मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पातळ पोह्यांचा चिवडा

इशा१२३ · · पाककृती
साहित्य: पातळ पोहे १/२ किलो शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे) पंढरपुरी डाळ :एक वाटी खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे) काजु पाकळ्या :आवडीनुसार कढिपत्ता :एक वाटी मिरचीचे तुकडे :चविनुसार तिळ :चार चमचे मीठ, पिठीसाखर फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद Sahity कृती: पातळ पोह्यांचा चिवडा तसा सोपा पण बरेचदा करताना पोहे आकसतात आणि चिवड्याच रुप बिघडत.यासाठी पातळ पोहे शक्यतो चाळून,उन्हात ठेऊन कुरकुरीत करुन घ्यावे. आता घरात उन्हाचाच पत्ता नसेल तर सरळ कढईत मंद आचेवर थोडे थोडे पोहे घेऊन परतत रहावेत.आच जराही मोठी करु नये. आता पोहे एकसारखे चुरचुरित झाले कि एका पसरट भांड्यात काढावेत.कढईत तेल गरम करुन आता एक एक. पदार्थ तळून घ्यावा.सुरवातीला तेल बेताच तापलेल असताना काजु तळून घ्यावेत.नंतर खोबरे, दाणे,डाळ,कढिपत्ता तळावे.हे तळलेले जिन्नस चुरचुरित केलेल्या पोह्यांवर घालावेत. स त्यावर मीठ व पिठीसाखर घालून एकत्र करुन घ्यावे. आता कढइत तेल तापवून फोडणी करावी.मोहरी,जिरे,हिंग,मिरची तुकडे घालून फोडणी होत आली कि शेवटी तिळ, हळद घालावे म्हणजे करपत नाहि.चिवड्याचा रंग छान रहातो. या फोडणीत पोहे घालून छान परतावेत.मला यात चुरमुरे घातलेले आवडतात.तर तेही कुरकुरीत करुन घातलेत.(चुरमुरे अतिरिक्त तेलहि शोषून घेतात. चिवडा खमंग चिवडा तयार!!

वाचन 12258 प्रतिक्रिया 26