हमखास हिट - दाल बाटी!
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!
तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते!
लोक निखार्यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत!
तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात.
आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!
हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!
सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!
ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!
हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)
ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.
कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने
49566
वाचनखूण
प्रतिक्रिया
175
जबराट दिसतोय प्रकार
In reply to जबराट दिसतोय प्रकार by स्पा
च्यामारी...
In reply to च्यामारी... by मुक्त विहारि
शेवटचा फोटो आकर्षक आहे.
In reply to शेवटचा फोटो आकर्षक आहे. by गणपा
चुकुन मी पल्याडच्या संस्थळावर
एकदम खुसखुशीत पा.कृ.
मस्तच. करून बघणार !!
हं
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच लिहायला आलो होतो. चि
In reply to हेच लिहायला आलो होतो. चि by आदूबाळ
सांगली कराडकडे चकोल्या आणि
In reply to सांगली कराडकडे चकोल्या आणि by कंजूस
चकोल्या म्हणजे लाटलेली पोळी
In reply to चकोल्या म्हणजे लाटलेली पोळी by उडन खटोला
फार भिन्न आहेत
In reply to फार भिन्न आहेत by चंपाबाई
चंपाबै
In reply to चंपाबै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to सांगली कराडकडे चकोल्या आणि by कंजूस
एस्स
In reply to एस्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
हो हे ऎकलंय आधी. बहुतेक
In reply to हो हे ऎकलंय आधी. बहुतेक by किसन शिंदे
हो राव नाथांच्या भारुडावर धागा....
In reply to हो राव नाथांच्या भारुडावर धागा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह्ह्ह्ह्ह सरजी. भारीच आहे
In reply to वाह्ह्ह्ह्ह सरजी. भारीच आहे by अभ्या..
बहु रूढ
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
...
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
त्यो रोडगा वायला, बाजरीच्या
In reply to त्यो रोडगा वायला, बाजरीच्या by कैलासवासी सोन्याबापु
वाचावं ते नवलच...
In reply to वाचावं ते नवलच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होय रोडगा
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
रोडगा
मप्र ,राजस्थान,जळगावकडचा भाग
In reply to मप्र ,राजस्थान,जळगावकडचा भाग by कंजूस
अवांतराबद्दल क्षमस्व.
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाट्यांना चिकुल्यांच्या
In reply to बाट्यांना चिकुल्यांच्या by पिलीयन रायडर
+१
In reply to बाट्यांना चिकुल्यांच्या by पिलीयन रायडर
सेक्सी या एका कल्पक शब्दाने
In reply to सेक्सी या एका कल्पक शब्दाने by स्पा
मग क्रेडिट नवर्याला द्यावं
In reply to सेक्सी या एका कल्पक शब्दाने by स्पा
स्क्यूज मी
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आता इथुन पुढे तुमच्याकडे
एकदम खतरी ग पिरा. या बरोबर
In reply to एकदम खतरी ग पिरा. या बरोबर by त्रिवेणी
कशी करतात वांग्याची घोटलेली
तुम्ही बाट्या तुपात भिजवत
In reply to तुम्ही बाट्या तुपात भिजवत by मोदक
गुळासोबत कुस्करुन खायच्या
..
In reply to .. by चंपाबाई
मका. पण त्याशिवाय नुसत्या
In reply to मका. पण त्याशिवाय नुसत्या by पिलीयन रायडर
..
In reply to .. by चंपाबाई
ओ नाही.. ते म्हणजे
In reply to ओ नाही.. ते म्हणजे by पिलीयन रायडर
हं
चान चान
अग्गायायाया!! पिराबाई तुम्ही
In reply to अग्गायायाया!! पिराबाई तुम्ही by आनन्दिता
मंग या की!! तुम्ही येऊ पण
मस्त आहे
दिसण्यात तर नाही, कदाचित
सेक्सी!!
भारी !
In reply to भारी ! by सस्नेह
उचल की हाण्ण!
In reply to उचल की हाण्ण! by साती
डॉक्टर....
In reply to डॉक्टर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याच्याशी मात्र सहमत हं
In reply to याच्याशी मात्र सहमत हं by किसन शिंदे
खरंय!
In reply to खरंय! by साती
असं कसं म्हणता? सरळ गोळे न
लै भारी!
दालबाटी प्रकार मुदलात आवडत
मस्त..
वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन.
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
ता.क.
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
हे असे नुसतेच फोटो दाखवून काय फायदा?
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
निव्वळ दांगडो
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
इट्स कॉल रोडगे.
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
स्लर्र sप !
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
अहाहा!! कसली जबराट दिसतेय ही
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
अहो मरीन की मी असले फोटो
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
देवा!
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
ये बात ..!
In reply to ये बात ..! by टामोलीयन
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by पैसा
हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची
In reply to हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची by कंजूस
आमची आई हळदीच्या पानात करते
In reply to आमची आई हळदीच्या पानात करते by सुबोध खरे
केळ्याच्या पानात पानगी.
In reply to केळ्याच्या पानात पानगी. by गवि
नाही गवि
In reply to नाही गवि by पैसा
पातोळे/पातोळ्या हे
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
हा
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
पातोळे बरेच जास्त
In reply to हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची by कंजूस
हळदीचे पान
In reply to हळदीचे पान by पैसा
एक वेगळा धागा होऊ दे सोवळा (
In reply to एक वेगळा धागा होऊ दे सोवळा ( by कंजूस
सहमत
In reply to अरेच्चा! by पैसा
मास्टरशेफ़ इंडियाच्या एका
In reply to मास्टरशेफ़ इंडियाच्या एका by आनंदी गोपाळ
(स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी
In reply to (स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी by आनंदी गोपाळ
मेक्सिकन लोक्स बनवतात असलेच पानगे (?)
In reply to अरेच्चा! by पैसा
आयला..
In reply to ये बात ..! by टामोलीयन
नका हो
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
बाट्यांवरील राख झाडायची
In reply to बाट्यांवरील राख झाडायची by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पू गावची याद आली मले,
कुरमा बाटीही असते.
In reply to कुरमा बाटीही असते. by कंजूस
आता ही कोणती बाटी
In reply to आता ही कोणती बाटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यांना बहुतेक चुरमा
In reply to त्यांना बहुतेक चुरमा by आनंदी गोपाळ
कुरमा नव्हे ते चुरमा हवे.
In reply to कुरमा नव्हे ते चुरमा हवे. by कंजूस
मी राजस्थानात मारवाड मध्ये (
लै आवडती डिश