मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देगा देवा....

कवि मानव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
देगा देवा एकच दान मना लागे समाधान होऊ नये उंच एवढा इतर वाटती लहान !!१!! देगा देवा एवढे बळ, सोसण्या आयुष्यातली झळ, जगणे कर एवढे सुंदर, मरण तर आहे अटळ !!२!! देगा देवा दया- माया, व्हावे मी एखाद्याची छाया, झालो आधार न कोणाचा, तर व्यर्थची गेली ही काया !!३!! देगा देवा एवढे ज्ञान, असे भल्या-बुऱ्याची जाण, अहंकार न अंगी यावे, असावे मज सदैव भान !!४!! देगा देवा सदाचार, उजळत जावे माझे विचार, अंतरीतला राम विजयी व्हावा रावणाचे करून संहार !!५!

वाचने 2487 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सिरुसेरि Wed, 10/12/2016 - 14:00
छान कविता . "देगा देवा " हे शब्द वाचुन "हेचि दान देगा देवा .. तुझा विसर न व्हावा" , "लहानपण देगा देवा ... मुंगी साखरेचा रवा " , " चल खेवा रे खेवा रे नैया खेवा , मछली है सागर का मेवा , औरभी देगा देवा देवा ..मेवा देवा" अशा इतर रचना आठवल्या .

कवि मानव Wed, 10/12/2016 - 14:18
:))))))) बरोबर ... खरा तर ही प्रार्थना आहे असा म्हणीन मी...आणि "लहानपण देगा देवा" यावरूनच काहीशी सुचली.... अजून एक गोष्ट या प्रार्थनेला "अवचित परिमळू" या अभंगाची चाल खूप छान बसते !!

नाखु Wed, 10/12/2016 - 16:25
संपूर्ण रचना मस्तच
देगा देवा दया- माया, व्हावे मी एखाद्याची छाया, झालो आधार न कोणाचा, तर व्यर्थची गेली ही काया !!३!!
याकरता नतमस्तक.... "गुण तो था कोई अवगुण मेरे भुला देना "च्या अगदी जवळचे आहे