गोदो आला गोदो आला
लेखनविषय:
गोदो आला गोदो आला
खेळखेळणी घेउन आला
गोदो आला गोदो आला
अहा हर्ष तो मनी दाटला!
गोदो आला गोदो आला
कसा दरबार पाहा सजला
स्वागत करण्या एक गलबला
हरहर गोदो निनाद झाला
गोदो आला गोदो आला
ओवाळावे पटकन त्याला
भेटवस्तु द्या माणिकमोती
त्रिशुलतलवार बरछ्याभाला
गोदो आला गोदो आला
जो जो बोले कुजबुजवाला
कोल्ह्यांची ती ऐकून कुई
हरिण बोलले सिंहच आला
गोदो आला गोदो आला
हिरवी राने हिरवा पाला
दुधात न्हाले गोकुळ सगळे
आनंदी त्या गोकुळबाला
गोदो आला गोदो आला
जलौघ वाहे अरण्यातला
तूतीवरचा रेशमकीड़ा
खुशीत आला अन् वळवळला!
गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला
गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?
गोदो आला गोदो आला
कोण रडला नि कोण हासला?
रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते
हसणाऱ्यांचा झिंगालाला!
गोदो आला गोदो आला
उन्मादाचा नाद टिपेला
गोदो आला जगणे झाले
देवकिनन्दन जय गोपाला
- स्वामी संकेतानंद
वाचने
5218
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
म्हातारबाबांना प्रचंड जास्त
In reply to म्हातारबाबांना प्रचंड जास्त by कैलासवासी सोन्याबापु
म्हाताऱ्याचे आठवत नाही, पण
वेटींग फॉर गोदो नाटकाची आठवण
काहीच कळले नाही, हुच्च असावे
In reply to काहीच कळले नाही, हुच्च असावे by स्पा
+१
In reply to +१ by नावातकायआहे
प्लस वण टू पांडुब्बा.
In reply to +१ by नावातकायआहे
प्लस वण टू पांडुब्बा.
In reply to प्लस वण टू पांडुब्बा. by अत्रुप्त आत्मा
प्लस टू.... टू
झकास
गोदो आला गोदो आला
आला का एकदाचा!
In reply to आला का एकदाचा! by पैसा
=))
In reply to आला का एकदाचा! by पैसा
गोदो आला गोदो आला
In reply to गोदो आला गोदो आला by स्वामी संकेतानंद
Are you for real ?
प्रचंड आवडली. आला का एकदाचा
गोदो चं स्पेलिंग चुकलंय.
स्वाम्या नवं काही लिहिलंय का?
In reply to स्वाम्या नवं काही लिहिलंय का? by कैलासवासी सोन्याबापु
नवनिर्माण सध्या बंद आहे.कारण
In reply to स्वाम्या नवं काही लिहिलंय का? by कैलासवासी सोन्याबापु
असू दे रे!
हे गोदो काय आहे?
गोदो म्हणजे मो दी ????
In reply to गोदो म्हणजे मो दी ???? by लालगरूड
होप, नॉट. मोदी हा संदर्भही
गोदो आला गोदो आला
In reply to गोदो आला गोदो आला by विप्लव
मस्तच
छान कविता
In reply to छान कविता by पगला गजोधर
नाही. "ये रे घना"ची.
In reply to नाही. "ये रे घना"ची. by आदूबाळ
ळॉळ!
In reply to ळॉळ! by पैसा
=))))
दुर्बोध वगैरे काय तरी म्हणतात
कविता आवडली.
मज्जा आली स्वामी!!!