गहू - नाचणी बिस्कीट अका मातृत्व कुकीज ..
मातृत्व कुकीज ( नाव साभार आत्याबाई रेवतीताई .. :-) )
साहीत्य -
१. गव्हाचे पीठ १ मध्यम वाटी
२. नाचणी सत्व १ मध्यम वाटी
३. बटर/ तूप - १०० ग्रॅम
४. पिठीसाखर १ मध्यम वाटी किंवा आवडीनुसार कमीजास्त
५. बेकिंग पावडर १ टीस्पून
६. हवे असेल तर एखादे इसेन्स - मी वेलची पावडर टाकली
७. दूध
सजावटीसाठी -
ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी
कृती -
१) गव्हाचे पीठ+नाचणी सत्व+ बेकिंग पावडर नीट चाळून घ्या.
२) त्यात बटर/तूप टाकून मळा . एक रवाळ मिश्रण तयार झाले पाहिजे
३) मग त्यात पिठीसाखर मिक्स करा. इसेन्स,ड्रायफ्रूट पावडर घालणार असाल तर ते ही घालून आणि मिक्स करा
४) आता थोडे थोडे दूध घालून मळून घ्या.
५ )पूर्ण मळलेला गोळा प्लास्टिक पेपरमध्ये / एखाद्या बंद डब्यात ठेवून १५-२० मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
६) नंतर मळलेला गोळा बाहेर काढून थोड्या कोरडया पिठावर /तुपावर लाटायला घ्या आणि दुसरीकडे ओव्हन १८० डिग्री सेन्ट ला १५-२० मी प्रिहिट करुन घ्या
७) लाटलेल्या पोळीचे कुकी कटर / बाटलीच्या झाकणाने बिस्कीट कापून घ्या, ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी लावून सजवा.
८) बटर पेपर किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून १८० ला १५-२० मी / रंग बदले पर्यंत बेक करा
वाचने
24747
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
मस्त कृती! :) कधी येऊ खायला? ;)
लैच भारी, आवडले बिस्किट्स.
-दिलीप बिरुटे
अरे वा! आली का रेशिपी! छान पाकृ व फोटू.
उत्तम.
फोटो दिसत नाही
फोटो कुठायंत?
पाककृती उत्तम. अजूनही उत्तमोत्तम पाककृती येऊंद्यात
In reply to फोटो कुठायंत? by किसन शिंदे
टाकलाय की फोटो.
फोटूऊऊऊऊऊऊऊऊऊ 

असं कसं झाले ? फोटो धागा काढ्ला तेंव्हातर दिसत होता. मदत करा संपादक 
In reply to असं कसं झाले ? फोटो धागा by स्मिता चौगुले
फोटो, दिसतोय....!
-दिलीप बिरुटे
In reply to दिस्तोय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिसत नाही.
In reply to दिसत नाही. by किसन शिंदे
आता नाय दिसत.... :(
-दिलीप बिरुटे
In reply to अरे यार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कन्फ्युज .. :-(
मस्त पाकृ . फोटो दिसत नाही.
...आणि पौष्टिक सुद्धा.
फटू नाय दिसत
आता दिसतोय का फोटो लोकहो ?
In reply to आता दिसतोय का फोटो लोकहो ? by स्मिता चौगुले
नाही
In reply to आता दिसतोय का फोटो लोकहो ? by स्मिता चौगुले
फोटो आधी दिसत होते, आता दिसत नाहीयेत मात्र.
सासं/ संमं, जरा लक्ष द्या ना प्लीज.
फोटो दिसत नाहिये
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
पाकृ दिसली. कुकीज छान दिसत आहेत.
(असं कनेक्शन आहे तर ;) )
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
पिराकाकू , आपण फोटो दुवा आपल्या प्रतिसादात व्यवस्थित टाकल्यामुळे. मूळ धाग्यात फोटो अपड़ेवता आला. धन्स....!
-दिलीप बिरुटे
In reply to फोटो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिरातै यांची इस्ट कोस्ट साहित्य संपादक पदासाठी जोरदार तयारी चालु आहे. ह. घ्या.
In reply to साहित्य संपादक पद by राघवेंद्र
मी सध्या किती प्रचंड रिकामटेकडी आहे ह्याची ती झलक आहे! पण तशीच काही रिक्रुटमेंट असेल तर कळवा, आम्ही अप्लाय करु!
@बिरुटे काका,
एनीटाईम!
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
धन्स गं..:)
खुपच सोपी आणि पौष्टिक रेसेपी!!
मस्त रेसिपी.
झकास पाकृ!
खुप मस्त पाकृ.
मस्त ! :)
{नान खटाई प्रेमी ) :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekhoमस्त.. नक्की करुन पाहणार!
धन्यवाद सर्व मिपा़करांचे..
मस्त रेसिपी.
छानच.
स्मिताताई मस्त रेशीपी. लवकरच येते टेस्ट करायला
In reply to स्मिताताई मस्त रेशीपी. by प्रीत-मोहर
नक्की.. :)
ओवन कोणत्या कंपनीचे वापरला आहे
मस्त कृती! :) कधी येऊ खायला?