मला गरज आहे तुझी
लेखनविषय:
काव्यरस
गरज आहे मला आज
त्या तुझ्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या तुझ्या हातांची
गरज आहे मला
तुझ्या त्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वत:ला सामावून
टाकणार्या त्या बाहूंची
गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या
त्या तुझ्या स्पर्शाची
गरज आहे आजही मला
माझ्यावरच्या त्या तुझ्या
नि:स्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटतांना
तू जवळ आहेस या जाणिवेची
गरज आहे मला
खूप गरज आहे....
वाचने
4961
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
अप्रतिम कविता!
In reply to अप्रतिम कविता! by एस
प्लस वन!
धन्यवाद
अय्या , कित्ती छान !!
अप्रतिम
भावार्त कविता !
.
धन्यवाद
वा ! काळजात घुसणारी कविता....
छान... आवडली
मनापासुन धन्यवाद
छान
अप्रतिम कविता. अजून येऊद्या.
धन्यवाद :)