मला गरज आहे तुझी
लेखनविषय:
काव्यरस
गरज आहे मला आज
त्या तुझ्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या तुझ्या हातांची
गरज आहे मला
तुझ्या त्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वत:ला सामावून
टाकणार्या त्या बाहूंची
गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या
त्या तुझ्या स्पर्शाची
गरज आहे आजही मला
माझ्यावरच्या त्या तुझ्या
नि:स्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटतांना
तू जवळ आहेस या जाणिवेची
गरज आहे मला
खूप गरज आहे....
वाचन
4961
प्रतिक्रिया
0