सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे
डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख कोणत्याही विशिष्ट भांड्याची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.
तर मुद्दा असा की वरकरणी डॉ जुलाबचंद एनिमावालांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि खादाडपणा वरुन स्त्री-पुरुषात वाद दिसले तरी ते जिव्हेची अतृप्ती आणि आतड्याचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून ते निर्माण होतात. याचा अर्थ जिव्हेला तृप्त करुन कोणीही पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना जिव्हातृप्त स्त्री-पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ अजिबात साधता आले नाहीत तरी सहज रेचन साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
वाचने
6694
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अगागा भोंदू गुरुचा बाजार
In reply to अगागा भोंदू गुरुचा बाजार by भालचंद्र_पराडकर
भ्रामक आणि भंपक महागुरुचा,
तात्कालीन मौजमजेचा धागा
In reply to तात्कालीन मौजमजेचा धागा by चित्रगुप्त
नको सरजी!
In reply to तात्कालीन मौजमजेचा धागा by चित्रगुप्त
नको सरजी!
"ओह द कोलोन" ही एका सेंटची
चित्रगुप्तकाका _/\_
जबरी!
बस्ती म्हंटलं की ....
भारी
ओ एक राहिलंच की ...
मजा आली नाही ?
पुरुषाच्या हृदयाचा मार्ग