मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोहमद्द अली रोड वरची खादाडी

वेदांत · · भटकंती
मोहमद्द अली रोड वरची खादाडी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रमजान दरम्यान मोहमद्द अली रोड येथे गेलो होतो. मांसाहारी लोकांसाठी मोहमद्द अली रोड म्हणजे 'जन्नत' आहे. येथील अनेक दुकाने जगप्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायच तर सुलेमान-उसमान मिठाईवाला , तव्क्क्ल स्वीट्स, जेजे जिलेबीवाला , हॉटेल नूर मोहमदी ई. नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्जीद बंदर स्टेशनला उतरून मित्रांची वाट पाहत बसलो,येणारे सगळे या खाद्यजत्रेतले नवखे होते. ७.३०वाजता सर्वजण जमले आणि मग आम्ही निघालो 'जन्नत' कडे.. मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन वरुन कल्याण दिशेने बाहेर पडलो. समोरच एक हॉटेल आहे (सध्या नाव आठवत नाही), तिथे अप्रतिम कश्मीरी पुलाव मिळतो , तो ही एकदम स्वस्त आणि चवीला मस्त. (अंदाजे ७० रुपये ). पण आलेल्या सर्वाना आज व्हेज नकोच होते,फक्त नॉनव्हेज वर ताव मारायचा होत. तसच पुढे चालत राहिलो आणि मग उजवीकडे वळून मोहमद्द अली रोड कड़े चालू लागलो. पहिल्यांदा सुलेमान-उसमान मिठाईवाल्या कडे जायचे ठरले. एका मोठ्या कढईत मलपुआ तळ्त होते. येथे मालपुआ दोन प्रकारचे असतात,व्हेज आणि नॉनव्हेज (१किवा२ अंडी टाकून). एक-एक मालपुआ (रबडी सहीत)३-४ जणाना पुरून उरतो. भूक तर खूप लागली होती,पण स्वीट डिश नंतर खाउया असे त्याना मी सुचवले आणि मग तसेच पुढे निघालो मिनारा मस्जीद गल्ली मधे................ व्हेज मालपुआ Malpua नॉनव्हेज मालपुआ Nonvej Malpua मिनारा मस्जीदची गल्ली खूप प्रसिद्ध आहे. येथे कबाब पासून बकर्‍याच्या ईतर अवयवांपासून बनवलेले अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. पहिला ताव आम्ही तेथील चीकन कबाब वर मारला,आणि त्यानंतर मलई कबाब वर. दोन्ही पदार्थ खूपच छान आणि चविष्ट होते. उजव्या बाजूला जेजे जिलेबीवाला होता आणि पुढे शोरमा हा प्रकार .. आम्ही चिकन शोरमा घेतला. शोरमा खाताना समोर लक्ष गेल आणि पाटी पहिली तर चक्क बडे मिया ... येथे सूप छान मिळते अशी माहिती मिळाली. शोरमा खाउन मागे फिरलो आणी निघालो नूर मोहमद्दी हॉटेल कडे.. शोरमा Shorma मलई कबाब malai kabab नूर मोहमददी हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. यावेळेस त्याने दुकान बरेच वाढवले होते, फुटपाथ पण दुकानाचा भाग बनवला होता. येथील फेमस डिश म्हणजे 'चिकन संजूबाबा' आणि 'चिकन हाकिमी' . आम्ही चिकन संजूबाबा मागवले आणि सोबत रोटी. पहिला घास खातानाच कळले की ही डिश का फेमस आहे. नूर मोहमददी हॉटेल nur mohd चिकन संजूबाबा Chikan sanjubaba तिथून पुढे निघालो माझ्या आवडत्या दुकानात, तवकक्ल स्वीट्स .. तवकक्ल स्वीटसच्या बाजूला एका दुकानात चिकन बैदा रोटी खाल्ली आणि ती खात असतानाच डबल एग मालपुआची ऑर्डर दिली. पण तेवढ्यात तवकक्लच्या मालकाने हाक मारुन आत बोलावले. त्याने मलई खाजाची खूप तारीफ केली आणि एकदा खाउन बघाच असा आग्रह केला. मग आम्हीही त्याच्या विनंतीला मान देऊन मलई खाजा मागवला. माझ्या आयुष्यात मी बरेच मलई खाजा खाल्ले आहेत,पण याची टेस्ट काही न्यारीच होती.. तो पर्यंत मालपुआ पण आलाच होता, तो ही आम्ही हादडला आणि त्यानंतर ईद्रिस कोलडड्रींक मधून खस सरबत मागवले. आता आमचे पोट फुटायची पाळी आली होती. तिथून परत येताना मग आम्ही घरच्यांसाठी जेजे जिलेबी मधून जिलेबी आणि चीज&ग्रील मधून बिर्यानी पार्सल घेतली . बैदा रोटी baida roti बैदा रोल baida roll रंगीत कबाब kabab चिकन तंदुरी kabab फिरनी firani

वाचने 25978 वाचनखूण प्रतिक्रिया 59

कविता१९७८ Fri, 07/29/2016 - 15:28
मस्त खादाडी पण तिथे मान्साहारामधे चिकनचे पदार्थ चाखणे बरे कारण बोकडा बरोबर अन्य प्राण्याचेही मटण मिळण्याची शक्यता असते.

In reply to by कविता१९७८

उडन खटोला Fri, 07/29/2016 - 15:39
आधी विचारलं तर व्यवस्थित च देतात असा अनुभव आहे. माणूस बघून चौकशी करावी लागते एवढं च. खोटं बोलण्याची वृत्ती वैयक्तिक असते, सामाजिक नसते.

In reply to by उडन खटोला

जगप्रवासी Fri, 07/29/2016 - 16:17
एखादी अनोळखी डिश मागवली तर मालकाने ती मला खाऊ नको सांगितली कारण त्यात बीफ होते. त्याऐवजी मस्त चिकन डिश सजेस्ट केली आणि ती डिश अप्रतिम होती.

सुधांशुनूलकर Fri, 07/29/2016 - 16:14
एका दुकानात (दुकानाचं नाव आठवत नाहि) पात्रा बिर्यानीही मिळते. ही चिकन बिर्यानीच असते, त्यात पात्रा (अळूवड्या) घातलेल्या असतात. @ टवाळ कार्टा - एकदा महम्मद अली रोड खादाडी कट्टा झालाच पाहिजे.

बोका-ए-आझम Fri, 07/29/2016 - 16:15
पण तीन गोष्टी अजून हव्या होत्या - निहारी, हलीम आणि अफलातून. सुलेमान उस्मानकडेच अफलातून नामक मिठाई मिळते. ती कशापासून बनवलेली असते असा प्रश्न पडत नाही कारण ती खाल्ल्यावर जी गुंगी येते त्यात काही आठवण राहात नाही.

मोदक Fri, 07/29/2016 - 16:21
भारी फोटो.. आम्ही मित्रांनी पुण्यात कौसरबागमध्ये खादाडी केली. बाकी तो प्रकार "शोरमा" असा नसून "शवारमा" असा आहे. अरबी / लॅबनीज प्रकार आहे हा.

In reply to by गवि

संदीप डांगे Fri, 07/29/2016 - 18:28
वेदांत साहेब, गविना थेट मु रोड वर घेऊन गेल्याशिवाय त्यांना धागा दिसणार नाही याची नोंद घ्यावी ☺

पी. के. Fri, 07/29/2016 - 17:35
5:30 ला असला धागा... पोटातले कावळे खवळले ना राव. कावळे शांत करण्यासाठी आता एका कोंबडीचा बळी जाणार.. या हि रमजान मध्ये शवारमा खायचा राहून गेला. दोस्तांनी चोकशी केली होती, हॉटेल नूर मोहमदी मध्ये मिळाला नाही. आता मुंबई मध्ये कुठे भेटेल शवारमा? बाकी फोटो आणि वर्णन अप्रतिम.

In reply to by टवाळ कार्टा

बरोबर आहे तु कळव्याच्या बाहेरच राहातोयस. खरा कळवा (पुण्याच्या धर्तीवर) फक्त जुना बेलापुररोड ते जुना पुणारोड यात वसलेला आहे. तद्वत मनिषानगर म्हणजे तुम्ही कळव्याच्या पलिकडे रहाता. कोई शक

In reply to by पी. के.

बोका-ए-आझम Fri, 07/29/2016 - 19:38
Shawarma Factory नावाची जागा आहे. अप्रतिम मिळतो. शिवाय मारूश मध्येही बरा मिळतो लोअर परेलच्या हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये.

नूतन सावंत Fri, 07/29/2016 - 19:20
बरीच वर्ष गेलोय पण गेली आणितीन चार वर्षे जायला मिळत नाहीय मोहम्मद अली रोडवर,पण ती कसर माहीमला,कापडबाजारात भरून काढता येते.जुन्या आठवणी जागवल्यात मात्र.

In reply to by बोका-ए-आझम

नूतन सावंत Mon, 08/22/2016 - 22:06
लेडी जमशेटजी मागरगाच्या सुरुवातीपासून वीर सावरकर मार्गपर्यंत आणि कापडबाजार ठेले लागलेच असतात.तसेच ताजा,सागर,पॅरामाउंट,शहनाझ,आणि आता दिल्लीदरबार आहेच.शावरमा दिल्लीदरबारमध्येही छान मिळतो.

शिद Fri, 07/29/2016 - 21:22
जबरदस्त आलेत फोटो...भुक चाळवली. महंमद अली रोडला मी माझ्या मुस्लिम मित्रांसोबत जात असे ते दिवस आठवले. दिवसभर त्यांची ईदच्या खरेदीसाठी सोबत फिरून इफ्तारनंतर भरपूर पेटपूजा...धम्माल होती. द फुडीचा खालील एपिसोडपण पाहण्यासारखा आहे.

वेदांत Mon, 08/22/2016 - 10:28
शनिवारी अत्तर आणण्यासाठी मोहमद्द अली रोड ला गेलो होतो, येताना तवक्कल स्वीट्स मधून सीतफळ मलई, मँगो मलई आणी मलई खाजा घेऊन आलो. malai khaja malai -khaja-2 malai khaja -3

चतुरंग Wed, 08/24/2016 - 01:14
धागा हा कहर गडे उघडुनि मज खिजवु नका! फोटो हे जुल्मि गडे दावुनि मज खाऊ नका! -(सपशेल संपलेला)रंगा