माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !!
तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील . म्हणजे साधारण एखाद्या कोकणस्थ माणसाकडील न्याहारी , सकाळचे जेवण , दुपारचे भूकलाडू आणि रात्रीचे जेवण एवढ सगळं मिळून होणार नाही इतका मेनू तर एका जेवणात होता . (सकाळचे जेवण दुपारी ३ ला होते हे सांगायला नकोच) असो , विषय परत लायनीवर आणतो. तर पुरणपोळी , खीर , श्रीखंड असा भरगच्च गोडाचा मेनू होता. आणि माझा झाला होता देवानंद . मला काही गोड घशाखाली उतरत नव्हतं . त्यामुळे मी आपलं या मांडीवरून त्या मांडीवर असं करत केव्हा एकदा सगळे आवरतं घेतायत या विचारात होतो ...
आणि हाच तो जालीम क्षण , जेव्हा माझ्या समोर ती बला आली. माझ्या बाजूलाच बसलेले एक आजोबा मला म्हणाले “कारे ? घे की एक पुरणपोळी आणखी !!”. हो-नको करता करता माझ्या ताटात पुरणपोळी वाढली गेलीच. मी कुरकुरत मला आवडत नाही वगैरे पुटपुटत होतो. तेवढ्यात ते आजोबा म्हणाले , “कसे रे तुम्ही आजकालचे जवान ? इतक्यात गुंडाळला गाशा ? घे घे एक पोळी घे मी सांगतो तुला कसं खायचं !!”
असं म्हणून त्यांनी मोर्चा स्वयपाकघराकडे वळवला आणि “सुनबाई sssssss जरा तूप पिठीसाखर लिंबू वेलदोडा पूड आण गं !!” असा आदेश सोडला . झाssssलं ….. ईकडे माझा देवानंद सोडून आता "राजेंद्रकुमार कम भारतकुमार" झाला होता . मला वाटलं आता आजोबा पुरण-गिरण कसं करतात प्रात्यक्षिका सकट सांगतात का काय ?
पण नाही ... म्हातारा तितका पण वाईट नव्हता. त्यांनी माझ्या ताटात एक गरमागरम पुरणपोळी वाढायला लावली , त्यावर लोणकढया तुपाची धार धरली अन मला ते नीट पसरवून घ्यायला लावलं ... अन मग इथे खरी “रेशिपी” सुरु झाली ... त्या पसरलेल्या तुपावर साधारण २-३ चमचे पिठीसाखरेचा थर घालण्यात आला , मग परत थोडं तुप त्यावरून लावून ... सरप्राईज एलिमेंट “लिंबू” मागवण्यात आला ... !! आजोबा म्हणाले “पीळ बाळा हे पोळीवर !! “ ( माझा चेहरा तेव्हा साधारणत: “सर मी ?" हे विचारणार्या मुलाचा होतो तसा झालेला .) मी आवंढा गिळून ते पिळल . मग बारी आली वेलदोडापुडीची , ती भुरभुरली त्यावर ... आणि केला पोळीचा रोल .... अन मग आजोबांच्या या "बाप्तिस्मा" प्रमाणे मान खाली घालून ( अन डोळे मिटून) मी तो घास घेतला .
आणि महाराजा sssssss ….. काय सांगू ? तो ज्या क्षणी तोंडात घोळला .... आहाहाहाहा , (Background la ते कॅथेड्रल मध्ये वाजतं न ते गोस्पेल का काय ते ... हां तेच ) काय तो क्षण ... वावावा ... (मनोमन मी त्या आजोबांना दिलेल्या शिव्या मागे घेतल्या आणि त्यांना अडिशनल १०० वर्षे ग्रांट केली. )
म्हणजे ऐश्वर्या ने अभिषेकला "हो" म्हणलं असेल तेव्हा ... जसा आनंद अभ्या ला झाला असेल ना ... तोच आनंद (कम आश्चर्य ) मी अनुभवत होतो . हीच होती माझी पहिली (शब्दश:) तोंडओळख त्या “त्रिपुर-सुंदरी”शी .
एकीकडे पुरणाची चव जिभेवर घोळतेय ... एकीकडे लिंबू आणि पिठीसाखारेचा साल्सा नाकपुड्या आणि जीभ गाजवून सोडतोय , Backdrop ला लोणकढी तुपाचा धीरोदात्त सुगंध रुंजी घालतोय ... निस्ता धिंगाणा भाऊ ... अन यात वेलदोडा म्हणजे मल्टी-ष्टरार मूवी मध्ये अचानक अपेक्षा नसताना एखादा राजपाल यादव भाव खावून जातो तसा फ्रेश अपीयरंस !!
खरय ... त्रिपुरं व्यापून उरेल असं स्वर्गसुख तुम्हाला रोज नै मिळत महाराजा .... !! बघा तुम्हाला पण भेटतेय का ही "त्रिपुर-सुंदरी" कधी !!
-
ज्याक ऑफ आल ... ( कारण व्होल वावर ईज आवर )
ता.क. : देवानंद होणे – देवानंद ने जन्मभर एक से एक खुबसुरत नट्यांबरोबर काम केले पण लग्न मात्र त्यातील एकीशीही केलं नाही .
ईथे : ताटात अत्यंत छान पदार्थ असून सुद्धा मी ते खात नव्हतो ... पदार्थांच्या बाबतीत माझा “देवानंद झाला होता .”
वाचने
27351
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन
करून पाहू लवकरच .... कुंदा ..
In reply to कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन by जेपी
भाऊ,
In reply to करून पाहू लवकरच .... कुंदा .. by ज्याक ऑफ ऑल
अच्छा ...
In reply to भाऊ, by जेपी
नै ओ कुंदा खरतर बेळगावचा फेमस
In reply to अच्छा ... by ज्याक ऑफ ऑल
पुरणपोळी वाह वाचून तो.पा.सु.
मस्त लिहिलेय!
धन्यवाद !!
In reply to मस्त लिहिलेय! by यशोधरा
:) मस्त.
धन्यवाद !!
In reply to :) मस्त. by पद्मावति
हेच म्हणतो...
धन्यवाद !!
In reply to हेच म्हणतो... by भटक्य आणि उनाड
हाय
पुपो आवडत नाही पण तुमचा लेख
अग काय हे
In reply to पुपो आवडत नाही पण तुमचा लेख by अजया
:(
In reply to अग काय हे by सामान्य वाचक
अरेरेरे..!
In reply to :( by अजया
वा!! असा प्रकार करून कधी पुरण
+१
In reply to वा!! असा प्रकार करून कधी पुरण by संजय पाटिल
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाहीकाय भन्नाट वर्णन आहे! खाऊन पाहिलीच पाहिजे अशी त्रिपुरसुंदरी एकदा.खुसखुशीत!
वा मस्तच !
आंबट सार
In reply to वा मस्तच ! by पगला गजोधर
भारी!
वा वा
असं असतं तर ते सगळं!
तुम्ही खा किलोभर साबुदाणा
In reply to असं असतं तर ते सगळं! by अत्रुप्त आत्मा
लेख आवडला
केवळ वर्णनामुळे खाईल
छान लिहिलंय.
पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स
माझा एक भाउ, आमरस आणि भात
In reply to पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स by रेवती
गजोधर, आमरस आणि कुरडइ
In reply to माझा एक भाउ, आमरस आणि भात by पगला गजोधर
शिर्याबरोबर आंब्याचे लिम्बाचे
In reply to गजोधर, आमरस आणि कुरडइ by पद्मावति
आंब्याचेलिम्बाचे लोणचे १+आणि हो, पापडावरून एक आठवले,
In reply to गजोधर, आमरस आणि कुरडइ by पद्मावति
येस्स्स्स्स!!!
In reply to आणि हो, पापडावरून एक आठवले, by पगला गजोधर
उडदाचा भाजलेला पापड फोडणीच्या पोळीबरोबर मस्त लागतो.
In reply to येस्स्स्स्स!!! by पद्मावति
बोकाजी
In reply to उडदाचा भाजलेला पापड फोडणीच्या पोळीबरोबर मस्त लागतो. by बोका-ए-आझम
अहो भाया, वरण भाताबरोबर पापड,
In reply to आणि हो, पापडावरून एक आठवले, by पगला गजोधर
वरण भाताबरोबर पापड, काकडीची
In reply to अहो भाया, वरण भाताबरोबर पापड, by रेवती
चवदार धागा... :)
अशी एक पुरणपोळी खायची
कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या
In reply to अशी एक पुरणपोळी खायची by बोका-ए-आझम
+११ गुळवणी हा
In reply to कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या by गणामास्तर
वाह!!!
लेखन आवडले...
काहीही हं मुवि!
In reply to लेखन आवडले... by मुक्त विहारि
पुरणपोळी आणि खीमा यावर '
In reply to काहीही हं मुवि! by बोका-ए-आझम
अगदी अगदी
In reply to पुरणपोळी आणि खीमा यावर ' by पद्मावति
पाचुंदा
In reply to अगदी अगदी by सामान्य वाचक
पुरणपोळी आणि खीमा
In reply to पुरणपोळी आणि खीमा यावर ' by पद्मावति
आम्ही तेलपोळीवाले
In reply to पुरणपोळी आणि खीमा यावर ' by पद्मावति
आम्ही पण!
In reply to आम्ही तेलपोळीवाले by बोका-ए-आझम
बाकी पुपो खावी ती आमच्या सौ
In reply to लेखन आवडले... by मुक्त विहारि
तळलेली??? पहिल्यांदाच ऐकतेय.
In reply to लेखन आवडले... by मुक्त विहारि
पंचामृत आणि कटाची आमटी (डाळ
पुपो ताकात बुडवून खाल्लीय का
Yuck!
In reply to पुपो ताकात बुडवून खाल्लीय का by यशोधरा
अरेरे ;)
In reply to Yuck! by बोका-ए-आझम
ए, ह्या, असलं काही नसतं. उगा,
In reply to अरेरे ;) by यशोधरा
असतं, असतं, असतंच मुळी.
In reply to ए, ह्या, असलं काही नसतं. उगा, by रेवती
पुपो ताकात बुडवून खाल्लीय का कोणी?
In reply to असतं, असतं, असतंच मुळी. by यशोधरा
पुपो वीक पोइंट आहे. आता ही
धन्यवाद .... मंडळ आभारी हे ...
अच्छा !
या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ
जरूर ... का नाही ??
In reply to या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ by सतिश गावडे
च्यायला ह्या नावाचे एक
हांना....मला पण वाटलेलं त्या
In reply to च्यायला ह्या नावाचे एक by अभ्या..
छान लेख
देशस्थी जेवणावळी खरच मजा
ताटभर जिलब्या...
In reply to देशस्थी जेवणावळी खरच मजा by ज्योति अळवणी
लै भारी
भारी हो दादा
सुंदर लिखाण मात्र अशी
लेख आवडला !
कसला धमाल लेख लिहिलाय!! मी
बेस्टच!
छान
आईशप्पत
उजव्या हाताने तूप वाढलेली
वाचून वजन वाढले