मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक १.......

चौकटराजा · · भटकंती
. गेले वर्षी मांडू-इन्दोर-उजैन- महेश्वर अशी सहल करून झाल्यानंतर घरातील सर्वानी आणखी एक सहल हवी असा आग्रह धरला. आपल्याला काय भटकायची जाम आवड. म्हटले चला यावेळी राजस्थान एम पी त घुसू या. तीन महिने अगोदर ट्रेन बुकिंग केले. हॉटेले परवडतील व स्टेशन पासून फार लांब नसतील अशी निवडून त्यांचेही ऑन लाईन बुकिंग केले व बिन्धास्त झालो. यावेळी जयपूर - झांशी- ओर्छा -ग्वलिअर ही स्थाने निवडली होती. माझ्या स्नेही वासंती घैसास यानी फार पूर्वी ओर्छा या भारतीय टूर ऑपरेटर्स कडून दुर्लक्षित जागी भेट देण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार मी जायचे पक्के ठरविले होते. पूर्वी माउंट अबू येथील हॉटेल कर्मचार्‍याने जयपूर पहा असे सुचविले होते सबब जयपूरचा ही समावेश झाला.मला राजेरजवाडयांच्या इतिहासात फारसा रस नाही त्यामुळे त्यांच्या आख्यायिका वगैरे सांगणारा गाईड नावाचा प्राणी मी माझ्यापासून लांबच ठेवत असतो. दुसरे असे की गाईड बोलायला लागला की आपले लक्ष मूळ कलाकृतीवरून विचलित होते असा माझा अनुभव आहे. तिसरे असे की हा प्राणी गाईड च्या धंद्यातून फारसे पैसे न मिळवता प्रवाशास मी एम्पोरियम मधे कसा सोडीन याचा विचार जास्त करतो. सबब आपणच काही माहिती गोळा करावयाची व आस्वाद घेत भटकायचे असा माझा प्लान असतो. आता या सहलीकडे वळण्यापूर्वी एका महत्वाच्या आस्वादक अभ्यासाकडे आपण जरा पाहू या. आपणास सर्वाना माहीत आहे की राजस्थान , मध्य भारत कर्नाटक व आंध्र हे तेथील निरनिराळ्या दगडांसाठी प्रसिद्ध आहेत. ग्रानाईट साठी दक्षिण भारत तर संगमरवर,धोलपूर सॅन्डस्टोन साठी राजस्थान व मध्य भारत हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र हा मुख्यता: बेसाल्ट या अग्निजन्य दगडासाठी माहित आहे. तरीही अजंता एलोरा येथील गुफात काही प्रमाणात सॅन्डस्टोन आहे पण त्यातील शेडस राजस्थान सारख्या आकर्षक नाहीत.आपल्याकडे बाहेरून सॅन्ड्स्टोन आणून बंगल्याला बाहेरून श्रीमंती आणण्याची फॅशन पुण्यात दिसते.लाईमस्टोन हा असाच एक प्रकार आहे पण तो सॅन्डस्टोन पेक्षा जरा नरम असतो. सॅन्ड्स्टोन या प्रकारात असंख्य रंग व छटा येतात सबब सार्वजनिक इमारतीत ही हा वापरला जातो. उदा. सी एस टी ची इमारत बी एम सी ची इमारत. इजिप्त मधील अबु सिम्बेल ,जॉर्डन मधील पेट्रा ही सॅन्ड्स्टोन ची ठळक उदाहरणे आहेत. राजस्तानात संडासापासून प्रासादा पर्यत या दगडाचे प्राबल्य आपल्याला दिसून येते. यात सिलिकॉन डाय ऑक्साईड प्रंमाणे मायका चे ही काही प्रमाण असते. याचा प्रत्यय काही चमचम करणारे दगड आपल्या पायाखाली राजस्थान मधे आपल्याला पाहायला मिळतात. जयपूर येथील बिर्ला मंदिर , जवाहर सर्कल, वर्ल्ड ट्रेड पार्क, अल्बर्ट हॉल संग्रहालय,हवामहल,सिटी पॅलेस , जंतर मंतर, आमेर किला, जयगड किला, नाहरगड किला, गालताजी . ओर्छा येथील, जहांगीर महल, राजा महल, रामराज मदिर, चतुर्भूज मंदिर, लक्ष्मी मंदिर , व छत्री समाध्या. ग्वालियर येथील मानसिंह पॅलेस, गुजरी महल, सास बहू मंदिर.,तेली का मन्दिर व जयविलास पॅलेस ई ना आपण भेटी देणार आहोत. या पहिल्या भागात एवढेच.. जाता जाता -- खाली माझे घरील वॉलपेपर त्या खाली -- जयपूर जयगड येथील त्याचा नैसर्गिक अविष्कार-- . .

वाचन 30172 प्रतिक्रिया 0