मोहमद्द अली रोड वरची खादाडी
मोहमद्द अली रोड वरची खादाडी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रमजान दरम्यान मोहमद्द अली रोड येथे गेलो होतो. मांसाहारी लोकांसाठी मोहमद्द अली रोड म्हणजे 'जन्नत' आहे. येथील अनेक दुकाने जगप्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायच तर सुलेमान-उसमान मिठाईवाला , तव्क्क्ल स्वीट्स, जेजे जिलेबीवाला , हॉटेल नूर मोहमदी ई.
नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्जीद बंदर स्टेशनला उतरून मित्रांची वाट पाहत बसलो,येणारे सगळे या खाद्यजत्रेतले नवखे होते. ७.३०वाजता सर्वजण जमले आणि मग आम्ही निघालो 'जन्नत' कडे.. मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन वरुन कल्याण दिशेने बाहेर पडलो. समोरच एक हॉटेल आहे (सध्या नाव आठवत नाही), तिथे अप्रतिम कश्मीरी पुलाव मिळतो , तो ही एकदम स्वस्त आणि चवीला मस्त. (अंदाजे ७० रुपये ). पण आलेल्या सर्वाना आज व्हेज नकोच होते,फक्त नॉनव्हेज वर ताव मारायचा होत. तसच पुढे चालत राहिलो आणि मग उजवीकडे वळून मोहमद्द अली रोड कड़े चालू लागलो. पहिल्यांदा सुलेमान-उसमान मिठाईवाल्या कडे जायचे ठरले. एका मोठ्या कढईत मलपुआ तळ्त होते. येथे मालपुआ दोन प्रकारचे असतात,व्हेज आणि नॉनव्हेज (१किवा२ अंडी टाकून). एक-एक मालपुआ (रबडी सहीत)३-४ जणाना पुरून उरतो. भूक तर खूप लागली होती,पण स्वीट डिश नंतर खाउया असे त्याना मी सुचवले आणि मग तसेच पुढे निघालो मिनारा मस्जीद गल्ली मधे................
व्हेज मालपुआ
नॉनव्हेज मालपुआ
मिनारा मस्जीदची गल्ली खूप प्रसिद्ध आहे. येथे कबाब पासून बकर्याच्या ईतर अवयवांपासून बनवलेले अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. पहिला ताव आम्ही तेथील चीकन कबाब वर मारला,आणि त्यानंतर मलई कबाब वर. दोन्ही पदार्थ खूपच छान आणि चविष्ट होते. उजव्या बाजूला जेजे जिलेबीवाला होता आणि पुढे शोरमा हा प्रकार .. आम्ही चिकन शोरमा घेतला. शोरमा खाताना समोर लक्ष गेल आणि पाटी पहिली तर चक्क बडे मिया ... येथे सूप छान मिळते अशी माहिती मिळाली. शोरमा खाउन मागे फिरलो आणी निघालो नूर मोहमद्दी हॉटेल कडे..
शोरमा
मलई कबाब
नूर मोहमददी हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. यावेळेस त्याने दुकान बरेच वाढवले होते, फुटपाथ पण दुकानाचा भाग बनवला होता. येथील फेमस डिश म्हणजे 'चिकन संजूबाबा' आणि 'चिकन हाकिमी' . आम्ही चिकन संजूबाबा मागवले आणि सोबत रोटी. पहिला घास खातानाच कळले की ही डिश का फेमस आहे.
नूर मोहमददी हॉटेल
चिकन संजूबाबा
तिथून पुढे निघालो माझ्या आवडत्या दुकानात, तवकक्ल स्वीट्स .. तवकक्ल स्वीटसच्या बाजूला एका दुकानात चिकन बैदा रोटी खाल्ली आणि ती खात असतानाच डबल एग मालपुआची ऑर्डर दिली. पण तेवढ्यात तवकक्लच्या मालकाने हाक मारुन आत बोलावले. त्याने मलई खाजाची खूप तारीफ केली आणि एकदा खाउन बघाच असा आग्रह केला. मग आम्हीही त्याच्या विनंतीला मान देऊन मलई खाजा मागवला. माझ्या आयुष्यात मी बरेच मलई खाजा खाल्ले आहेत,पण याची टेस्ट काही न्यारीच होती.. तो पर्यंत मालपुआ पण आलाच होता, तो ही आम्ही हादडला आणि त्यानंतर ईद्रिस कोलडड्रींक मधून खस सरबत मागवले. आता आमचे पोट फुटायची पाळी आली होती. तिथून परत येताना मग आम्ही घरच्यांसाठी जेजे जिलेबी मधून जिलेबी आणि चीज&ग्रील मधून बिर्यानी पार्सल घेतली .
बैदा रोटी
बैदा रोल
रंगीत कबाब
चिकन तंदुरी
फिरनी

वाचने
25978
वाचनखूण
प्रतिक्रिया
59
मस्तं!!
काय त्रास आहे चायला...पोटातले
मस्त खादाडी पण तिथे
In reply to मस्त खादाडी पण तिथे by कविता१९७८
आधी विचारलं तर व्यवस्थित च
In reply to आधी विचारलं तर व्यवस्थित च by उडन खटोला
माझा अनुभव पण सेम आहे
....
मस्त !!!. फोटु पण भारी आहेत.
In reply to मस्त !!!. फोटु पण भारी आहेत. by राजाभाउ
फोटोंखाली पदार्थंची नावे
In reply to फोटोंखाली पदार्थंची नावे by वेदांत
धन्यवाद.
कहर!
कहर केलायत राव ! ! ! श्या!
In reply to कहर केलायत राव ! ! ! श्या! by वेल्लाभट
फोटो खाली नावं टाकलीत...
पात्रा बिर्यानी
In reply to पात्रा बिर्यानी by सुधांशुनूलकर
त्या दुकानच नाव फिरोझ फरसाण .
मस्तच.
In reply to मस्तच. by बोका-ए-आझम
अफलातून खाल्लीय दोन चार दा.
In reply to मस्तच. by बोका-ए-आझम
अफलातुन छान असते. त्यात ही
In reply to मस्तच. by बोका-ए-आझम
निहारी की नहारी नल्ली?
In reply to मस्तच. by बोका-ए-आझम
+++१११
भारी फोटो.. आम्ही मित्रांनी
In reply to भारी फोटो.. आम्ही मित्रांनी by मोदक
"शोरमा" असा नसून "शवारमा"
In reply to भारी फोटो.. आम्ही मित्रांनी by मोदक
बरोबर. टर्कीचा खाला होता,
लैच भारी
कोणतेही फोटो दिसत नाहीयेत.
In reply to कोणतेही फोटो दिसत नाहीयेत. by गवि
वेदांत साहेब, गविना थेट मु
नूर मोहंमदी आणि 'चिकन संजूबाबा'
हायला
हायला
5:30 ला असला धागा... पोटातले
In reply to 5:30 ला असला धागा... पोटातले by पी. के.
पम्याच्या कळव्यात मिळतो :)
In reply to पम्याच्या कळव्यात मिळतो :) by टवाळ कार्टा
बरोबर आहे तु कळव्याच्या
In reply to 5:30 ला असला धागा... पोटातले by पी. के.
मुंबई मध्ये कुठे भेटेल शवारमा?
In reply to 5:30 ला असला धागा... पोटातले by पी. के.
अंधेरीला भवन्स काॅलेजजवळ
महम्मद अली रोड वरचा फालुदा
बरीच वर्ष गेलोय पण गेली
In reply to बरीच वर्ष गेलोय पण गेली by नूतन सावंत
कापडबाजारात कुठे?
In reply to कापडबाजारात कुठे? by बोका-ए-आझम
लेडी जमशेटजी मागरगाच्या
जबरदस्त आलेत फोटो...भुक
बाबौ...नका ओ नका
नानवेज असल्याने पास......
(No subject)
टेम्प्टींग आहेत सगळे फोटो..
बिफचं टेंशन घेऊ नका ,आजकाल
मलई खाजा
In reply to मलई खाजा by वेदांत
ओह....वॉव....मस्तं, मस्तं!
In reply to मलई खाजा by वेदांत
च्यामारी. कसलं भारीय हे. एक
In reply to मलई खाजा by वेदांत
अरे कोर्टातून स्टे आणा रे कोणीतरी!
In reply to अरे कोर्टातून स्टे आणा रे कोणीतरी! by बोका-ए-आझम
गुलाबजल ही असतं..
जुलुमी धागा आणि प्रतिसाद !
नुसती नावे वाचूनच तोंडाला
बेहतरीन लेख! जबरस्त वर्णन!
अगायाया!
संपलो, मेलो, वारलो. काय कहर
In reply to संपलो, मेलो, वारलो. काय कहर by बॅटमॅन
बा बॅटू बऱ्याच दिवसांनी
मस्त धागा
२६ मेपासून या वर्षीचा रमजान सुरु झाला आहे.
In reply to २६ मेपासून या वर्षीचा रमजान सुरु झाला आहे. by वेदांत
त्यातला एकही फोटो दिसत नाही
पुढच्या आठवड्यात जायचा प्लॅन
धागा उघडल्याचा पश्चात्ताप होत