देगा देवा....
लेखनविषय:
काव्यरस
देगा देवा एकच दान
मना लागे समाधान
होऊ नये उंच एवढा
इतर वाटती लहान !!१!!
देगा देवा एवढे बळ,
सोसण्या आयुष्यातली झळ,
जगणे कर एवढे सुंदर,
मरण तर आहे अटळ !!२!!
देगा देवा दया- माया,
व्हावे मी एखाद्याची छाया,
झालो आधार न कोणाचा,
तर व्यर्थची गेली ही काया !!३!!
देगा देवा एवढे ज्ञान,
असे भल्या-बुऱ्याची जाण,
अहंकार न अंगी यावे,
असावे मज सदैव भान !!४!!
देगा देवा सदाचार,
उजळत जावे माझे विचार,
अंतरीतला राम विजयी व्हावा
रावणाचे करून संहार !!५!
वाचने
2489
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सुंदर ! आवडली!
_/\_ रातराणी
हेचि दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा.... वा वा.....
आवडली कविता
खूप खूप धन्यवाद
सहजसुंदर रचना. आवडली.
सहजसुंदर रचना --> _/\_ धन्यवाद
छान कविता . "देगा देवा " हे शब्द वाचुन "हेचि दान देगा देवा .. तुझा विसर न व्हावा" , "लहानपण देगा देवा ... मुंगी साखरेचा रवा " , " चल खेवा रे खेवा रे नैया खेवा , मछली है सागर का मेवा , औरभी देगा देवा देवा ..मेवा देवा" अशा इतर रचना आठवल्या .
:))))))) बरोबर ... खरा तर ही प्रार्थना आहे असा म्हणीन मी...आणि "लहानपण देगा देवा" यावरूनच काहीशी सुचली....
अजून एक गोष्ट या प्रार्थनेला "अवचित परिमळू" या अभंगाची चाल खूप छान बसते !!
संपूर्ण रचना मस्तच
देगा देवा दया- माया, व्हावे मी एखाद्याची छाया, झालो आधार न कोणाचा, तर व्यर्थची गेली ही काया !!३!!याकरता नतमस्तक.... "गुण तो था कोई अवगुण मेरे भुला देना "च्या अगदी जवळचे आहे
In reply to संपूर्ण रचना मस्तच by नाखु
@नाखु
खूप खूप धन्यवाद... सर्वांना आवडली हि प्रार्थना याचा आनंद झाला !!
छानच ! आशावादी.....
सुंदर ! आवडली!