तुला पिताना पाहिलं की.......
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की.......
तुला पिताना पाहिलं
की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते
आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई
दुथडी भरुन वाहू लागते
तुला पिताना पाहिलं
की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो
चखण्याची चाहूल लागण्या आधीच
चमचा काटा फुलवून नाचतो
तुला पिताना पाहिलं
की त्या बर्फालाही पाझर फुटतो
सोडा तर चोहिकडे
सप्तरंग उधळीत फिरतो
तुला पिताना पाहिलं
की टेबल हसू लागतात
सर्व खुर्च्या जणू
तुझ्यासाठीच गाणे गातात
तुला पिताना पाहिलं
की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो
आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात
चिंब होऊन भिजून जातोस.
वाचने
2849
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
ह ल क ट
ह ल क ट
=)) जबरा ! जबरा ! अती जबरा ! *******लै भारी रे !!
In reply to लै भारी रे !! by अनिल हटेला
क्या बात है !
मस्तच
तुला
अप्रतीम
श्री खेचर
सही रे प रा ...
विडंबन