !
इंट्रेष्टिंग...
+१
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by खेडूत
धन्यवाद ! मी प्रथम शूद्र असेच
अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य
In reply to अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य by प्रसाद गोडबोले
+१११
In reply to अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी!!!
मस्त..
पुभालटा.
मस्त लिहिलंय
छान कथा आणि गहन विषय
In reply to छान कथा आणि गहन विषय by कपिलमुनी
+११
रोचक कथा
मस्तच
कथा अतिशय सुंदर आहे आणि भीषण
क्रमश: का लिहीले नाही हो!
इंटरेस्टिंग
कथा नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.
"मलेना".......
In reply to "मलेना"....... by पगला गजोधर
डिट्टो ;)
In reply to "मलेना"....... by पगला गजोधर
कथा वाचून नाही आठवली...
In reply to "मलेना"....... by पगला गजोधर
¿¿¿¿¿¿¿
कथा आवडली.
तत्कालीन संदर्भात कथा स्फोटक असेल...
लैच रोचक. पु.भा.प्र.
विचारप्रवर्तक कथा
In reply to विचारप्रवर्तक कथा by गामा पैलवान
+१०००००००० योग्य मत
आदरणीय गा. पै. यांच्याशी सहमत
दोषी निर्दोषीची चर्चा कशाला?
In reply to दोषी निर्दोषीची चर्चा कशाला? by कलंत्री
२ थंब्ज अप!!
हं !
उत्तम कथा ! याबद्दल चर्चा
कविर्दण्डी कविर्दण्डी कविर्दण्डी न संशयः ||
ही कथा वाचताच माझ्या टकुर्
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem GeetIn reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण
बाब्बो .... एवढा अभ्यास
In reply to बाब्बो .... एवढा अभ्यास by माझीही शॅम्पेन
एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर
In reply to एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर by नरेश माने
+1
In reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण
हो बरोबर आहे. अशा अनेक कथा
In reply to हो बरोबर आहे. अशा अनेक कथा by जयंत कुलकर्णी
+११
In reply to +११ by पिलीयन रायडर
श्री. मदणबाण यांची
In reply to श्री. मदणबाण यांची by जयंत कुलकर्णी
या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ?
In reply to या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ? by संजय क्षीरसागर
१ कथा संपली. पुढील भाग
In reply to १ कथा संपली. पुढील भाग by जयंत कुलकर्णी
असं कसं ?
In reply to असं कसं ? by संजय क्षीरसागर
//मग प्रश्नच निर्माण करु नये
In reply to या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ? by संजय क्षीरसागर
मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी
In reply to मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी by पगला गजोधर
स्वतःच्या जवाबदारीवर वाचा !
In reply to श्री. मदणबाण यांची by जयंत कुलकर्णी
श्री. मदणबाण यांची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- BefikreIn reply to श्री. मदणबाण यांची by मदनबाण
मदनबाण,
In reply to +११ by पिलीयन रायडर
चोरी पकडल्याच्या आविर्भावात
In reply to चोरी पकडल्याच्या आविर्भावात by माझीही शॅम्पेन
+1
In reply to +1 by जव्हेरगंज
तसं असेल तर चाम्गलंच आहे की
In reply to +११ by पिलीयन रायडर
जयंत काकांवर यांच्यावर
In reply to हो बरोबर आहे. अशा अनेक कथा by जयंत कुलकर्णी
प्रतिसाद ऑफ द इयर !
In reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण
तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ
In reply to तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ by निओ१
याचा अर्थ मला समजला नाही.
In reply to तुम्ही लेखनीच पकडली आहे. मुळ by निओ१
याचा अर्थ मला समजला नाही.
१ नितंबावती अपत्यसुखासाठी
खूप सुंदर कथा लिहील आहात्त.
१ नितंबावती अपत्यसुखासाठी
कथा छानच
In reply to कथा छानच by बॅटमॅन
संचाक = ?
In reply to कथा छानच by बॅटमॅन
संचाक = ?
In reply to कथा छानच by बॅटमॅन
संचाक = ?
In reply to संचाक = ? by गामा पैलवान
मचाकसारखे संचाक ओ गामाशेठ.
In reply to मचाकसारखे संचाक ओ गामाशेठ. by बॅटमॅन
हां कळलं पण ....