गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश
तर साहित्य खालील प्रमाणे.
१. बासमती तांदूळ – १ वाटी २. बेसन – १ वाटी ३. तेल – ४ टेबलस्पुन ४. दही – २ टेबलस्पुन ५. हळद – १/२ टी-स्पुन ६. तिखट – २ टी-स्पुन ७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता ८. लवंग – ३-४ ९. काळीमिरी- ३-४ १०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता) ११. तमालपत्र- १ १२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची) १३. मीठ – चवीनुसार.
प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.
आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.
आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.
दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.
In reply to फोटो कुणी अपलोड केले आहेत..? by मोदक
In reply to बाप्पू तोंडाले पानी सुटलं ना by महासंग्राम
In reply to कवा बी या न देवा. तुमचेच आहे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एकदा उदयपूरला गट्टेची चवदार by अप्पा जोगळेकर
In reply to अगं आय गं! by आदूबाळ
In reply to वाह!!!! :) by कैलासवासी सोन्याबापु
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
In reply to भारी दिसतोय हा प्रकार by नाखु
In reply to काँपी पेस्ट वाटते हे लिखाण by Ram ram
In reply to स्थानिक गरज by रमेश आठवले
In reply to केंगरी नव्हे आठवले सर ती by कैलासवासी सोन्याबापु
In reply to केरच्या बिया या पौष्टिक by रेवती
In reply to वा.. मस्त. फोटो छान आलेत. by रुपी
In reply to :) by रेवती
In reply to सुरेख प्रेझेन्टेशन ! भाताचे by सस्नेह
In reply to बाप्पू कधी बोलवतोय मग by पिंगू
In reply to काल रात्री गट्टे के चावल करून by गणामास्तर
In reply to आहा ! by अनिंद्य
In reply to केले हो सोन्याबापू गट्टे के by मितान
In reply to ताई नई हो ती अजून ! बारकी आहे by कैलासवासी सोन्याबापु
ताई नई हो ती अजूनआडून बापूनी मी म्हातारा झालो नाही हे सुचवले आहे. ;)
In reply to बघा बघाताई नई हो ती अजून by महासंग्राम
हे वाक्य सिद्ध केल्याबद्दल मंदारभाऊ ह्यांचे अभिनंदन अन त्यांचा जंगी सत्कार धिंग्रा चौकात आयोजित करायचा मानस ह्या प्रसंगी व्यक्त करतो =)) =)) बाकी, तुम्ही पोलीस खात्यात आहात का हो ? =))अकोल्याचे पोट्टेपाट्टे कुटी न्याच्या लायकीचे नोय
फोटो कुणी अपलोड केले आहेत..?