वांग्याची घोटलेली भाजी

त्रिवेणी पाककृती
मागच्या आठवड्यात सांगलीला जाणे झाले.तर तिथली हिरवी वांगी घ्यायचीच होती.भिलवडीच्या बाजारात मिळाली वांगी. त्यापुर्वी मागच्या दोन तीन दा जावून ही वांगी दिसली नव्हती म्हणून ख फ वर विचारुन झाले होते वांगी कुठे मिळतील तेव्हा नेहमी प्रमाणे कंजुस काका मदतीला धावून आले. तर अशी सांगलीची वांगी आणि खान्देशी पध्दतीची ही भाजी. साहित्य- वांगी- एक किलो, हिरवी मिरची १० ते १५, लसुण- १० ते १५ पाकळ्या, तेल-अर्धी वाटी, जि,,मोहरी आणि कढिपत्ता, मीठ- चवीप्रमाण,, हळद, पाणी-अर्धा ग्लास. ृकती- वांगी शक्य तितकी बारीक चिरुन घ्यावीत. थोड्या जास्त तेलाची फोडणी करुन त्यात मोहरी,जिर चांगले तडतडू द्यावे मग कडिपत्ता हळद टाकावी.आणि लसून मिरचीचा खर्डा टाकावा. मिरची छान परतली गेली की वांग्याच्या फोडी टाकाव्या.पाच मिनिटांनी अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेऊन शिजू द्यावी. थोडयावेळाने वरण घोटायच्या रवीने चांगली घोटून घ्यावी.परत वांगी पुर्ण शिजून झाल्यावर मीठ टाकून अजुन घोटून घ्यावी. फोटो आपल्या गणपा दा, सानिका आणि के डी दा सारखे भारी नाही काढता येत तरी मंडळी गोड मानून घ्या. वांगी . . वांगी

36 टिप्पण्या 17,467 दृश्ये

Comments

सामान्य वाचक नवीन

शेवटी टाकलिस बै रेसिपी करून बघते Btw सांगली मिरज ला वांगी प्रत्येक भाजीवाला कडे असतात ग

कंजूस नवीन

मिरच्या एवढ्या पाहून ठसका लागतोय.या वांग्याची शेंगदाणे-तिळकुट टाकलेली घट्ट रस्सा भाजी करतात.एक काटेरी वांगी प्रकार कमी दिसतो.आजकाल गावच्या बाजारांतही शहरी भावानेच शेतमाल मिळतो( त्यांनाही फ्रिज टिव्ही कुठे स्वस्तात मिळतात?)

केडी नवीन

भाकरी बरोबर छान लागेल हि भाजी. मस्त! थोडीशी अरेबिक/इजिप्शियन बाबा गनुष ची आठवण करून देणारी (हे बाबा गनुष असेच घोटलेले/प्युरी केलेले असते).

पैसा नवीन

भरीतासाठी वांगे आधी भाजून मग त्याचा गर वापरतो. इथे पातेल्यात फोडणीवर गर घोटला आहे. मस्त लागत असणार. एक किलोला १५ मिरच्या? मी पाव किलो भाजीत एक मिरची घालते. =))

त्रिवेणी नवीन

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून खरच वाटायला लागलय की मी जास्त मिरची खाते का?? मी खुपदा प्रयत्न केला कमी तिखट खायचा पण मग जेवल्यासारखच वाटतच नै.खान्देशी लोकांची सवय आमची सुटता सुटत नै तिखट खायची आणि भाजीवर वरुन कच्च तेल खायची ही.

गणामास्तर नवीन

In reply to by त्रिवेणी

जास्त बिस्त काय नाय. .बरोबरंय प्रमाण मिरचीचे. वरून लाल तिखट आणि काळा मसाला घातला तरी चालतंय. तसेही भरीत किंवा हि अशी भाजी खाताना वरून कच्च तेल पाहिजेचं.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by त्रिवेणी

हे म्हणायचं खाणं! या बरोबर खुरासन्याची चटणी अाणि तेल हे पाहिजेच बरं का! किंवा मग झणझणीत आंबा लोणचं! श्रश्रश्रश्र

अजया नवीन

In reply to by त्रिवेणी

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून खरच वाटायला लागलय की मी जास्त मिरची खाते का??
हो हो ;) तिखटीची रेसिपी पण द्या हं.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

एक किलोला १५ मिरच्या आणि लसणीच्या १० ते १५ पाकळ्या ??? वाचूनच जीभा भाजली :) तरीही, जरा कमी तिखट टाकून खायला मस्त लागेल असे वाटते.

वेल्लाभट नवीन

लव्हली. खान्देशी भरीत करतो आम्ही घरी.. हे जरा वेगळं दिसतंय. त्यात पातीचा कांदा असतो.

स्वाती दिनेश नवीन

भाजी छान दिसतेय, तिखट बघून सगळ्यांसारखेच झाले. मिरच्यांचे प्रमाण एक चतुर्थांश करून भाजी केली जाईल. स्वाती

अनन्न्या नवीन

पण मला वांगं आवडत नाही त्यामुळे माझ्या तावडीतून ते वाचलेय.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by अनन्न्या

अगदी अगदी!! मलाही वांग आवडत नाही. पण इथे असे गार वारे सुटलेत की असं झणझणीत वांग करुन पहावं का असे फितुर विचार मनात येत आहेत! १५ मिरच्या घालुन शक्य नाही बै त्रि.. पण प्रयत्न करुन बघेन..

पिंगू नवीन

लय भारी. यात टोमॅटो टाकला, तर भाजी थोडी का होईना सुसह्य होईल. (निदान माझ्यासारख्यांसाठी तरी) मॅशर वापरला तर आणखीन चांगली घोटता येईल..

कैलासवासी सोन्याबापु नवीन

ही भाजी एक प्रचंड मोठा वीकपॉईंट आहे, सदर भाजी ती ही चुलीवर शिजवलेली ती ही डीसेंबरच्या थंडीत, अहा हा हा हा हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु, त्यात ही जर जेवण चुली पुढे बसुनच होणार असले तर डब्बल हमीअस्तु!, अश्याच एका हमीअस्तु प्रसंगी म्हातारीच्या हातची असली भाजी, १२ कळण्या भाकरी अन दोन लोटे ताक (मठ्ठा) उडवल्याची एक बालसुलभ आठवण जागृत झाली, आता वांगी शोधणे आले म्हणे मी

पूर्वाविवेक नवीन

खमंग दिसतेय. याची दुसरीही व्हर्जन्स आहेत का? मी याआधी हि भाजी जळगावच्या शेजाऱ्यांकडे खाल्ली होती. पण ती पावभाजीप्रमाणे पातळ होती. मेबी त्यात बटाटा व टोमॅटो पण असावा.

सुखीमाणूस नवीन

मस्त पाकक्रूती इतक तिखट खाल्ल तर सकाळी आगीचा बन्ब बोलवावा लागेल त्रिवेणी म्हणूनच तुमच्या साबा तुमच्या हातच खात नसणार.ह घ्या.(ref ममो धागा १)

त्रिवेणी नवीन

In reply to by सुखीमाणूस

नाय हो नाय मनावर घेत. त्या उच्चवर्णिय आहेत न म्हणून त्यांना नाय चालत माझ्याहातच.म्हणून तर मोर्चे करावे लागतात न आम्हाला.