वांग्याची घोटलेली भाजी
मागच्या आठवड्यात सांगलीला जाणे झाले.तर तिथली हिरवी वांगी घ्यायचीच होती.भिलवडीच्या बाजारात मिळाली वांगी. त्यापुर्वी मागच्या दोन तीन दा जावून ही वांगी दिसली नव्हती म्हणून ख फ वर विचारुन झाले होते वांगी कुठे मिळतील तेव्हा नेहमी प्रमाणे कंजुस काका मदतीला धावून आले.
तर अशी सांगलीची वांगी आणि खान्देशी पध्दतीची ही भाजी.
साहित्य-
वांगी- एक किलो,
हिरवी मिरची १० ते १५,
लसुण- १० ते १५ पाकळ्या,
तेल-अर्धी वाटी,
जि,,मोहरी आणि कढिपत्ता,
मीठ- चवीप्रमाण,,
हळद,
पाणी-अर्धा ग्लास.
ृकती-
वांगी शक्य तितकी बारीक चिरुन घ्यावीत.
थोड्या जास्त तेलाची फोडणी करुन त्यात मोहरी,जिर चांगले तडतडू द्यावे मग कडिपत्ता हळद टाकावी.आणि लसून मिरचीचा खर्डा टाकावा.
मिरची छान परतली गेली की वांग्याच्या फोडी टाकाव्या.पाच मिनिटांनी अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेऊन शिजू द्यावी.
थोडयावेळाने वरण घोटायच्या रवीने चांगली घोटून घ्यावी.परत वांगी पुर्ण शिजून झाल्यावर मीठ टाकून अजुन घोटून घ्यावी.
फोटो आपल्या गणपा दा, सानिका आणि के डी दा सारखे भारी नाही काढता येत तरी मंडळी गोड मानून घ्या.
.
.

.
.

वाचन
17465
प्रतिक्रिया
0