आपण बर्याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला.
शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु".
मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे.
गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती.
गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते.
इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल.
बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच:
मी: लायट केवा पासुन नाय आसा?
काका: पैल्या पासुनच नाय आसा.
मी : म्हणजे?
काका: तरी ६० - ७० वर्षा झाली.
मी: तुमी अर्ज करुक नाय काय?
काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता.
काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले.
ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता,
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?
टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.
वाचने
49117
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत
बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत
३७० घरे अजुनही विजेशीवाय आहेत
In reply to बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वाडी/वस्तीचा नेमका पत्ता
In reply to बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आरोस बाग
In reply to वाडी/वस्तीचा नेमका पत्ता by सस्नेह
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित
In reply to आरोस बाग by रघुनाथ.केरकर
दोन प्रतिसाद एकाच वेळी
In reply to पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित by सस्नेह
मिपाकर धर्म म्हणतात तो हाच
In reply to दोन प्रतिसाद एकाच वेळी by नाखु
मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी..+१०० ब्राव्हो स्न्हेहांकितातै !+१०१ असेच म्हणतो.
In reply to मिपाकर धर्म म्हणतात तो हाच by डॉ सुहास म्हात्रे
याला म्हणतात कामाचा उरक.
In reply to पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित by सस्नेह
कैच्या कै... =))
In reply to याला म्हणतात कामाचा उरक. by अर्धवटराव
:)
In reply to कैच्या कै... =)) by सस्नेह
याला आमचे कचकून अनुमोदन..
In reply to याला म्हणतात कामाचा उरक. by अर्धवटराव
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित
In reply to पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित by सस्नेह
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित
In reply to पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित by सस्नेह
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.तुम्ही पण..?? तुम्ही पण..????छान लिहिलंत!
उपोषण ला बसले होते
In reply to छान लिहिलंत! by पैसा
पण खरं सांगू का? मला तुमचं हे
In reply to उपोषण ला बसले होते by रघुनाथ.केरकर
एक दोन दीवसच
In reply to पण खरं सांगू का? मला तुमचं हे by एस
तंबाखू सिगारेट व्यसनाच्या
In reply to पण खरं सांगू का? मला तुमचं हे by एस
छान लिहिलंय.
ई उपवासाबद्द्ल अभिनंदन !
अरे वा मुटके साहेब, हि चांगली
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
+1
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
कुठे कुठे आहेत तुमची
In reply to +1 by कपिलमुनी
यादी
In reply to कुठे कुठे आहेत तुमची by मोदक
पत्ते गोळा करून
In reply to यादी by कपिलमुनी
हल्ली मिपावर पत्ते मागण्याची
In reply to यादी by कपिलमुनी
धर्मराज, चांगली संकल्पना.
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
धन्यवाद
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
बॅटरीच्या रिकरिंग
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
उत्तम प्रकल्प !
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
आपल्या प्रयोगासाठी शुभेच्छा
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
उत्तम प्रकल्प
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
स्तुत्य कल्पना
In reply to ई उपवासाबद्द्ल अभिनंदन ! by धर्मराजमुटके
स्वातंत्र्याच्या ६९
चांगला लेख
+१०००
In reply to चांगला लेख by बहुगुणी
बांद्याक वांदो आसा ? आवशीक खाव व्हरान.....
लायट इली आसा पण
In reply to बांद्याक वांदो आसा ? आवशीक खाव व्हरान..... by माम्लेदारचा पन्खा
रिमांडर
In reply to लायट इली आसा पण by रघुनाथ.केरकर
व्यनी केला आहे.
In reply to रिमांडर by प्रसाद_१९८२
पहिलाच प्रयत्न असला तरीही छान
तुम्ही अगोदर 18/07/2015ला
In reply to पहिलाच प्रयत्न असला तरीही छान by जयन्त बा शिम्पि
खुप खुप आभार.
मला महिना २५० ते ३०० च्या वर
लेख आवडला, विशेष करून यासाठी,
बांद्याफुडल्या हेवा़ळेसारख्या
आरोसबागेत लायट आसा पण
In reply to बांद्याफुडल्या हेवा़ळेसारख्या by यशोधरा
:(
In reply to आरोसबागेत लायट आसा पण by रघुनाथ.केरकर
नेमके काय वाईट आहे त्याची खास
In reply to :( by पैसा
हाहा! घाबरले ना!
In reply to नेमके काय वाईट आहे त्याची खास by कैलासवासी सोन्याबापु
आयला कुळे म्हणजे तापच असतो!
In reply to हाहा! घाबरले ना! by पैसा
तलाठी खरो बोलतासा मां? नायतर
In reply to आरोसबागेत लायट आसा पण by रघुनाथ.केरकर
तो कित्या मदत करतलो
In reply to तलाठी खरो बोलतासा मां? नायतर by यशोधरा
सहसा असा बगूक नाय. दोघांयका
In reply to तो कित्या मदत करतलो by रघुनाथ.केरकर
तेका सगळाच व्हया आसा
In reply to सहसा असा बगूक नाय. दोघांयका by यशोधरा
केरकर, धन्याक कवळूचा आसा
In reply to तेका सगळाच व्हया आसा by रघुनाथ.केरकर
कुळ म्हणान नाव लागला
In reply to केरकर, धन्याक कवळूचा आसा by यशोधरा
क्रुषकदीना नंतर दोन वर्षांनी हेन्चा नाव लागला.
In reply to कुळ म्हणान नाव लागला by रघुनाथ.केरकर
कुळ म्हणून नाव लागला म्हंजे
In reply to कुळ म्हणान नाव लागला by रघुनाथ.केरकर
होय ओ , कुळच आसत ते
In reply to कुळ म्हणून नाव लागला म्हंजे by यशोधरा
होय, सगळी माहिती होयी, त्या
In reply to होय ओ , कुळच आसत ते by रघुनाथ.केरकर
देव तुमचा बरा करो
In reply to होय, सगळी माहिती होयी, त्या by यशोधरा
'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी
In reply to देव तुमचा बरा करो by रघुनाथ.केरकर
रात्रीस खेळ चाले
In reply to 'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी by एस
ह्या बाकी खरा हा केरकरानुं..
In reply to रात्रीस खेळ चाले by रघुनाथ.केरकर
नवा ट्रेंड आला आहे
In reply to ह्या बाकी खरा हा केरकरानुं.. by बाळ सप्रे
=))
In reply to नवा ट्रेंड आला आहे by रघुनाथ.केरकर
इतकं वाईट बोललो काय आम्ही? =)
In reply to 'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी by एस
नाय गो यशो, माका तर माज्या
In reply to इतकं वाईट बोललो काय आम्ही? =) by यशोधरा
अरे हा जोक होता!...
In reply to इतकं वाईट बोललो काय आम्ही? =) by यशोधरा
हो की :) त्या मालिकेत इतकं
In reply to अरे हा जोक होता!... by एस
'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी
In reply to 'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी by एस
माझा HONGKONG मधील एक मित्र
ते लालफीत वगैरे कायबी नसते
आमदार नेक पाहिजे???
In reply to ते लालफीत वगैरे कायबी नसते by कंजूस
लेख आवडला.
पेडल वीज
तुम्ही मनोज भार्गवा ह्या
In reply to पेडल वीज by हेमन्त वाघे
लेखा बरोबर प्रतिसाद हि आवडले.
पहिलाच लेख असूनही सुंदर
सुरेख लेख...!!
रघुनाथ दादा
तप्तरता
अरेवा! अभिनंदन आणि
In reply to तप्तरता by रघुनाथ.केरकर
+१
In reply to अरेवा! अभिनंदन आणि by संदीप डांगे
अरेवा. भारीच की.
In reply to +१ by प्रचेतस
फ्लेक्श करा की राव... ;)
In reply to अरेवा. भारीच की. by अभ्या..
फ्लेक्स करेंगे लेकिन लाईट आणे
In reply to फ्लेक्श करा की राव... ;) by मोदक
आणि आता गाववाल्यांना सांगा.
In reply to तप्तरता by रघुनाथ.केरकर
अरे वा! मस्त काम झालं.
In reply to तप्तरता by रघुनाथ.केरकर
+१
In reply to अरे वा! मस्त काम झालं. by यशोधरा
अरे वा!
In reply to तप्तरता by रघुनाथ.केरकर
जवळ जवळ एक वर्षांपूर्वी
In reply to तप्तरता by रघुनाथ.केरकर
सर्वांना धन्यवाद.
क्या बात !!! तुझ्या
In reply to सर्वांना धन्यवाद. by सस्नेह
पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!!
In reply to सर्वांना धन्यवाद. by सस्नेह
सकारात्मक कार्याबद्दल अभिनंदन
In reply to सर्वांना धन्यवाद. by सस्नेह
तुस्सी ग्रेट हो
In reply to सर्वांना धन्यवाद. by सस्नेह
स्नेहाताई ग्रेट आहेस तू!!
स्नेहांकिता ताई: मनःपूर्वक अभिनंदन!
१०००
In reply to स्नेहांकिता ताई: मनःपूर्वक अभिनंदन! by बहुगुणी
स्नेहाताई तुम्हाला हार्ट
येस, केरकरांचे खास कौतुक.
In reply to स्नेहाताई तुम्हाला हार्ट by कैलासवासी सोन्याबापु
+100
In reply to स्नेहाताई तुम्हाला हार्ट by कैलासवासी सोन्याबापु
मांजरेकरांचा आनंद खूप मोठी कमाई असेल तुमची
In reply to स्नेहाताई तुम्हाला हार्ट by कैलासवासी सोन्याबापु
+१२३ मस्त स्नेहांकीताताई.
In reply to स्नेहाताई तुम्हाला हार्ट by कैलासवासी सोन्याबापु
लेखन आवडले व स्नेहातैचा
+१^न
In reply to लेखन आवडले व स्नेहातैचा by रेवती
मस्त!! स्नेहातै _/\_
छान लेखन.
सोलर पर्याय
चांगली आणि उपयुक्त माहीती
In reply to सोलर पर्याय by मैत्र
चांगले झाले.
रके,
धन्यवाद साहेब
In reply to रके, by संजय क्षीरसागर
ग्रेट!
In reply to धन्यवाद साहेब by रघुनाथ.केरकर
धन्यवाद स्नेहन्किता ताइ
__/\__ :) स्नेहा
In reply to धन्यवाद स्नेहन्किता ताइ by रघुनाथ.केरकर
प्रचंड थक्क करणारा
स्नेहांकिता ताईंना सलाम
वा!
हॅट्स ऑफ स्नेहाताई! खूप छान