गोदो आला गोदो आला
लेखनविषय:
गोदो आला गोदो आला
खेळखेळणी घेउन आला
गोदो आला गोदो आला
अहा हर्ष तो मनी दाटला!
गोदो आला गोदो आला
कसा दरबार पाहा सजला
स्वागत करण्या एक गलबला
हरहर गोदो निनाद झाला
गोदो आला गोदो आला
ओवाळावे पटकन त्याला
भेटवस्तु द्या माणिकमोती
त्रिशुलतलवार बरछ्याभाला
गोदो आला गोदो आला
जो जो बोले कुजबुजवाला
कोल्ह्यांची ती ऐकून कुई
हरिण बोलले सिंहच आला
गोदो आला गोदो आला
हिरवी राने हिरवा पाला
दुधात न्हाले गोकुळ सगळे
आनंदी त्या गोकुळबाला
गोदो आला गोदो आला
जलौघ वाहे अरण्यातला
तूतीवरचा रेशमकीड़ा
खुशीत आला अन् वळवळला!
गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला
गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?
गोदो आला गोदो आला
कोण रडला नि कोण हासला?
रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते
हसणाऱ्यांचा झिंगालाला!
गोदो आला गोदो आला
उन्मादाचा नाद टिपेला
गोदो आला जगणे झाले
देवकिनन्दन जय गोपाला
- स्वामी संकेतानंद
वाचने
5220
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
म्हातारबाबांना प्रचंड जास्त आवडेल अशी कविता
In reply to म्हातारबाबांना प्रचंड जास्त by कैलासवासी सोन्याबापु
म्हाताऱ्याचे आठवत नाही, पण मागच्या वर्षी फेसबुकवर ही कविता टाकली होती तेव्हा त्याच्या समविचारी दाढीवाल्या कवींनी ही कविता शेअर केली होती! :D :D
वेटींग फॉर गोदो नाटकाची आठवण झाली.
काहीच कळले नाही, हुच्च असावे
In reply to काहीच कळले नाही, हुच्च असावे by स्पा
झेपले नाही...
असो.
In reply to +१ by नावातकायआहे
प्लस वण टू पांडुब्बा.
In reply to +१ by नावातकायआहे
प्लस वण टू पांडुब्बा.
In reply to प्लस वण टू पांडुब्बा. by अत्रुप्त आत्मा
स्पा.
झकास. मस्त गेयता आहे. पण अॅब्सर्डिस्ट हा प्रकार नाटक पाहिलं तेव्हाही झेपला नव्हता, अजूनही समजत नाही.
गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो आला कोण पुसे त्या अंधाराला ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे ओहोटी का आनंदाला? गोदो आला गोदो आला कोण रडला नि कोण हासला? रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते हसणाऱ्यांचा झिंगालाला! गोदो आला गोदो आला उन्मादाचा नाद टिपेला गोदो आला जगणे झाले देवकिनन्दन जय गोपालाआवडले.
आला का एकदाचा! अच्छे दिन आले तर!
In reply to आला का एकदाचा! by पैसा
=))
In reply to आला का एकदाचा! by पैसा
गोदो आला गोदो आला
अच्छे दिन घेऊनी आला
In reply to गोदो आला गोदो आला by स्वामी संकेतानंद

प्रचंड आवडली. आला का एकदाचा असा प्रश्न शीर्षक वाचून मलाही पडला ;-)
गोदो चं स्पेलिंग चुकलंय.
स्वाम्या नवं काही लिहिलंय का? किती दिवस ह्यो स्टॉक क्लियरन्स सेल चालू ठेवणार?? :P
In reply to स्वाम्या नवं काही लिहिलंय का? by कैलासवासी सोन्याबापु
नवनिर्माण सध्या बंद आहे.कारण तुला माहीत आहे.
In reply to स्वाम्या नवं काही लिहिलंय का? by कैलासवासी सोन्याबापु
आमच्या मरतुकड्या बीएसेनेल ब्रॉडबँडमधून असं बरंच काही वाचायचं चुकलेलं असतं. येऊ दे इथे. काही लिखाण पुन्हा वाचायलाही छान असतं. स्वाम्याचा त्यात नक्कीच नंबर आहे!
हे गोदो काय आहे?
गोदो म्हणजे मो दी ????
In reply to गोदो म्हणजे मो दी ???? by लालगरूड
होप, नॉट. मोदी हा संदर्भही आला नाही डोक्यात कविता वाचताना पण काही प्रतिसाद वाचताना मात्र आला होता.
गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो आला कोण पुसे त्या अंधाराला ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे ओहोटी का आनंदाला?
In reply to गोदो आला गोदो आला by विप्लव
मस्तच
सायोनारा सायोनारा ची चाल लावायची का ? (रेफ- लव इन टोकियो )
In reply to छान कविता by पगला गजोधर
नाही. "ये रे घना"ची.
____________
गोदो आला गोदो आला
पोकल बांबू पला पला
मुले त्याची कुतांगलू, मास्तर बघे मुरगालू
बोलावतो त्या सोट्याला, शालेमागे गच्पानाला
गोदो आला...
(सॉरी!)
दुर्बोध वगैरे काय तरी म्हणतात तशी कविता.
कविता आवडली.
मज्जा आली स्वामी!!!
म्हातारबाबांना प्रचंड जास्त