लेखकचौकटराजायांनी शुक्रवार, 25/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गेले वर्षी मांडू-इन्दोर-उजैन- महेश्वर अशी सहल करून झाल्यानंतर घरातील सर्वानी आणखी एक सहल हवी असा आग्रह धरला. आपल्याला काय भटकायची जाम आवड. म्हटले चला यावेळी राजस्थान एम पी त घुसू या. तीन महिने अगोदर ट्रेन बुकिंग केले. हॉटेले परवडतील व स्टेशन पासून फार लांब नसतील अशी निवडून त्यांचेही ऑन लाईन बुकिंग केले व बिन्धास्त झालो. यावेळी जयपूर - झांशी- ओर्छा -ग्वलिअर ही स्थाने निवडली होती.
माझ्या स्नेही वासंती घैसास यानी फार पूर्वी ओर्छा या भारतीय टूर ऑपरेटर्स कडून दुर्लक्षित जागी भेट देण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार मी जायचे पक्के ठरविले होते. पूर्वी माउंट अबू येथील हॉटेल कर्मचार्याने जयपूर पहा असे सुचविले होते सबब जयपूरचा ही समावेश झाला.मला राजेरजवाडयांच्या इतिहासात फारसा रस नाही त्यामुळे त्यांच्या आख्यायिका वगैरे सांगणारा गाईड नावाचा प्राणी मी माझ्यापासून लांबच ठेवत असतो. दुसरे असे की गाईड बोलायला लागला की आपले लक्ष मूळ कलाकृतीवरून विचलित होते असा माझा अनुभव आहे. तिसरे असे की हा प्राणी गाईड च्या धंद्यातून फारसे पैसे न मिळवता प्रवाशास मी एम्पोरियम मधे कसा सोडीन याचा विचार जास्त करतो. सबब आपणच काही माहिती गोळा करावयाची व आस्वाद घेत भटकायचे असा माझा प्लान असतो.
आता या सहलीकडे वळण्यापूर्वी एका महत्वाच्या आस्वादक अभ्यासाकडे आपण जरा पाहू या.
आपणास सर्वाना माहीत आहे की राजस्थान , मध्य भारत कर्नाटक व आंध्र हे तेथील निरनिराळ्या दगडांसाठी प्रसिद्ध आहेत. ग्रानाईट साठी दक्षिण भारत तर संगमरवर,धोलपूर सॅन्डस्टोन साठी राजस्थान व मध्य भारत हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र हा मुख्यता: बेसाल्ट या अग्निजन्य दगडासाठी माहित आहे. तरीही अजंता एलोरा येथील गुफात काही प्रमाणात सॅन्डस्टोन आहे पण त्यातील शेडस राजस्थान सारख्या आकर्षक नाहीत.आपल्याकडे बाहेरून सॅन्ड्स्टोन आणून बंगल्याला बाहेरून श्रीमंती आणण्याची फॅशन पुण्यात दिसते.लाईमस्टोन हा असाच एक प्रकार आहे पण तो सॅन्डस्टोन पेक्षा जरा नरम असतो. सॅन्ड्स्टोन या प्रकारात असंख्य रंग व छटा येतात सबब सार्वजनिक इमारतीत ही हा वापरला जातो. उदा. सी एस टी ची इमारत बी एम सी ची इमारत. इजिप्त मधील अबु सिम्बेल ,जॉर्डन मधील पेट्रा ही सॅन्ड्स्टोन ची ठळक उदाहरणे आहेत. राजस्तानात संडासापासून प्रासादा पर्यत या दगडाचे प्राबल्य आपल्याला दिसून येते. यात सिलिकॉन डाय ऑक्साईड प्रंमाणे मायका चे ही काही प्रमाण असते. याचा प्रत्यय काही चमचम करणारे दगड आपल्या पायाखाली राजस्थान मधे आपल्याला पाहायला मिळतात.
जयपूर येथील बिर्ला मंदिर , जवाहर सर्कल, वर्ल्ड ट्रेड पार्क, अल्बर्ट हॉल संग्रहालय,हवामहल,सिटी पॅलेस , जंतर मंतर, आमेर किला, जयगड किला, नाहरगड किला, गालताजी .
ओर्छा येथील, जहांगीर महल, राजा महल, रामराज मदिर, चतुर्भूज मंदिर, लक्ष्मी मंदिर , व छत्री समाध्या.
ग्वालियर येथील मानसिंह पॅलेस, गुजरी महल, सास बहू मंदिर.,तेली का मन्दिर व जयविलास पॅलेस ई ना आपण भेटी देणार आहोत.
या पहिल्या भागात एवढेच..
जाता जाता -- खाली माझे घरील वॉलपेपर
त्या खाली -- जयपूर जयगड येथील त्याचा नैसर्गिक अविष्कार--
मी दगडांच्या प्रेमात आहे तो गोनिदांच्या सहवासात असल्यापासून त्याना निरनिराळे रंगीत दगड सापडवून ते चक्रावर घासून निररनिराळे आकार तयार करण्याचा नाद होता. ते काही वेळेस मला व माझ्या भावाला या कामाला लावत.
बाकी दगड हा विषय अगाध आहे. अग्निजन्य, स्तरजन्य व रूपांतरीत असे स्थूलमानाने त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण होते एवढेच माझे ज्ञान आहे. त्यात ग्रानाईट व इटालियन मार्बल हे आवडते आहेत.
व्वा पंत. तुम्ही खूपच सुंदर जागांचे भ्रमण करून आलात. आता प्रवासवर्णनाची वाट बघत आहे.
ओरछा म्हणजे शांत, रमणीय, गर्दीपासून दूर असलेली जागा. सुंदर भग्नावशेष, दाट जंगल, नितळ पाण्याची बेतवा नदी, नदीतल्या खडकावर दिवसभर नागडे पडले रहा तरी बघणारे कोणी नाही..... मला ओरछा बद्दल पु.ना.ओकांनी सांगितले होते, त्यानंतर बरेचदा जाऊन राहून आलोय. अलिकडे मात्र खूप वर्षात जाणे झाले नाही, तरी पूर्वीसारखेच असेल अशी आशा आहे. 'ओरछा की नर्तकी' नामक प्रसिद्ध कादंबरी (बहुतेक वृंदावनलाल वर्मा यांची) आहे असे ऐकले आहे, पण अद्याप वाचलेली नाही.
आपल्याकडे प्राचीन कलेबद्दल किती अज्ञान, अनास्था आहे, याचा ओरछा मधील नमुना :
कंका ,मांडूचे माझ्याकडे त्रिमितीय फोटो मी काढलेत पण त्याला पहायला त्रेमितीय टी व्ही लागतो. बाकी त्याचा धागा काढला नव्हता. आमचे कडे आलात तर बरेच ठिकाणचे फटू आहेत. पहाता येतील. वल्लीनाही बोलवू.
नक्कीच। वल्लीबरोबर विसापूर करायचं आहेच. विचारून दिवस ठरवा.माझ्या या ट्रिपचे बरेचसे फोटो फ्याम्लिचेच काढले गेले होते त्यामुळे धागा /वृतान्त लिहिला नव्हता. बाकी ते ३डी फोटो कसे काढले वगैरे उत्सुकता भारी वाढलीय. एक चांगला कट्टा जमेल यात शंकाच नाही.लवकर ठरवा.
झाशी की रानी मालिका चालू असताना मुलीने झाशीला ट्रिप काढायला लावली. फक्त ग्वाल्हेर (ग्वालिअर) आणि ओर्छा पाहिलेले. वेळेअभावी दतिया राहिलेले. खूप मराठी कुटुंबं राहातात तिकडे.रानीचा मृत्यु पुरुषी वेषात ग्वाल्हेरमध्ये झाला. अर्धे शहर शिंद्यांच्या मालकीची जमीन आहे. सामान्य जनता राणीबद्दल फार आदराने बोलते. तिथे स्मारक आहे.पुण्यतिथीच्या दिवशी बय्राच स्त्रिया राणीसारखा वेष, तरवारी घेऊन साजरा करतात. शिंद्यांबद्दल राग आहे.
मराठी लोकांनी पर्यटनाची सुरुवात झाशी अथवा तंजावूरपासून करावी.
गुगल्फोटोमध्ये पब्लिक शेअरींगसाठी...
१. एकच चित्र शेअर करताना, चित्र पूर्ण आकारात उघडल्यावर (थंबनेल नाही)....
२. अल्बममधील सर्व चित्रे शेअर करताना, अल्बम उघडल्यावर...
... दिसणार्या विंडोच्या वर उजवीकडे असलेल्या आयकॉन्सपैकी खालील (share) आयकॉनवर क्लिक करा...
...व पुढे त्यातील पर्याय वापरून काम पुरे करा.
तुम्हाला माझ्या "फेसबुक-kanjoos" ( तात्पुरते कंजूस व्हा) ग्रुप मध्ये add केलय तिकडे फोटो टाका. मग आणू इकडे. तिकडचे फोटो फेसबुकवरच्या इतर फ्रेंडसर्कलला नाही दिसणार.
हंपी बदामी बेल्लारी हा भाग लोहयुक्त मातीचाच आहे. बेल्लारी ते होस्पेट या रेल्वे प्रवासात बाजूला अशी धातूमिश्रीत लाल माती
मालगाड्यांमधून उचलण्याचे काम चालते.
फार सुरेख भिंती. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंतीही अशा स्वरूपाच्या तांबूस आहेत. इतर किल्ल्यांसारख्या काळ्याकभिन्न नाहीत. यामुळेही सिंधुदुर्गाचे वेगळेपण ठसते.
प्रतिक्रिया
दगड
नाही..
In reply to दगड by जॉनी
दगड हा विषय अगाध आहे
In reply to नाही.. by चौकटराजा
व्वा.
अरेरे... केवळ नालायक लोक आहोत
In reply to व्वा. by चित्रगुप्त
प्रतिक्षेत.कोणते दगड दाखवणार?
घरी या ..
In reply to प्रतिक्षेत.कोणते दगड दाखवणार? by कंजूस
नक्कीच। वल्लीबरोबर विसापूर
In reply to घरी या .. by चौकटराजा
पॅनासोनिक
In reply to नक्कीच। वल्लीबरोबर विसापूर by कंजूस
फोटो दिसले नाहीत. वालुकाश्म,
फोटो दिसत नाहीत.
फोटो दिसेनात
In reply to फोटो दिसत नाहीत. by प्रचेतस
आम्ही पण गाईड कधी घेत नै हो.
In reply to फोटो दिसेनात by नाखु
व्यनीत
In reply to आम्ही पण गाईड कधी घेत नै हो. by प्रचेतस
फोटो दिसत नाहीयेत :(
फटू दिसेनात
ओरछा
फोटो दिसत नाहीयेत
झाशी की रानी मालिका चालू
फोटो दिसत नाही ? अरे कोण आहे
मला एकट्यालाच ..
In reply to फोटो दिसत नाही ? अरे कोण आहे by चौकटराजा
तुमच्या फोटोच्या या लिंक्स
नाही ... गुगल
गुगल्फोटोमध्ये पब्लिक
In reply to नाही ... गुगल by चौकटराजा
फेसबुकला फोटेो टाका तिथून
तुम्हाला माझ्या "फेसबुक
फोटो
दगडांचा रंग, पोत फार सुरेख.
In reply to फोटो by कंजूस
ही भिन्त
In reply to दगडांचा रंग, पोत फार सुरेख. by यशोधरा
हे कोणते दगड आहेत?
In reply to ही भिन्त by चौकटराजा
रादर हे तुम्ही कसे मिळवलेत
In reply to हे कोणते दगड आहेत? by यशोधरा
काय म्हणता ...?
In reply to रादर हे तुम्ही कसे मिळवलेत by यशोधरा
ओह! काय पचका झाला माझा! =))
In reply to काय म्हणता ...? by चौकटराजा
=))
In reply to ओह! काय पचका झाला माझा! =)) by यशोधरा
भिंत
In reply to ही भिन्त by चौकटराजा
आमचीही एक भिंत !
In reply to भिंत by कंजूस
मस्त,,
In reply to आमचीही एक भिंत ! by बोका
छान सुरुवात.
फार सुरेख भिंती. सिंधुदुर्ग
ओर्छा