पातळ पोह्यांचा चिवडा
साहित्य:
पातळ पोहे १/२ किलो
शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे)
पंढरपुरी डाळ :एक वाटी
खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे)
काजु पाकळ्या :आवडीनुसार
कढिपत्ता :एक वाटी
मिरचीचे तुकडे :चविनुसार
तिळ :चार चमचे
मीठ, पिठीसाखर
फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
कृती:
पातळ पोह्यांचा चिवडा तसा सोपा पण बरेचदा करताना पोहे आकसतात आणि चिवड्याच रुप बिघडत.यासाठी पातळ पोहे
शक्यतो चाळून,उन्हात ठेऊन कुरकुरीत करुन घ्यावे. आता घरात उन्हाचाच पत्ता नसेल तर सरळ कढईत मंद आचेवर थोडे
थोडे पोहे घेऊन परतत रहावेत.आच जराही मोठी करु नये.
आता पोहे एकसारखे चुरचुरित झाले कि एका पसरट भांड्यात काढावेत.कढईत तेल गरम करुन आता एक एक.
पदार्थ तळून घ्यावा.सुरवातीला तेल बेताच तापलेल असताना काजु तळून घ्यावेत.नंतर खोबरे, दाणे,डाळ,कढिपत्ता तळावे.हे तळलेले जिन्नस चुरचुरित केलेल्या पोह्यांवर घालावेत.
त्यावर मीठ व पिठीसाखर घालून एकत्र करुन घ्यावे.
आता कढइत तेल तापवून फोडणी करावी.मोहरी,जिरे,हिंग,मिरची तुकडे घालून फोडणी होत आली कि शेवटी तिळ, हळद घालावे म्हणजे करपत नाहि.चिवड्याचा रंग छान रहातो.
या फोडणीत पोहे घालून छान परतावेत.मला यात चुरमुरे घातलेले आवडतात.तर तेही कुरकुरीत करुन घातलेत.(चुरमुरे अतिरिक्त तेलहि शोषून घेतात.
खमंग चिवडा तयार!!

वाचन
12258
प्रतिक्रिया
26
मला पातळ पोह्याच्या चिवड्यात
In reply to मला पातळ पोह्याच्या चिवड्यात by मृत्युन्जय
हेच
झक्कास, आणि मी पयली ;)
नेहमीप्रमाणे मस्त दिसतय.
अगदी पर्फेक्ट पाकृ !
मस्त -चिवडाभक्त प्रणव
शेवटचा फोटू खासच...
मस्त!!!!!!!!!! तोंपासु :)
मस्तं!
भारी !
Mastach g
हा सतत चालूच असतो आमच्याकडे.
एकदम भारी !
या चिवड्यासाठी कायपण! फोटू व
फोटो पाहताच खाण्याची इच्छा
In reply to फोटो पाहताच खाण्याची इच्छा by विवेकपटाईत
धन्यवाद!
चिवडा हा अत्यंत आवडीचा प्रकार
In reply to चिवडा हा अत्यंत आवडीचा प्रकार by मोदक
हो छान लागते.त्यात अजुन चिवडा
आईने फराळाचे कुरियर केलेल
लाळ गाळली. पण उद्याच घरी
वा! मस्तच दिसत आहे चिवडा!
वाह खमंग दिसतोय चिवडा. :)
कसला खमंग दिसतोय चिवडा. मुठीत
खमंग दिसतोय चिवडा!
मला ही पापोचि मध्ये चुरमुरे आवडत नाहीत
मी आज करणारे!